वैशिष्ट्यीकृत पोस्ट

बोधकथा

 बोधकथा संग्रह

बोधकथा संग्रह pdf 

घड्याळ
एकदा एका शेतकऱ्याला जाणवले की त्याचे घड्याळ  धान्याच्या कोठारात हरवले आहे.  

    जरी ते एक सामान्य घड्याळ होते तरी त्याचे लेखी त्याला  अफाट  भाावनिक मूल्य होते.

    बराच वेळ गवतात सर्वत्र शोधल्यावरही त्याला ते सापडेना. मग त्यांनी कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या गटाला घड्याळ शोधण्यासाठी बोलावले व त्यानी त्या मुलांना वचन दिले की जो कोण त्याचे घड्याळ  शोधून देईल,त्याला बक्षिस मिळेल.....

    बक्षिस मिळेल, हे ऐकून सगळी मुले कोठारात लगबगीने गेली, गवताच्या चारी बाजूने शोधायला  लागली पण त्यांना घड्याळ  कुठेही सापडेना.

   नेमके जेंव्हा त्या शेतकर्‍याने घड्याळाचा  शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ जाऊन शेतकर्‍याकडे शोधण्याची एक संधी मागू लागला.

    शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला की "बिघडले कुठे...!  हा मुलगा प्रामाणिक दिसतोय. देऊ या त्याला एक संधी........"

    शेतकर्‍याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा शोध घेण्यासाठी कोठाराट पाठवले.  

   थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन नाचत नाचतच बाहेर आला. शेतकऱ्याला आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले.........!

    त्याने त्या मुलाला विचारले की जिथे बाकीच्यांना अपयश आले, तिथे त्याला हे यश कसे काय प्राप्त झाले...!!
    मुलगा म्हणाला, “मी काहीच नाही केल, पण जमिनीवर शांत बसून राहिलो आणि ऐकू लागलो. त्या शांततेत मला घड्याळाची टिक-टिक ऐकू आली आणि मी त्या दिशेने शोधू लागलो.”
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
*एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा चांगलं विचार करू शकते.*
    तुमच्या मनाला रोज काही क्षणांसाठी तरी शांतता द्या आणि मग पहा, तुमच्या अपेक्षेप्रमाणे

 तुमचे मन तीक्ष्णपणाने काम करून तुमचं जीवन कसे सजवते.

--------------

झाकली मुठ सव्वा लाखाची

एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजार्‍याला कळले... त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले सजवले रंगवले.🛕राजा पूजेला आला  आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणे ठेवले. पुजार्‍याला तिथेच घाम फुटला. आपण सहा हजार कर्ज काढून मंदीर रंगवले आणि राजाने फक्त चार आणे दक्षिणा ठेवली...
आता या चवण्णीछाप राजाला अद्दल घडवायचीच.
पुजारी हुशार होता... राजा गेल्यावर पुजार्‍याने ते चार आणे मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला...
"राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे. ती मला झेपणार नाही. म्हणून मी तिचा लिलाव करतोय. आपापली बोली लावा." आता राजाने वस्तू ठेवलीय म्हणल्यावर साधी ठेवली असेल का... ? पहिलीच बोली दहा हजार पासून... सुरु झाली. पुजारी डोके हालवूनच 'नाही परवडत' असे म्हणत होता. लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोचली.
तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला, "महाराज, पुजाऱ्याने आपण मंदीरात दान केलेल्या वस्तूचा लिलाव सुरु केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि सांगतही नाही, मुठीत ठेवलीय..."
राजाला घाम फुटला.  
तो पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला,
"हे माझ्या बाप्पा, सव्वालाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नको...."
तेव्हा पासून ही म्हण रुजू झाली....

 झाकली मूठ🤛 सव्वालाखाची.

-----------------

ससा आणि कासव


 उंदराची टोपी
   एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला 'धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. 'शिंपीदादा, 'शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.

उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ' राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !' राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ' जा रे, त्या उंदराला पकडून आणा.   

शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला 'राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !'

हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला 'राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !' हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.

तात्पर्य:  शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

 ----------------

 

 

-------------/---------
 
--------------------------

वचन

हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री, एक अब्जाधीश रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला विचारले, " तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का? तूम्ही तर थंडीचे स्वेटरही घातलेले नाहीये?"

तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले, "माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे." अब्जाधीश म्हणाला, "थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो"

थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की "साहेब खूप उपकार होतील " अब्जाधीश घरी गेल्यावर काही तरी कामात स्वेटर चे विसरून गेला.

सकाळी त्याला त्या गरीब म्हातार्‍याची आठवण .झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथे गेला. परंतु म्हातारा जीवघेण्या थंडीने कडकडून मरण पावला होता.

अब्जाधीश माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिट्ठी दिसली. त्याने ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिले होते, “ साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे, स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडीविरुद्ध लढण्याचे मानसिक शक्ती होती. परंतु जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडी पासुन संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेने माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती संपली"

*तात्पर्य:*
 *जर आपण एखाद्याला दिलेला शब्द, आश्वासन, वचन पाळू शकत नसू तर ते देऊ नका. दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्वाचा नसला तरी तो दुसर्‍या एखाद्या व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो.*

--------------------------



------------///--------///------ 




--------------------
 




----------------//--/-----/-/------



-//-//-/////////----


----/----/--/ /-/------


----////////-------


-----------------


.........................


..................................

------------------------

एका खेड्यात एक महाराज रोज शेतातल्या विहिरीतून पाणी भरून घेऊन घरी यायचे . यासाठी ते दोन बादल्या काठीला बांधून नेत असत. विहिरीवर दोन्ही बादल्या भरून ते घरी जायला निघे. माञ त्यातील डाव्या बाजूच्या बादलीच्या तळाशी एक बारीक छिद्र पडलेले असल्याने त्यातून थेंब थेंब पाणी गळायचे. महाराज घरी जाईपर्यंत त्या छिद्रवाल्या बादलीतून निम्मे पाणी वाटेत सांडून जायचे. 
असे रोज व्हायचे. एके दिवशी त्या गळक्या बादली कडे पाहून चांगलीवाली बादली म्हणाली, "बघ, मी किती महाराजांच्या उपयोगी पडते. पूर्ण पाणी त्याच्या घरापर्यंत नेते. नाहीतर तू पहा, निम्मे पाणी वाटेत सांडत येते"
हे ऐकून त्या छिद्रवाल्या बादलीला वाईट वाटते. दुसऱ्या दिवशी महाराज जेव्हा दोन्ही बादल्या घेऊन विहिरीकडे निघाले , तेव्हा ती गळकी बादली महाराजांना म्हणते, "मी तुमची मेहनत वाया घालवते आहे. निम्मेच पाणी घरापर्यंत मी नेतेय. तर तुम्ही मला टाकून देऊन नवीन छान बादली का घेत नाही. ?"
यावर महाराज हसून सांगतात , "वेडी आहेस का ? तुला माहित नाहीये कि तू किती छान काम नकळत करते आहेस. नीट पहा, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूच्या कडेला छान छान हिरवळ फुलली आहे. त्यात छान छान फुले देखील उगवली आहेत. ही डावी बाजू पहा किती चैतन्याने रसरसलेली आहे. ही तुझ्या बाजूची डावी बाजू आहे. ही तुझ्या त्या गळक्या थेंबाची कमाल आहे आता उजव्या बाजूला पहा. त्या बाजूच्या बादलीतून एकही थेंब गळत नसल्याने त्या साईडला कसलिही हिरवळ उगवलेली नाही. फुले तर नाहीच नाही !!
गेल्या अनेक महिन्या पासून मी देवपूजेसाठी जी फुले नेतोय ती याच डाव्या बाजूची आहेत. माझ्या या देव कार्यात तुझ्यामुळेच जी फुले फुलली त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस !! 
हे ऐकून ती गळकी बादली शहारली. मनापासून आनंदित झाली !!
💐 : दोष कोणात नाहीत ? सगळ्यात आहेत. त्यामुळे मी चांगला, तो वाईट, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या दोषातून जर कधी कोणाचे भले होत असेल तर तो दोष त्या व्यक्तीने "अभिमानाने" मिरवावा. आधी थोडा काळ इतर लोक याला नावे ठेवतील. पण अंतिम सत्य पाहिल्यावर तेही नतमस्तक होतील !!

समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!
--------------
कोल्हा आणि कोंबडी

 एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’

तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्‍याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.
---------------------


----------------------------------
--------------------------------



----–--------------------------------

----------------------------------

----------------------------------
एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.’ हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.

