डॉ. नारळीकरांचे संपूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. गणिताचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्याचे वडील, विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणित तज्ञ होते. वाराणशी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते. डॉ. नारळीकरांचं संस्कृतवरही प्रभुत्व आहे. तो वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या.
डॉ. नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले. तेथूनच सन १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठात गेले. तेथे त्यांना बी.ए. एम.ए. आणि पी.एचडी.च्या पदव्या मिळाल्या. त्या काळात त्यांना रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी. केली. सर फ्रेड हॉईल डॉ. नारळीकरांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले. त्यामुळे १९६६ जेव्हा हॉईड यांनी केंब्रीज येथे `इन्स्टिटय़ूट ऑफ थिऑरॉटीकल ऍस्ट्रॉनॉमी' नावाची जी स्वत:ची संस्था सुरू केली, त्यात डॉ. नारळीकरांचाही महत्त्वाचा वाटा होता. १९६६ ते १९७२पर्यंत ते या संस्थेशी निगडीत होते. सर हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोल शास्त्रात एकत्र संशोधन केलं. गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो `हॉईल-नारळीकर सिद्धांत' या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे. अर्ल्बर्ट आईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांताशी साधर्म्य साधणारा असा हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत असे सांगतो की, वस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते.
दरम्यान डॉ. नारळीकरांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिराव राजवाडे यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लिलावती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर भारतातील खगोल शास्त्रातील संशोधनाला आणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले. कालांतराने १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त झाली.
डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम तर आहेतच, पण त्याच बरोबर मराठी साहित्यात त्यांनी फार मोलाची भर घातली. विज्ञानकथांना त्यांनी मराठीत चालना देण्याचं महत्त्वाचं काम केलं. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक लेख आणि कथा लिहिल्या. यासाठी सर्व प्रसार माध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या `यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.मराठीच नव्हे, तर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम काटेकोरपणे रचण्याचे कामही ते करीत आहेत. त्यांच्या महान कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली. त्यामुळे त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. १९६५ साली त्यांना पद्मभूषण तर २००४ साली पद्मविभूषणने सन्मानीत करण्यात आले. शिवाय डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम.पी. बिरला सन्मान आणि फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले. लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी आहेत, तर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस चे ते अधिछात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या इंदिरा गांधी पारितोषिकानेही त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयांत साहित्यिक लिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही त्यांना १९९६ साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
आजही पुण्यातील `आयुका'च्या माध्यमाने ते संशोधन कार्यात मग्न आहेत. आज चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे.
संशोधन
स्थिर स्थिती सिद्धान्त
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार
१९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१० मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला पुरस्कारही मिळाले आहेत.
विज्ञानकथा पुस्तके
वामन परत न आला अंतराळातील भस्मासुर कृष्णमेघ (अनुवाद, मूळ लेखक:फ्रेड हॉयल Fred Hoyle) प्रेषित व्हायरस अभयारण्य यक्षांची देणगी टाइम मशीनची किमया याला जीवन ऐसे नाव
इतर पुस्तके
आकाशाशी जडले नाते विज्ञानाची गरुडझेप गणितातील गमतीजमती विश्वाची रचना विज्ञानाचे रचयिते नभात हसरे तारे
शास्त्रज्ञ - शास्त्रज्ञ | Written by svr | | (जन्म : नोव्हेंबर ११, १९४३) | डॉ. अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणूऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणूऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत(सन २०११). भारताच्या अणूऊर्जा कार्यक्रमाच्या प्रमुखपदाच्या आधी होमी भाभा अणू संशोधन केंद्राचे ते १९९६ ते २००० दरम्यान संचालक होते. |
|
शास्त्रज्ञ - शास्त्रज्ञ | Written by svr | | (जन्म : सप्टेंबर २५, १९२० मृत्यू : जानेवारी ३, २००२) | सतिश धवन यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. त्यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले. त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communication च्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारत INSAT - दूरसंचार उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि PSLV - Polar Satellite Lanch Vehicle यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला. त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केन्द्र असे नामकरण करण्यात आले. |
|
शास्त्रज्ञ - शास्त्रज्ञ | Written by Administrator | (जन्म : २२-१२-१८८७, मृत्यू : २६-०४-१९२०) | | श्रीनिवास रामानुजन (डिसेंबर २२, १८८७:तंजावर - एप्रिल २६, १९२०) भारतीय गणितज्ञ होते. | रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत. | या महान गणितज्ञाचा जन्म डिसेंबर २२, १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत. | रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजमनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत. | १९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २६, १९२० रोजी – हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली |
|
शास्त्रज्ञ - शास्त्रज्ञ | हा एक महाप्रतिभावान् गणिती होऊन गेला. त्यानें लिहिलेल्या ``ब्रह्मस्फुटसिध्दान्त'' या ग्रंथांत गणिताव्याय व कुटकाध्याय असें दोन भाग आहेत. या ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे तत्कालीन गणितावरील प्रमाणभूत ग्रंथ मानला जात असे. ग्रंथात शून्यलेखनाचा आणि संख्यालेखनाचा सर्वत्र उपयोग केलेला आहे. ब्रह्मगुप्ताची बीजगणितांतील नेत्रदीपक कामगिरी म्हणजे केबल ऋणात्मक संख्यांची कल्पना, वर्गसमीकरणाची मीमांसा, उपपत्ति आणि सिध्दता ही होय. काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म, चक्रीय चौकोनाचे गुणधर्म, वर्तुळाचे गुणधर्म, शंकु, प्रसूचि अशा नियमित सांद्रपदार्थांचे घनफळ, शंकु, प्रसूचि अशा नियमित सांद्रपदार्थांचे घनफळ काढलेलें आढळते. |
शास्त्रज्ञ - शास्त्रज्ञ | (जन्म : २५-१२-१६४२, मृत्यू : २०-०३-१७२७) | | ब्रिटिश गणिती, ज्योतिर्विद व भौतिक शास्त्रज्ञ. जन्म लिंकन शायर परगण्यातील बुल्झथॉर्प या छोट्या खेड्यात झाला. गुरूत्वाकर्षणाच्या सिध्दांतामुळे न्यूटनचे नांव आता शाळकरी मुलांपासून सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. न्यूटनने विज्ञानाच्या तीन क्षेत्रात विशेष कामगिरी केली. ही क्षेत्रे म्हणजे गणित. दुसरे-गतिशास्त्र आणि तिसरे-प्रकाशशास्त्र. न्यूटनचे गतिविषयक तीन नियम आजच्या अवकाशयुगात पृथ्वीवरून अंतराळात झेपावणाऱ्या अग्निबाणाच्या उड्डाणात पायाभूत महत्त्वाचे आहेत. प्रकाशाचे पृथ:क्करण काचेच्या लोलकाचे साहाय्याने करून पांढरा प्रकाश मुळात अनेक वर्णांचे मिश्रण असतो. हे न्यूटनने दाखवले. अंतर्गोल आरसा वापरून पहिली परावर्ती दुर्बिणही न्यूटननेच केली.