तात्पर्य

– जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे. 
------------------------


 
---------///------------

-----------------------------------

----------------------------------------------


------------------------------

---------------------------------

--------------/-----------------

-------------------------------------

---------------------------------------

-------------------------- -------  -- --------

-----------------------
*एकदा बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला, म्हणून बादशहानं त्याला विचारलं, ‘बिरबल ! तू एवढा शिस्तीचा माणूस असताना, तुला राज दरबारात यायला उशीर का झाला ?’बिरबल म्हणाला, ‘काय सांगू खाविंद ? आज माझा लहान मुलगा हट्ट धरुन बसला. काही केल्या त्याची समजूत म्हणून पटेना. अखेर कशीबशी समजूत घालून, मी तसाच घॊड्यावरून दौडत इकडे आलो.’‘बिरबल, पोराची समजूत घालण्यात वेळ गेला व म्हणून तुला दरबारात यायला उशीर झाला, हे तुझं म्हणणं पटण्यासारखं नाही. हे बघ, तुझी परिस्थिती चांगली आहे; तुझ्याकडे नोकरचाकर आहेत; तेव्हा मुलानं जरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला असला, तरी पैसे देऊन ती गोष्ट त्याला आणून द्यायला एखाद्या नोकराला सांगायचं, आणि तू पटकन इकडे निघून यायचं.’बिरबल म्हणाला, ‘ जहॉंपन्हा, आपली परिस्थिती तर माझ्यापेक्षा हजारपट चांगली आहे ना ? आपल्याकडे तर शेकडो नोकरचाकर आहेत ना ? मग आपण असं करु या; आपण माझे तात्पुरते वडील व्हा आणि मी तात्पुरता आपला लहान मुलगा हट्ट धरुन बसतो. मी धरुन बसेन तो माझा हट्ट तुम्ही पुरवा. अट एकच कुठल्याही परिस्थितीत आपण मला मारायचं नाही. नाहीतर आलेल्या संधीचा आपण तेवढाच फ़ायदा उठवाल. आहे कबूल ?’‘हात्तिच्या ! एवढंच ना ? होऊन जाऊ दे.’ बादशहा बोलून गेला. लगेच बिरबल एखाद्या लहान मुलाप्रमाणे हात-पाय झाडीत व रडत म्हणाला ‘आम्हाला ऊस हवा जा ऽ ऽ !’*

*बादशहा – (सेवकाकडे बघून) अरे बझारसिंग ! माझ्या बाळासाठी ऊस आणून दे पाहू ? (ऊस येताच) हा बघ आणला ऊस. तो घे आणि चूप रहा*.

*बिरबल – ( रडण्याचा सूर वरच्या पट्टीत नेत) आम्हाला ऊस असा नको जा ऽऽऽ! त्याचे खंड खंड करुन हवेत.*

*बादशहा – ( दुसऱ्या सेवकास) अरे खंडोजी ! सुरा आणून, तू माझ्य चिमूरड्याला या उसाचे खंड खंड करुन दे पाहू ? (सेवकाने तसे करताच) हे बघ दिले तुकडे तुकडे करुन. कर आवाज बंद. काय रे ? आता का उगाच केकाटतोस ?*

*बिरबल – (आवाज पूर्वीपेक्षा चढवून) आता आम्हाला अखंड ऊस हवा जा ऽऽऽ! असे तुकडे तुकडे केलेला नको !*

*बादशहा – (सेवकास) अरे ऊसखॉं ! माझ्या छकुल्याला अखंड ऊस दे पाहू ? ( दिला जाताच) आदळला ना तुझ्या टाळक्यावर अखंड ऊस ? मग आता का बोंबलतोस ?*

*बिरबल -(रडण्याचा सूर टिपेला नेत) आम्हाला नवा अखंड ऊस नको जा ऽऽऽ ! खंड खंड केले आहेत ना त्या खंडाचाच पुन्हा पहिल्यासारखा अखंड ऊस करुन हवा. ऑं ! ऑं ! ऑं*

*बादशहा – (भडकून) आता मात्र रडलास, तर त्या उरलेल्या अखंड ऊसानंच झोडपून काढीन.*

*बिरबल – (एकदम ठाकठीक बसून) खाविंद, मारण्याच्या गोष्टी न करता तुम्ही हट्ट पुरवायचा, असं ठरलं होतं ना ? मग आता माराची धमकी का देता ?*

*बादशहा – नाही रे बाबा, शरण आलो मी तुला. वाटल्यास दरबारात यायला दररोज उशीर कर; पण माझ्या डोक्याची शीर आता तू उठवू नकोस.’ बालहट्टापुढं शरणागती पत्करावी लागते,’ हे तुझं म्हणणं मी मान्य केलं; मग तर झालं?*

*तात्‍पर्य-बाल हट्टापुढे भले भले माथा टेकतात.*
---------/////////----------

---------------------

------------------------------------------
एक सुंदर बोधकथा

 *अंधारात कसा चढणार डोंगर?*
  
    तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने....

   रात्रिस गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला.  तो तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला.... इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला.

   'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता.

   शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.''
म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?''

   ''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.''

   म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा! 
वाट पाहात बसून कशाला राहायचं?

      *🌀तात्पर्य ::~*
  जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.
-----------------------------------------




------------------

----------------------------


------------------

--------------------------
कुत्रा आणि भाकरी
एक होता कुत्रा. त्याचे नाव होते शेरू. त्याला खूप भूक लागली होती. तो भाकरीच्या शोधात भटकत होता. खूप फिरल्यावर त्याला एक भाकरीचा तुकडा मिळाला. शेरू खूप खूश झाला. दुपार झाली होती. ऊन तापले होते. ही भाकरी शांतपणाने खावी म्हणून तो सावलीकडे निघाला. तोंडात भाकरीचा तुकडा होता.
शेरूला नदी पार करून जायचे होते. नदीवर एक छोटा पूल होता. शेरू पुलावर आला. जाता जाता त्याने पाण्यात पाहिले. पाण्यात एक कुत्रा दिसला. त्याच्याही तोंडात भाकरीचा तुकडा होता. तो तुकडा पाहून शेरूच्या तोंडाला पाणी सुटले. पाण्यातला कुत्रा मरतुकडा होता. या कुत्र्याकडून भाकरीचा तुकडा मिळविता येईल, असे शेरूला वाटले. तो तुकडा आपल्याला मिळाला तर बहारच येईल. त्यासाठी थोडे प्रयत्न करायला हवेत. थोडे भुंकले की दुसरा कुत्रा भाकरी टाकून देईल. ती भाकरी आपल्याला मिळेल. दोन्ही तुकडे मग आपल्याला खाता येतील. आपले चांगले पोट भरेल.
पुलावर उभ्या असलेल्या शेरूने विचार केला. वेळ घालविणे योग्य नाही म्हणाला. तो पाण्यातल्या कुत्र्यावर जोराने भुंकला.
भुंकण्यासाठी शेरूने तोंड उघडताच त्याच्या तोंडातील भाकरीचा तुकडा पाण्यात पडला. शेरूने खाली वाकून पाहिले. भाकरीचा तुकडा वाहून गेला. त्याने पाण्यातील कुत्र्याकडे पाहिले. त्याच्याही तोंडात भाकरीचा तुकडा नव्हता.https://t.me/MarathiBodhkatha
शेरू निराश झाला. दुसरा तुकडा मिळविण्याच्या नादात तो पहिलाही तुकडा गमावून बसला.
त्याला खूप भूक लागली होती; पण आता काही पर्याय नव्हता.”
       “शेरू पुलावरून खाली उतरला. नदीत गेला. गार पाणी पिऊन थोडा शांत झाला. सावलीत बसण्याऐवजी भाकरीच्या शोधात पुन्हा भटकायला निघाला.
बोध-लोभ करू नये. अतिलोभामुळे
आहे तेही गमवावे लागते.”
--------------------------
*आपले व्यकतिमत्त्व खुलून दाखवणारा सर्वोत्तम गुण!*

एकदा आम्ही एका कॅफे मध्ये गेलेलो. 
तिथला एक वेटर आम्हाला वाढत असताना त्याच्याकडून चुकून माझ्या एका मित्राच्या पांढऱ्या शर्टवर साॅस सांडला. एका क्षणासाठी दोघेही स्तब्धपणे त्या डागाकडे बघत राहिले. 
वेटर घाबरून म्हणाला, “मला माफ करा सर, तुम्ही माझ्याबरोबर वाॅशरूममध्ये या, मी तुम्हाला हा डाग साफ करून देतो. घाबरून त्याला घाम फुटला होता. 
माझा मित्र ह्यावर हसत म्हणला, “ठीक आहे, होते असे कधीकधी, मला फक्त वॉशरूम कुठे आहे ते सांग, मी करतो हा डाग साफ.” 
मित्र मागे वळून परत वेटरला हसत म्हणला, “काळजी नको करु, मी टीप द्यायचा  विचार बदलणार नाहीये. 
त्यावर वेटरही हसला.

खूप दिवस होऊन सुद्धा धोब्याने कपडे दिले नाहीत म्हणून आम्ही त्याच्याकडे गेलो. धोब्याने कपडे दिले आणि घाबरत घाबरत एक शर्ट जळलाय सांगत आम्हाला दाखवला.  
मित्र त्या ५०-६० वर्षाच्या धोब्याच्या थकलेल्या आणि सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, “काही हरकत नाही काका, त्या निमिताने तुम्ही मला एक नवीन शर्ट घेण्याचे कारण दिले.” त्याने हसून त्याचा हात धरला व घाबरलेल्या त्या धोब्याला धीर आला.
बरेच दिवस झाले आमच्या बिल्डिंगचे वाॅचमन आले नाहीत म्हणून माझा मित्र त्यांच्या घरी गेला. तिथे गेल्यावर त्याला कळले की ते आजारी होते आणि त्यांच्या मुलीचे लग्न अगदी तोंडावर आले होते. 
तो पूर्ण दिवस तिथेच राहिला आणि त्यांच्या मुलाला  लग्नाच्या तयारीसाठी त्याने मदत केली. लग्नाच्या दिवशीसुद्धा पाहुण्यांचे अगत्य आणि मानपान करण्यासाठी तो सज्ज होता. 

*सहानुभती म्हणजे इतरांच्या वेदनांची जाणीव होऊन त्यात एकरूप होत, त्यांना आनंद देण्याची कला आहे.*
कोणाचा तरी दिवस चांगला बनवण्याचा तो एक प्रत्यत्न आहे. 

अत्यंत महत्त्वाची, पण तरीही कमी लेखली जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे सहानुभूती

आपले व्यक्तीमत्त्व खुलून दाखवणारा असा हा गुण अंगी  बाळगणे सहज शक्य आहे. 
त्यासाठी पैसा लागत नाही आणि श्रम ही लागत नाही. 
बघा तर मग, आजपासून कुठे सहानुभूतीने वागण्याची संधी मिळते का ते?
------------------------------
कृतघ्न मित्र

एका जंगलात एक मोठे तळे होते. त्या तळ्याकाठी एक जांभळाचे मोठे झाड होते. त्या झाडावर एक माकड राहत होते. त्याचे नाव होते दामू. जांभळाच्या दिवसात जांभळे खायची आणि झाडावरच राहायचे असा त्याचा दिनक्रम असायचा. दामूला एकाच गोष्टीचे वाईट वाटायचे. त्याला कुणी मित्र नव्हता. जंगलातील सर्व प्राणी तळ्यावर पाणी प्यायला यायचे. त्या प्राण्यांशी दोस्ती करण्याचा दामू प्रयत्न करायचा; पण कुणीच त्याच्याशी बोलत नसायचे.
तळ्यात काही मगरी राहत होत्या. त्यातील एक मगर एके दिवशी फिरत फिरत जांभळाच्या दिशेला आली. या मगरीचे नाव होते राणू. राणूला मित्र नव्हते; पण त्याचा परिवार होता. दामूसाठी राणू नवीन होता. राणूशी गप्पा माराव्या म्हणून दामूने त्याला आपल्याकडे बोलावले. राणू आला. राणू आणि दामू चांगलेच गप्पा मारू लागले. बऱ्याच वेळानंतर राणू तळ्यातील आपल्या घरी जायला निघाला. दामूने त्याला थोडी जांभळे दिली. राणूला जांभळे गोड लागली.
आता राणू रोज दामूकडे यायला लागला. राणू आला की दामू त्याला गोड गोड जांभळे खायला द्यायचा. मग खालच्या फांदीवर येऊन तो गप्पा मारायचा. दोघं तासन्तास गप्पा “मारायचे.
एके दिवशी राणू म्हणाला, ‘तू मला रोज गोड जांभळे खायला देतोस. मी मात्र तुला काही देऊ शकलो नाही. तू माझ्या घरी चल. तेवढीच मला तुझी सेवा करण्याची संधी मिळेल.’
‘‘मी जमिनीवर राहतो. मला पाण्यात राहता येत नाही. मी कसा तुझ्या घरी येणार?’ ’ दामूने विचारले.
‘‘मी तुला माझ्या पाठीवर घेऊन जाईल. तू नाही म्हणू नको.’’
राणूने विनंती केल्यावर दामू तयार झाला. झाडावरून उडी मारून राणूच्या पाठीवर बसला. दामूला पाठीवर घेऊन राणू खोल पाण्यातील आपल्या घराकडे निघाला.
बरेच अंतर गेल्यावर राणू दामूला म्हणाला, ‘मित्रा, मी तुला जेवणासाठी नेत नाही तर ठार मारण्यासाठी नेत आहे. तू दिलेली जांभळे माझ्या पत्नीने खाल्ली. तिला ती आवडली. रोज जांभळं खाल्ल्यामुळे तुझे हृदय तर जांभळाहून गोड झाले असणार. माझ्या पत्नीला तुझे हृदय खायचे आहे. त्यासाठी मी तुला नेत आहे.’
हे ऐकताच दामू घाबरला. पळून जाणे शक्य नव्हते. जीव वाचविण्यासाठी काही तरी युक्ती करायला हवी म्हणून तो विचार करू लागला. जरा वेळाने तो राणूला म्हणाला,
‘‘मित्रा, तुझ्या पत्नीला माझे हृदय हवे हे आधीच का सांगितले नाही. आता मला नेऊन तुझा काहीच फायदा होणार नाही. कारण मी माझे हृदय जांभळाच्या झाडावर एका ढोलीत दडवून ठेवले आहे.’
हे ऐकल्यावर निराश होऊन राणू परत फिरला. दामूला पाठीवर घेऊन तो वेगात जांभळाच्या दिशेने निघाला.
जांभळाचे झाड दिसताच दामूच्या जीवात “जीव आला. त्याने वेगात उडी मारून जांभळाची फांदी धरली आणि सरसर चढत वर जाऊन बसला.
बोध-अगदी जीवावर बेतले तरी घाबरून न जाता युक्तीचा वापर करावा.”
-----------------------

-------------/----------------
एका सोनाराच्या मृत्यूनंतर  त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- "बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला काही पैसे द्या."

मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाले - "बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास, तुम्हाला चांगला भाव मिळेल." त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, “तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा.”

दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिर्यान्ची आणि रत्नांची पारख कशी करायची, ते  शिकू लागला.

थोड्याच दिवसात, तो हिऱ्यांचा मोठा पारखी झाला. आपल्या हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी, दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे येऊ लागले.

एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, "बेटा, तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग की आता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल."

आईकडून तो हार घेऊन, त्याने स्वत:च त्याची पारख केली असता तो हार नकली असल्याचे त्याला आढळून आले. त्याला आश्चर्य वाटले, की काका स्वत: हिऱ्याचे व रत्नांचे मोठे पारखी आहेत... मग त्यांनी आम्हाला हे का सांगितले नाही?
  
मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला.

काकांनी विचारले, "अरे तू हार का आणला नाहीस?" तो म्हणाला, "काका, तो हार तर नकली आहे... परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत?"

तेव्हा काका म्हणाले, "जेव्हा तू पहिल्यांदा हार आणला होतास, तेव्हा जर मी तो हार नकली आहे असं सांगितलं असतं, तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे, म्हणून काका मला असं सांगत आहेत.

पण आज जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय, हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे, तेव्हा तुला समजलेच असेल की तो हार खरोखरीच नकली आहे. त्यावेळी खरं बोलण्यापेक्षा, नातं सांभाळणं, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं."

सत्य हे आहे की या जगात, खर्या ज्ञानाशिवाय आपण जो काही विचार करतो, पाहतो आणि जाणतो ते चुकीचे आहे. आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना बळी पडून आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं.

ज्या अदृश्य धाग्याने नाते विणले जाते त्याचे पोषण, हे प्रेम आणि विश्वासावर होत असते.

"नात्यात निर्माण झालेल्या थोड्याशा दुराव्यामुळे, कोणाचीही साथ सोडू नका... नाहीतर लोकांना आपलेसे करण्यात आयुष्य खर्ची करावे लागते."

                  ♾
                     
*सत्य अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करा, की ज्यामुळे इतरांमधे प्रेम निर्माण होईल.
------------------------------------
***
*संबंध* 
          

एके दिवशी मी माझ्या मित्राचा तात्काळ श्रेणीतील पासपोर्ट बनवण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो. 

रांगेत उभा राहून आम्ही पासपोर्टचा तात्काळ फॉर्म घेतला. फॉर्म भरून आम्हाला बराच वेळ झाला होता. आता आम्हाला पासपोर्टची फक्त फी जमा करायची होती.

परंतु आमचा नंबर आल्याबरोबर क्लार्कने खिडकी बंद केली व सांगितले आजची वेळ संपली आहे, उद्या या.

मी त्याला विनंती केली की आजचा संपूर्ण दिवस आम्ही इथे थांबलो आहोत आणि आता फक्त फी भरायची राहिली आहे, कृपया फी जमा करून घ्यावी.

क्लार्क चिडून म्हणाला, “तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस इथं घालवला याला मी जबाबदार आहे का? इथे सरकारने कामाकरता ज्यादा माणसे नेमली पाहिजेत. मी सकाळपासून इथे कामच तर करतोय ना."

माझा मित्र खूपच निराश झाला, तो म्हणाला, "चल आता उद्या परत येऊ." मी त्याला थांबवले व म्हणालो मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो, थांब जरा.

क्लार्कने आपली पिशवी उचलली व चालू लागला. मी त्याला काही बोललो नाही पण गुपचूप त्याच्या मागे मागे चालू लागलो. तो कॅन्टीनमध्ये गेला त्याने आपल्या पिशवीतून जेवणाचा डबा काढला व एकटाच सावकाश जेवू लागला.

मी त्याच्या समोरच्या  बाकावर बसलो व त्याच्याशी बोलू लागलो. मी म्हणालो, "तुम्हाला तर खूप काम आहे तुम्ही दररोज वेगवेगळ्या लोकांना भेटत असाल?” तो म्हणाला, “होय. मी तर मोठ मोठ्या अधिकाऱ्यांना भेटतो. कित्येक आय. ए. एस., आय.पी.एस., आमदार रोज इथे येतात व माझ्या खुर्चीसमोर भेटण्याची वाट पाहत असतात.
       
नंतर मी त्याला म्हणालो की तुझ्या ताटलीतील एक पोळी मी खाऊ का? तो हो म्हणाला. मी त्याच्या ताटलीतील एक पोळी उचलली व भाजीबरोबर खाऊ लागलो.

मी त्याच्या जेवणाचे कौतुक केले आणि म्हणालो, "तुमची पत्नी खूपच रुचकर जेवण बनवते." त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं व जेवण पूढे चालू ठेवले. 

मी त्याला म्हणालो तुम्ही खूप महत्त्वाच्या पदावर आहात. खूप मोठी माणसं तुमच्याकडे येतात. तुम्ही आपल्या पदाचा (खुर्चीचा) मान राखता का? तुम्ही खूप भाग्यवान आहात की एवढी महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे पण तुम्ही तुमच्या पदाचा मान राखत नाही.

तो मला म्हणाला, "तुम्ही असं कसं  म्हणू शकता ?" 

मी म्हणालो, " *तुम्हाला तुमच्या कामाबद्दल आस्था असती, तर तुम्ही इतके कठोर वागला नसता.”बघा तुम्हाला कोणी मित्रही नाहीत. ऑफिसच्या कँटीनमधे तुम्ही एकटेच जेवत बसला आहात. ऑफिसमधे पण आपल्या खुर्चीवर देखील तुम्ही उदास बसलेले असता. लोकांची कामं पूर्ण करण्याऐवजी तुम्ही अडथळा आणण्याचा प्रयत्न करता.* 

बाहेर गावाहून लोक येतात, सकाळपासून काम होण्याची वाट पाहून कंटाळलेले असतात. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा विनंती करतात आणि तुम्ही त्यांना कठोरपणे म्हणता,"सरकारला सांगा कामासाठी जादा माणसं नेमा."

अरे जादा माणसं नेमली तर तुमचे महत्त्व कमी नाही का होणार? कदाचित हे कामही काढून घेतले जाईल. 

 *आपापसातील संबंध वाढविण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे.* पण तुमचं दुर्दैव की याचा फायदा घेण्याऐवजी तुम्ही संबंध बिघडवत आहात. मला काय, मी उद्या येईन, परवा येईन.
पण तुम्हाला चांगली संधी आली होती कुणावर तरी उपकार करण्याची... ती संधी तुम्ही घालवलीत. 

मी म्हणालो, तुम्ही पैसा तर भरपूर मिळवाल पण नातेसंबंध जपले नाहीत तर सगळं व्यर्थ आहे. 

काय करणार पैशांच? तुमच्या रूक्ष वर्तनाने तुमची घरची माणसे पण दुरावतील आणि आधीच तुम्हाला मित्र पण नाहीत. 

माझ बोलणं ऐकल्यानंतर तो रडवेला झाला. तो म्हणाला, "साहेब, आपण खर बोललात. खरोखरच मी एकटा आहे. बायको भांडण करून माहेरी गेलीय. मुलांनाही मी आवडत नाही. आई आहे, पण तीही माझ्याशी जास्त बोलत नाही. सकाळी ती चार पाच पोळ्या करून देते आणि मी एकटाच जेवण करतो. रात्री घरीसुद्धा जावसं वाटत नाही. समजत नाही की माझं कुठं चुकतंय?

*मी त्याला शांतपणे सांगितलं, "लोकांशी चांगले संबंध ठेवा. कोणाला मदत करता येत असेल तर करा." बघा इथे मी माझ्या मित्राच्या पासपोर्टसाठी आलो आहे. माझ्याजवळ माझा पासपोर्ट आहे पण माझ्या मित्राला मदत म्हणून मी तुम्हाला निरपेक्षपणे विनंती करतोय. त्याच्यासाठी धडपडतोय. म्हणून मला मित्र आहेत, तुम्हाला नाही.* 
           
तो उठला व म्हणाला या माझ्या खिडकीसमोर. तुमचा फॉर्म मी आजच जमा करतो. त्याने आमचे काम केले. नंतर त्याने माझा फोन नंबर मागितला, मीपण दिला.

मधे कित्येक वर्षे गेली. 

अचानक रक्षाबंधनाच्या दिवशी एक फोन आला... 

साहेब, मी रविंद्रकुमार चौधरी बोलतोय, "काही वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या मित्राच्या पासपोर्टसाठी आला होतात आणि माझ्या बरोबर जेवलापण होतात. त्यावेळी तुम्ही मला
सांगितले होते की *पैशांऐवजी नातेसंबंध जोडा.* "
      
हां हां ,चौधरी साहेब, आठवलं, "बोला, कसे आहात तुम्ही?”

खुश होऊन तो म्हणाला, "साहेब त्यादिवशी आपण निघून गेलात मग मी खूप विचार केला. मला जाणवलं की खरोखर पैसे तर बरेच लोकं देऊन जातात, पण आपल्याबरोबर जेवणारा एखादाच भेटतो. दुसऱ्याच दिवशी मी पत्नीच्या माहेरी गेलो व तिला आग्रह करून घरी घेऊन आलो. ती तयारच नव्हती. ती जेवायला बसली होती तेव्हा मी तिच्या ताटातील एक पोळी उचलली व तिला म्हणालो मला पण खाऊ घालशील का?

ती चकित झाली, रडायला लागली. माझ्याबरोबर येण्यास तयार झाली. मुले पण आली.

साहेब, आता मी नुसता पैसे नाही कमवत..नाती जोडतो.

साहेब, आज तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याकरता फोन केला. कारण तुम्ही मला माणसं कशी जोडायची ते शिकवलं. 

पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न आहे. तुम्हाला यावं लागेल, मुलीला आशीर्वाद द्यायला. आमच्याशी संबंध जोडलाय तुम्ही. 

तो बोलत राहिला, मी ऐकत राहिलो. मला वाटलं नव्हतं की त्याच्या जीवनात पैशांपेक्षा नातेसंबंधाना इतके महत्त्व प्राप्त होईल.

*मित्रांनो, माणूस भावनेवर जगत असतो, नियमांवर नाही. नियमांवर तर मशीन चालतात............................
------------////------///----------
*स्त्री आणि गणित*

. *नतमस्तक तिच्या चरणी मी*
 *अगाध तीची गाथा*
*साहुनी सारी कष्ट अन वेदना* 
*अशी स्त्री ही जगन्माता..* 

 एकविसावं शतक म्हणजे मानवाने आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठला आहे पण त्यात स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक भेदाला जे विकृत वळण दिले आहे,  ते त्या मानवी प्रतिष्ठेचा  अपमान करण्यासारखे आहे. तिच्या उदरातून आपला जन्म झाला त्या आईच्या नात्या पासून आपण जगातील नाती जगायला आणि पाहायला लागलो, पण तो  तिची जन्माची नाळ तोडायला निघाला.... पण खरंच ती तोडता येईल काय? पुरुषांनी  चालवलेला हा भेदाभेद घरापासून सुरू होतो. प्रत्येक आई-वडिलांना आधी मुलगाच व्हावा  असं वाटतं कारण तो  वंशाचा दिवा,  घराण्याचा वारस.असतो ... मुलगी काय शेवटी परक्याचं धन.. आई वडिलांचे नाव थोडेच पुढे नेणार म्हणून मुलीची ऊपेक्षा मग स्त्रीला जगणे मुश्कील होतं आणि मग समाजाच्या दृष्टीने स्त्री ही प्रत्येक बाबतीत पुरुषांच्या मानाने दुबळी  मानली  जाते आणि हे चित्र फक्त समाज, संस्कृती इथेच नाही तर अगदी प्रसारमाध्यमे याला खतपाणी घालताना दिसतात...  टीव्हीवर सध्या दाखविण्यात येणाऱ्या प्रत्येक मालिकेत कुटुंबातले राजकारण दाखवलं जातं आणि त्यात खलनायिका असते त्या घरातली  घरंदाज कर्ती स्त्री.... 
 एकीकडे घरातील लाखोंची उलाढाल ती करते पण तितकच त्यात कूटनीतीचा राजकारणी ती करते आणि आपण स्रिया या मालिका  अगदी आवडीने पाहतो.. सब टीव्ही वर एक मालिका चालू होती   *तारक मेहता का उल्टा चश्मा* यात आत्माराम भिडे या शिक्षकाचे कुटुंब... त्याची बायको त्याला कूकरच्या चार शिट्या झाल्यावर गॅस बंद करायला सांगते. त्यावर तो म्हणतो, मी गणिताचा शिक्षक आहे म्हणून का कुकरच्या शिट्ट्या मोजत बसू का.? येथे विनोद झाला म्हणून आपण हसत असतो.. पण यातून सिरीयल कर्त्याला  काय सूचित करायचं की स्त्रीने फक्त  कुकरच्या शिट्ट्याच  मोजायच्या ... तर एका कवीने सुद्धा... स्रियांना  गणित शिकवलं नाही तर त्या कुकरच्या शिट्ट्या कशा मोजणार म्हणून विनोद  केला.
 तर अशी ही स्त्री..  एकीकडे म्हणायचे की *परमेश्वराच्या अगाध  लीलामधून साकारलेली मुर्तिमंत, अतिशय लावण्याची सौंदर्याची,  प्रत्यक्ष परमेश्वराची प्रतिकृती आणि दुसरीकडं तिला चढवायचा दुषणांचा साज..*  तिने मात्र हे सर्व सहन करायचं, नव्हे तर  तिला सहन करायला लावायच आणि म्हणायचं स्त्री  खूप महान आहे,  ती भावनेचा अधिष्ठान आहे. म्हणूनच तर तिचं स्थान मानाचआहे..
 तिने स्वीकारलय की, 
 
*जीवन मे आये है तो जीना ही पडेगा* 
*जीवन है जहर तो पीना  ही पडेगा* 
त्यामुळे ती स्वतःच्या अस्तित्वाची भाग्यरेषा शोधून चौकटीपलीकडे विश्व शोधण्याचा प्रयत्न करू लागली आहे.. नाती जोपासताना तडजोड करते आहे. स्वतः स्वतःची लढाई करून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करू लागली आहे. तिच्याकडे असलेल्या सर्जनशीलतेचा उपयोग करून" चूल आणि मूल" या ही पलीकडच्या तिच्या अस्तित्वाची जाणीव जगाला करून देऊ लागली आहे. याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत..
. *पुरुषप्रधान संस्कृतीचा  अभिमान मिरविणाऱ्या,  पुरुषाला कुंकवाच्या धन्याला हे तिने दाखवून दिले की,  तुम्ही अर्धवट सोडून गेला तर मी तुमचं कुटुंब तितक्याच ताकदीने पेलून धरण्यासाठी ताकद बाळगून आहे*, याचे उदाहरण म्हणजे *पतीच्या मागे रेल्वे चालक म्हणून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करणारी अनिता  नामक स्त्री..*  
 पुर्वी घराच्या बाहेर न पडणारी स्त्री अगदी मोलमजुरी करण्यापासून तर देशाची धुरा सांभाळण्या पर्यंतची काम करु लागली आहे आणि प्रत्येक कामातील तिची  *जिद्द चिकाटी वक्तशीरपणा प्रामाणिकपणा सिद्ध करू लागली.*  मागेच मी तुम्हाला म्हटलं की स्त्रिया गणिताच्या बाबतीत पुरुषांच्या मागेच आहेत. गणित जमत नाही तर व्यवहार कुठून कळणार?  व्यवहार नाही तर अर्थकारण कसं समजणार?  असं म्हणणाऱ्या या समाजाला सांगावसं वाटतं,  अरे तुम्ही समाजात व्यवहार करता पण घरातल्या व्यवहाराचं काय तो तर स्त्रियांच्या हिशोब आवर चालतो...
 *घरात मुलांचा अभ्यास घेणे असो की प्रत्येकाच्या आहार-विहाराचे वेळापत्रक असो ते तिलाच करावं लागतं. कुकर मध्ये पाणी किती घालावे इथपासून ते चार माणसांना किती अन्न लागेल हा हिशोब  तिलाच  ठेवावा लागतो*
. इतकेच काय मोलमजुरी करणारी अशिक्षित स्त्री असो की चार आकडी पगार कमावणारी सुशिक्षित स्त्री असो, *पगाराचा पैसा हातात आला की घरी येताना मुलांना खाऊ घ्यावा,  संध्याकाळसाठी भाजी घ्यावी हे तिचं खर्चाचं गणित*
. *पगार झाल्यावर घरी येताना पुरुष काय गणित करतो, चार मित्रांना घेऊन हॉटेलमध्ये चहा पाजणं टपरीवर जाऊन पान सिगरेट घेणे इत्यादी इत्यादी....*

 मी म्हणत नाही की स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त हुशार आहे. व्यवहारकुशल आहे,  पण ती त्याच्याबरोबर अन्य प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे... तिच्या या प्रयत्नांना साथ हवी आहे. ती पुरुषांनी द्यावी,  समाजाने द्यावी...
 *तिला हवी  मुक्ती संघर्षापासून.... हर्षा पासून नव्हे* 
*तिला हवी मुक्ती अधोगती पासून.... गती पासून नव्हे*
 *तिला हवी मुक्ती अन्यायापासून... न्यायापासून नव्हे*
 *तिला  हवी मुक्ती बुरसटलेल्या विचारापासून....* *चांगल्या विचारापासून नव्हे....* 
 *तिला हवी मुक्ती पतीच्या मारहाणीपासून... पतीपासून नव्हे...*
 तरच खऱ्या अर्थाने आज शंभर वर्षापासून साजरा केला जाणारा हा *महिला दिन खऱ्या अर्थाने सुवर्ण दिन* म्हणता येईल. 
आजच्या महिला दिनानिमित्त *सर्व महिला भगिनी मैत्रिणी माता यांना आदरपूर्वक नमस्कार🙏 आणि शुभेच्छा*💐 
धन्यवाद......
----------------------------
*मौन साधना*
जगप्रसिध्द विचारवंत पास्कल यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की, जर माणसांनी अकारण बडबड करणं थांबवलं तर जगातील ९०% प्रोब्लेम्स कमी होतील। आपण दिवसभरात किती अनावश्यक बोलत असतो, हे ज्याचं त्यानं पहावं। मानसशास्त्र असं सांगतं की, वेड्यांना बोलायला खूप आवडतं। किंबहुना अती बोलण्यामुळेच ते वेडे झालेले असतात। वेड्यांच्या इस्पितळात जाऊन पहा, म्हणजे कळेल। सगळेच वेडे काही इस्पितळात असतात, असं थोडंच आहे....काही बाहेर ही मोकाट फिरत असतातच की...😜😜।  फक्त वेड्यांनाच असं वाटत असतं की, आपण वेडे नाही आहोत म्हणून....असो।

मग मौन रहायचं म्हणजे अजिबात बोलायचंच नाही का...तर तसं नाहीय। मौन म्हणजे गरजेपुरते बोलणे। पण माणसाचं मन नेहमी एका टोकावर जात असतं... एक तर अती बडबड करतील नाहीतर मग अजिबात बोलणारच नाही। काही माणसं फारच हुशार असतात...ते तेंव्हाच बोलतात, जेव्हा त्यांचा काही फायदा असतो। प्रत्येक घरात नवरा बायकोची भांडणे चालू असतात...त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे बोलणं... वाद विवादाच्या प्रसंगी जर दोघांपैकी एक जण मौन राहिला तर वाद कधीच विकोपाला जाणार नाहीत। पण मीच का माघार घेऊ, या अहंकारी विचाराने कुणीच माघार घेत नाही आणि त्याचे शेवटी गंभीर परिणाम भोगावे लागतात। ज्याच्या हृदयांत जास्त प्रेम असतं ना, तोच नेहमी माघार घेत असतो। इथं हरणाराच जिंकत असतो, हे लक्षात ठेवा ........

 जेव्हा एखादी स्त्री विवाह करते तेंव्हा ती फक्त पतीशी नातं जोडते, इतरांशी नाही। ती सासू सासऱ्याशी, दिराशी, वा अन्य कुणाशीही नातं जोडायला जात नाही...त्याची गरज ही नसते। कारण इतर नाती ही आपोआपच जोडली जातात। तसंच एकदा का मौन साध्य झालं की, बाकीचं सगळं कसं आपोआप जोडलं जातंय ते अनुभव घेऊन पहाच।

प्रत्येक जण असाच विचार करतो की, दरवेळी मीच का म्हणून गप्प बसायचं?? पण ज्याला नातं टिकवायचं आहे ना, तोच मौन होतो। बोलण्याने आपली अध्यात्मिक ऊर्जा त्वरित नष्ट होऊन जाते, हे लक्षात घेऊन तारतम्याने वागलं पाहिजे। आणि ह्या गोष्टी साधकाने पाळल्या पाहिजेत। जे साधक नसतील, त्यांच्यासाठी हा लेख नाहीय। त्यांनी याकडे दुर्लक्षच करावे, हे उत्तम! कारण देवाने प्रत्येकालाच आपलं आयुष्य आबाद आणि बरबाद करायचं स्वातंत्र्य दिलं आहे। प्रत्येकाचा तो मुलभूत अधिकार आहे।

लोक तेच समजतात, जेवढी त्यांची समज असते। बोलण्याआधी हा विचार करा की, हे बोलायची खरोखरच गरज आहे का? हो उत्तर आलं तरच बोला। बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करूनच बोलावं। मौनात अहंकार नष्ट होतो। प्रयोग करून पहावा ज्याचा त्यानं...एक असीम शांतता हृदयांत स्थिरावत जाते। जितकं मौन रहाल तितकं नामस्मरण ही छान होईल...सवय लावून घ्या, की मौन झाल्याबरोबर लगेच नाम सुरू होईल।

मेंदू संपावर असला की तोंड चालू रहाते। कारण उथळ पाण्यालाच खळखळाट जास्त असतो। मौन झाल्याशिवाय आतला आवाज ऐकूच येणार नाही। जोपर्यंत काही बोलायची उर्मी येत आहे, तोपर्यंत शांतच राहिलं पाहिजे। एकदा का हृदयातील वीणा झंकारु लागली की, मग कळेल मौन साधनेचं महत्व।
 शब्दांत ब्रम्ह लपलेलं आहे, म्हणून तर मंत्राची निर्मिती झालीय ना?? शब्द हे शस्त्र आहे। शब्दाने होणाऱ्या जखमा अनंत काळ ताज्या रहातात। कुणाचंही मन दुखावणे म्हणजे ईश्वरालाच दुखावणे आहे। त्याची किंमत आज ना उद्या मोजावीच लागेल, यात तिळमात्र ही शंका नाही। पण तारतम्य महत्वाचे.. 

जेंव्हा काहीच मनासारखं होत नाही ना...तेव्हा समजून जा की कुणाचं तरी मन दुखावण्याची शिक्षा चालू आहे ... ईश्वराला दुखावून त्याच्याकडूनच परत कृपा होण्याची अपेक्षा करणं, याहून दुसरा मूर्खपणा तो काय असेल?

मौन ही प्रेमाची भाषा आहे। म्हणून अध्यात्मात ध्यान हेच सर्वश्रेष्ठ आहे।  ज्याने कधी कुणावर जीवापाड प्रेम केलं असेल ना, फक्त त्यालाच मौन म्हणजे काय हे रहस्य समजेल। 

*मौन आणी क्षमा हे सर्व साधनेचे रहस्य आहे।*
-------------–-------------------
*श्रीराम सुप्रभात*
अनेक वर्षे गुरुजींच्या घरी अभ्यास पूर्ण करून विद्यार्थी घरी परत निघाला, गरीबाघरचा होता.. न्यायला कुणी येणार नव्हतं.

सकाळी गुरुजींना नमस्कार केला, म्हणाला, " गुरुजी, दक्षिणा काय देऊ ? "

गुरुजींना कल्पना होती..

ते विचारात पडले..
त्यांचा लाडका होता, जिद्दी होता.कष्टाळू होता...आश्रमात आला तेव्हा नेणता होता, आता तरुण होत असलेला, जगाच्या व्यापारात जगण्यासाठी दोन हात करायला समर्थ झालेला चेला मान झुकवून गुरूंच्या शब्दाची वाट पाहात उभा होता..

गुरुजींनी त्याच्या पाठीवर थाप मारली. म्हणाले," जा रानात. मला मुठभर वाया गेलेला पाचोळा आण गुरुदक्षिणा म्हणून...जा. "
विद्यार्थी रानात गेला. भाताच्या खाचराच्या बांधाला वाळक्या पानांचा ढिगारा लावून ठेवलेला होता. त्यानं पानं उचलली. झोळीत टाकली.
रानाचा मालक धावत आला..,"आरं आरं माज्या राज्या, टाक माघारी माजा पाचूळा..माज्या रानातला माल ह्ये त्यो. त्याचा जाळुन राब क्येला की भात अक्षी जोमात उगवतंय बग.." चेल्यानं पानं परत ढिगात टाकली... गुरुजींचे शब्द आठवले. वाया गेलेली पानं..
तसाच चालत राहिला. डोळे उघडे ठेवून सगळीकडे निरखत होता,,कुठं पाचोळा गावतोय...पण वाया गेलेली पानं ?..
एक कावळ्यांची जोडी चोचीत पानं धरून उडत होती. घरट्यात पिल्लांसाठी अंथरूण घालत होती.
ओढ्यात वहात वहात पान चाललं होतं.. त्यावर चार मुंग्या भेदरून जीव वाचवत थांबल्या होत्या.
एक भलं मोठं पान ओढत मुंग्या वारुळात नेत होत्या...
एक पान पिकून गेलं होतं. वाऱ्यावर झुलत होतं..त्यानं तोडायला हात पुढं केला खरा,,पण तो थांबला...त्या पानाच्या मागे नव्या पानाचा एक हिरवा ठिबका वाढत होता..तो किड्यांमुंग्यांपासून वाचवण्यासाठी पिकलं पान अजून तिथं थांबलं होतं..त्या पानांतील कण मुंग्यांनी नेले होते..पानाला जाळी पडली होती.
-----
संध्याकाळी दमलेला तरुण मान खाली घालून आश्रमात रिकाम्या हातांनी परतला..
" गुरुजी, रानात एकही वाया गेलेलं पान मला मिळालं नाही...."
----------------------
गुरुजींनी त्याचे दोन्ही हात हातात घेतले.
म्हणाले ," मिळाली मला दक्षिणा.
जा..जग फार मोठं आहे...तिथं वाया काही जात नाही..कळलं तुला...
आता तुला काहीही कमी पडणार नाही.
तुला तर देवानं हे दोन हात दिलेत..आणि समज सुद्धा....
---------------------------------------------------------------------------------------
दिलीप लिमये
-----------------------
आवडलं म्हणून पाठवलं
*मृत्यु ही संकल्पनाच अस्तित्वात नसती,  तर काय घडले असते?*
.......................

मृत्यू येऊच नये असे प्रत्येकाला वाटते. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलश निघाला, तो प्राशन करण्यासाठी, अमर होण्यासाठी देव-दानवांमध्ये चढाओढ लागली होती,
तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा!
मृत्यूचे भय वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, मृत्यू टाळणे अशक्य आहे. जन्म-मृत्यू हा सृष्टीचा नियमच आहे. तो कोणालाही चुकलेला नाही. तो आवश्यकही आहे. अन्यथा माणसेच माणसाच्या जीवावर उठली असती.
 कशी? ते पहा.
एका राजाने शहराबाहेर, एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले, 
`साधूमहाराज, मला अमर करू शकेल, अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का?' 
साधू म्हणाला, `हे राजा, हा समोरचा व त्यापलीकडील असे दोन पर्वत ओलांडून गेलास, की, तुला एक सरोवर लागेल. त्याचे पाणी तू पी, म्हणजे अमर होशील.'

ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला.
 त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर तो वाकला.
 तेवढ्यात त्याच्या कानावर कुणी तरी कण्हत असल्याचा आवाज आला.
पाणी पिणे बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला.
 एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेला त्याच्या दृष्टीस पडला.
राजाने त्याला कण्हण्याचे कारण विचारले. तो म्हणाला,
'या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले. परंतु वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हकलून दिले. गेली पन्नास वर्षे मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलो आहे. आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडेही मरायला टेकली असतील. हे बघावे लागू नये, म्हणून गेली पाच वर्षे मी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. तरीही मी मरत नाही.'
त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, `छे! नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं, तरच त्यात मजा आहे. आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू.'
त्याने साधूकडे पर्याय मागितला. 
साधू म्हणाला, `ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्यापुुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास, तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल. त्या वृक्षाचे एक फळ तोडून तू खा. म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल.'

साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्याने एक पिवळे धमक फळही काढले. आता तो ते फळ खायला सुरुवात करणार, तोच जवळपास भांडण सुरू झाल्याचा आवाज कानावर पडला. एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल, या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला.

तिथे त्याला चार तरुण आढळले. त्यातल्या एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले, त्यावर तो म्हणाला, `आता मी अडीचशे वर्षांचा आहे. तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले तीनशे वर्षांचे माझे बाबा, पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत. मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करू?' 
राजाने युवकाइतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचरले, तर तो म्हणाला, `अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे साडे तीनशे वर्षांचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाहीत, तर मी तरी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा.'
साडे तीनशे वर्षांच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले असता, तो म्हणला, 'मी तरी संपत्ती कुठून देणार? ही चूक माझ्या वडिलांची आहे. ते आता ४०० वर्षांचे आहेत.' 
यावर तरुण पणजोबा म्हणतात, `मी यांना संपत्ती देऊ केली, तर हे लोक माझा नटसम्राट मधला अप्पासाहेब बेलवलकर करून टाकतील.'
यावर राजा म्हणाला, `पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यांमध्ये का वास्तव्य करताय? यावर पणाजोबा म्हणाले, `आमच्या घरात दिवस रात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले आणि आम्हाला इथे राहावे लागत आहे.'

तो प्रकार पाहून राजा म्हणाला, 'म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले, तर तेही नकोच. कारण ते जास्त भयंकर आहे.' 
राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला, 'तुम्ही मला मृत्यूचे महत्त्व पटवून दिलेत. मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा माणसेच माणसांच्या जीवावर उठली असती.
 *साधू म्हणाला, 'मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे. प्रत्येक क्षणी ईश्वराची आठवण ठेवून त्याचे नामस्मरण कर. त्यातच खरा आनंद आहे आणि मृत्यूनंतर उत्तम गतीही आहे.*

*🙏🏻 नमस्कार 🙏🏻* लेखक कोण आहेत माहीत नाही परंतु लेख आवडला म्हणून सर्व वाचकांपर्यंत पोहचावा म्हणून पाठवत आहे  धन्यवाद 🌹🌹
 मृत्यु अत्यावश्यकच आहे एवढेच माझे मत आहे🙏🙏
------------------------
*आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !*😌🙂😊

*
( जरूर वाचा...सर्वांनी विचार करण्यासारखा ,अंतर्मुख करणारा लेख...! )

एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो. 

जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची 
कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत !
जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !
आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ? 🤔🤔
मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ?
पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?
निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची ....!!

थोडक्यात काय तर
दोघांपैकी एकजण गेल्यानंतर
मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे !
लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात.

आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात
स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात
परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात. 

म्हणून आता ही आपली जवाबदारी असते , त्यांच्या सारखच निस्वार्थ प्रेम करण्याची
असं झालं तरच ते जगू शकतील. 
" तो माणूस म्हणजे वडील " किंवा " ती स्त्री म्हणजे आई " असु शकते , ते तुटून जाऊ शकतात , कोलमडून पडू शकतात !

आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही 
तर ती जवाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची .......सर्वांची असते !

फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्या,   तरंच ही माणसं समाधानाने जगू शकतील !

आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? 
हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ......म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या !
केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा.

त्यांच्या जागी आपण असतो तर.....अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !
उद्या हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो 
म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !

.-------//////-------------
रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती येऊन गर्दीचा फायदा घेत गुपचूप पैसे न देता निघून गेल्याचे मी अनेकदा पाहिले आहे...
 एके दिवशी तो जेवत असताना मी गुपचूप नाश्त्याच्या दुकानाच्या मालकाला सांगितले की हा भाऊ गर्दीचा फायदा घेऊन बिल न भरता निघून जाईल.
 माझे ऐकून रेस्टॉरंटचा मालक हसत हसत म्हणाला:-
 *काही न बोलता त्याला जाऊ द्या*, त्यावर नंतर बोलू..
 नेहमीप्रमाणे नाश्ता करून भावाने आजूबाजूला पाहिलं आणि गर्दीचा फायदा घेत गपचूप तिथून निघून गेला.
 तो गेल्यानंतर, मी आता ब्रेकफास्ट पॉइंटच्या मालकाला विचारले की त्याने त्या माणसाला का जाऊ दिले ते मला सांगा.
 रेस्टॉरंटच्या मालकाने दिले उत्तर ——-
 तो मला म्हणाला:- तू एकटा नाहीस, अनेक भावांनी त्याला पाहिले आहे आणि मला त्याच्याबद्दल सांगितले आहे.
 तो म्हणाला की तो दुकानासमोर बसतो आणि गर्दी असल्याचे पाहून गुपचूप जेवण करतो.
 मी नेहमी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याला कधीही थांबवले नाही, त्याला कधीही पकडले नाही आणि कधीही त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला नाही..
 कारण माझ्या दुकानातली गर्दी या भावाच्या प्रार्थनेमुळे आहे असे मला वाटते.
 माझ्या दुकानासमोर बसून तो प्रार्थना करतो की या दुकानात लवकर गर्दी झाली तर मी पटकन आत जाऊ शकेन, जेवू शकेन आणि निघून जाईन......
 आणि *अर्थात जेव्हा तो आत येतो तेव्हा नेहमीच गर्दी असते.*
 तर ही गर्दी बहुधा *त्याच्या "प्रार्थना"* मुळे असावी.
 कदाचित म्हणूनच असं म्हटलं जातं की मी मी कोणाला जेवू घालत आहे म्हणून गर्व करू नकोस...
 तुम्ही स्वतः कोणाच्या नशिबाने खात आहात हे तुम्हाला माहीत आहे का?🙏
--------------------
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
                         *परोपकार*

*एका गावात एक निर्धन मनुष्‍य राहत होता. परिस्थिती गरिबीची असूनही तो मनाने उदार होता. आपल्‍या घासातील घास देण्‍यासही तो कमी पडत नसे.*

*एकदा एका शेठजीकडे तो जेवावयास गेला असताना त्‍या शेठजीने त्‍याला पंचपक्‍वान्‍नाचे ताट वाढून दिले. ती भरगच्‍च पदार्थांनी भरलेली थाळी बघून त्‍या गरिबाला वाटले की यातून किमान तीन माणसांची भूक भागू शकेल. त्‍याने शेठजीची परवानगी मागितली व त्‍यातील अन्‍न त्‍याने बरोबर घेतले व घराकडे जाण्‍यास निघाला.*

*रस्‍त्‍यात त्‍याला एक भिकारी भेटला त्‍याला त्‍याने खायला दिले. त्‍यातून उरलेले अन्‍न घेऊन तो घरी आला, तो जेवायला बसणार इतक्‍यात एक भिक्षुक या माणसाच्‍या घरी आला व त्‍याने त्‍याला अन्‍नदान करण्‍याची विनंती केली. गरिबाने त्‍याच्‍यासमोरील ताट त्‍या भिक्षुकाच्‍या स्‍वाधीन केले. त्‍यानंतर अजून एक अपंग व्‍यक्ती दाराशी आली त्‍यानेही या गरीबाकडे अन्न मागितले त्‍यालाही याने आपल्‍या थाळीतील अन्न खायला दिले.*

*आता याच्‍याकडे देण्‍यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही तेव्‍हा याने स्‍वत:ची भूक भागविण्‍यासाठी एक भांडेभर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्‍यक्ती आली व तिने ते पाणी पिण्‍यासाठी मागितले. याला आता खाण्‍यापिण्‍यासारखे काहीच उरले नाही तरीही ही व्‍यक्ती समाधानात होती.*

*आजचा दिवस आपल्‍यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्‍यापिण्‍यास मिळाले. तो ह्याच विचारात असताना तेथे देव प्रगटले व म्‍हणाले, 'मी तुझी परीक्षा घेण्‍यासाठीच भिकारी, भिक्षुक, अपंग आणि वृद्ध व्यक्तिचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काही ना काही मिळते का नाही हे पाहिले, आणि तु स्‍वत:चा विचार न करता दुस-याचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास.*

*आता या पुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो.'' इतके बोलून देव अंतर्धान पावले.*

*तात्‍पर्य :- देण्‍यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्‍यापेक्षा कुणला तरी एखादा घास देता कसा येईल, याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.*
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
------------ - -  .........---------
नोकरी करण्याच्या जोडप्यांच्या काय काय व्यथा असतात यावर एक सुंदर लेख वाचण्यात आला, कृपया वेळात वेळ काढून हा लेख वाचावा ही विनंती..!!

... व्यथा नोकरी करणाऱ्या जोडप्याची....
        नोकरी करणारे जोडपे म्हटलं की ...त्यांचं काय बुवा डबल पगार, डबल इंजिन, त्यांना पैशाची काय कमी ?? एकाचा पूर्ण पगार  घर चालवण्यासाठी खर्च केला तरी एकाचा पगार तसाच शिल्लक रहात असेल?? दोनच मुलं आणि ती दोघं असा सुखाचा संसार थोडक्यात काय तर राजा-राणीचा संसार??
असं सर्रासपणे कानावर पडत असतं कारण लोक असेच बोलतात हीच मुलं लहानाची मोठी करताना नोकरदार जोडप्याची होणारी धावपळ कोणाला दिसत नाही...  मुलांच्या संगोपनात त्यांच्या आजारपणात रात्रीचा केलेला दिवस पुन्हा सकाळी ऑफिसला कोणी जायचं?? आणि घरी मुलाजवळ कुणी थांबायचं हा निर्णय घेताना एक आई म्हणून आपल्या तापाने फणफणलेल्या इवल्याशा जिवाला नवर्‍याजवळ सोडून जाताना तिने काळजा वर ठेवलेला दगड कुणालाच दिसत नाही... लेकराच्या काळजीपोटी एकांतात ढाळलेले  तिचे अश्रू कुणालाच दिसत नाही...
तिच्या  इतकाच त्याग करून लेकराच्या संगोपनात  तिला मदत करणारा तिचा नवरा, प्रसंगी स्वतःची सर्व कामे बाजूला ठेवून बायकोला धीर देणारा तिचा नवरा कुणालाच दिसत नाही....  मुलांच्या संगोपनाची तडजोड स्वीकारत  जगणार, घड्याळ्याच्या काट्यावर धावणारं,  यंत्रवत जीवन जगणार हे जोडपं कोणालाच कसं दिसत नाही दिसतो फक्त त्यांच्या घरात येणारा डबल पगार.. म्हणजेच काय पैसा..
मुलं थोडी  कळती  झाली की त्यांना शाळेत  टाकतानाही दोघांच्या नोकरीच्या वेळा व शाळेची वेळ हे सगळं कसे अड्जस्ट  होईल अशी शाळा निवडावी लागते. कारण  मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांना कोण सांभाळणार?? हा यक्ष प्रश्न सतत भेडसावत असतो. नोकरीच्या ठिकाणीही मुलांना नेता येत नाही कारण हा प्रश्न काही  दिवसात सुटणारा प्रश्न नसतो ...  तर हा प्रश्न  असतो वर्षानुवर्षाचा ... म्हणजे वर्षानुवर्षे या जोडप्यांनी तडजोड करत जीवन जगायचं.. शाळा सुटल्यावर दोन-तीन  तासाचा प्रश्न उरतो तो सोडवण्यासाठी  हृदयावर दगड ठेवून नाईलाजाने पाळणाघरात सारखा पर्याय निवडावा लागतो .. मग सुरु होते धडपड चांगलं पाळणाघर शोधण्याची.. त्यांची ही धडपड ही कुणालाच दिसत नाही.. आपल्या  काळजाच्या तुकड्याला  पाळणाघरातील एखाद्या परक्या मावशीच्या स्वाधीन करताना  एका आईची होणारी घालमेल तिची काळजी कुणालाच दिसत नाही???  पाळणाघरातील ती  मावशी आपल्या बाळाला  व्यवस्थित सांभाळेल ना? आपल्या बाळाला  पोटभर खाऊ  घालेल ना? अशा कित्येक प्रश्नाचं चक्र अविरत  तिच्या डोक्यात फिरत  असतं...  जे कुणाच्याच   दिसत नाही.... एक नोकरदार आई  जेव्हा विचार करते ना की माझा सोनुला सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत माझ्या पासून दूर राहणार आहे तेव्हा त्या सोनुल्या च्या आवडीचे पदार्थ करण्यासाठी रोज पहाटे पाचला उठून विनाखंड स्वयंपाक करून आपल्या मुलांना शाळेत जाण्याआधी  आपल्या हातानं प्रेमाने चार घास खाऊ  घालण्यासाठी तिने  केलेली धडपड  कोणालाच दिसत नाही...  ऑफिसला उशीर होईल म्हणून  किचन ओट्यावरच उभ्यानेच जेवण करणारी ती  कुणालाच दिसत  नाही. संध्याकाळी ऑफिस मधून थकून घरी आल्यावरही  मुलांच्या आवडी जपत स्वयंपाक करणारी ती कुणालाच दिसत नाही... शेजारच्यांना ऐकायला येतो तो  फक्त  रोज पहाटेच  तिच्या किचन मधून येणारा खलबत्त्याचा आणि  कुकरच्या  शिट्ट्यांचा आवाज.....   कोणालाच दिसत नाही तीच सलग अठरा अठरा तास  राबने... आणि आपल्या संसारासाठी  चंदना सारखं झिजणे..
  एवढे करूनही कसं कसं सांगू माझ्या सखींना तुम्हाला..   इतर स्त्रियांच्या तुलनेत  आम्ही नोकरी करणाऱ्या स्त्रिया आपल्या मुलांना खूप कमी वेळ देतो  ही सल  आमच्या मनाला सतत आतून  बोचत असते..  सायंकाळी ऑफिस सुटलं की कधी एकदा घरी जाऊन आपल्या सोनुल्याचा निरागस चेहरा पाहते अस  तिला होऊन जातं यासाठी हरणाचे पाय लावून घर गाठणारी आई  कुणालाच दिसत नाही.... म्हणतात ना जरी घार फिरे आकाशी चित्त तिचे पिलापाशी या उक्तीचा प्रत्यय अशावेळी आमच्या मनात आल्याशिवाय रहात नाही.....
       पण कुणालाच दिसत नाही... नोकरी करणाऱ्या जोडप्यांची तडजोड, त्यांची तारेवरची कसरत, त्यांनी मन मारून जगलेलं त्यांचं जीवन ,मुलांच्या चांगल्या जीवनासाठी त्यांनी केलेला त्याग.....
लोकांना दिसतो तो फक्त त्यांचा बंगला ,त्यांची गाडी आणि त्यांचा पैसा........... पैसा .. आणि फक्त  त्यांचा पैसा...!!
------------------------------
❤️❤️प्रवास, माय-लेकीचा..❤️❤️

लहानपणी मराठी परिक्षेत नेहमी निबंध असे 'माझी आई'. तेव्हा वाक्य ठरलेली असत. "माझी आई खूप सुंदर आहे, माझी आई छान गाणं म्हणते, माझी आई स्वयंपाक खूप छान करते, माझी आई मला खूप आवडते". झाला निबंध. भाषा बदलली तरी वाक्य तीच फक्त अनुवादित. ह्या पलिकडे लिहायचं तर आई समजलेलीच कुठे असते आपल्याला त्या वयात. बस आई आई असते. गरज असते(जी अनंत काळाची असते), श्वास असते म्हणा ना.

'आई' म्हणजे काय हे समजेपर्यंत निबंध लिहिण्याचं वय निघून गेलेलं असतं किंवा आई ह्या विषयावर निबंध लिहिणं बालिशपणाचं वाटतं कारण तोपर्यंत आपल्यावर बाहेरच्या जगाचा प्रभाव असतो आणि आपले idols बदललेले असतात. अपरिपक्व विचारांमुळे हे idols पण बदलत असतात, प्रगल्भतेने त्याना स्थैर्य येतं. आईला मात्र backseat दिलं जातं आणि ते ती अगदी सहज स्वीकारते.

आईच्या पदरापासून सुरु झालेला माझा आणि आईचा हा प्रवास.....

माझ्या जन्माच्या वेळी खूप दिव्यातून आईला जावे लागले, माझा जन्म झाला आणि आईचा पुनर्जन्म. पुढे पूर्ण वर्ष