शास्त्रज्ञ - शास्त्रज्ञ | Written by svr | | (जन्म : २७-१२-१८२२, मृत्यू : २८-०९-१८९५) | फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. जन्म फ्रान्समध्ये डोल नावाच्या गांवी. दूध आंबणे, फळांच्या रसाची, द्राक्षरसाची आंबवून दारू होणे यासारख्या रासायनिक प्रक्रिया मूलत: काही सूक्ष्म जांतूंच्या (बॅक्टेरिया) क्रियाशक्तीनेच घडून येतात हा महत्त्वाचा शोध लावला. पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे होणाऱ्या `रेबीज' या प्राणघातक रोगावर परिणामकारक लस शोधून काढली. सूक्ष्मजीव-शास्त्राचा पाया याने घातला.
शास्त्रज्ञ - शास्त्रज्ञ | Written by svr | | (जन्म : १७-१२-१७७८, मृत्यू : २९-०५-१८२९) | ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. जन्म कार्नवाल परगण्यात पेंझॅन्स येथे झाला. लहानपणापासून रसायनशास्त्राची आवड. निरनिराळया वायूंच्या श्वसनाने होणाऱ्या परिणामासंबंधी प्रयोग. त्यातून नायट्न्स ऑक्साईड वायू वेदनाहारक असल्याचा शोध. वीज प्रवाहाने अनेक रासायनिक संयुगाचे पृथ:क्करण केले आणि सोडियम, पोटॅशियम नि मॅग्नेशियम हे धातू तयार केले. कोळशाच्या खाणीतील ज्वालाग्राही वायू यांचे अस्तित्व ओळखण्यासाठी `डेव्ही संरक्षक दीप' तयार केला.
|
|
|
|
|
|
|
|
|
शास्त्रज्ञ - शास्त्रज्ञ | बालपण यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला.ते श्रीनिवास शास्त्री व वेंकचम्मा यांचे अपत्य होते.त्यांचे जन्मगाव पुर्वी म्हैसूर राज्यात होते.त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान होते व हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते.त्यांचे पुर्वज हे मोक्षगुंडम या गिद्दलपूर नजिकच्या, सध्याच्या आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन शतकापुर्वीच स्थलांतर केले.'मोक्षगुंडम ' हे नाव त्यांची आंध्र प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते. तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले.त्याने त्यांचे कुटुंब हादरले.त्यानंतर ते परतकुर्नुल येथुन मुद्देनहळ्ळी ला आले.त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन बी.ए.ची परीक्षा पास झाले.स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे मध्ये पुणे येथे घेतले. अभियंता म्हणून वाटचाल अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर,त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली.नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले.त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधार्यांची एक अतीशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली' विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे,धरणातील साठ्याची पूरपातळी,पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत.या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे,ती टिग्रा? धरण ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात आली. विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती झाले.विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. सर मो. विश्वेश्वरैया यांनी,कावेरी नदीवर के.आर.एस.धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली.या धरणाचे बांधकामाने,ते बांधल्या गेल्याच्या वेळचे,आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे.त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान,त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी,,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी,स्टेट बॅंक ऑफ मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीतहेए त्यांनी योगदान केले. म्हैसूर येथे दिवाण म्हणून सन १९०८ मध्ये स्वेच्छा-निवृत्तीनंतर,म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणुन त्यांना,नियुक्त केल्या गेले. कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजाच्या आधारामुळे,त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्विवाद असे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत,सन १९१७ मध्ये बंगलोर येथील शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय याची त्यांनी स्थापना केली.ती भारतातील एक प्रथम अभियांत्रीकी संस्था होती. ती अद्यापही कर्नाटकातील एक गणमान्य संस्था आहे. विविध सन्मान त्यांना मिळालेले 'भारत रत्न' पदक ते म्हैसूर येथे दिवाण असतांना त्यांना,जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरविल्या गेले.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविल्या गेले. 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' पदक सर मो.विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स यालंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व ,तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेने फेलोशिप देउन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना 'डॉक्टर' ही अनेक विद्याशाखातली पदवी देउन गौरविले.ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स काँग्रेस चे अध्यक्ष होते. |
|
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा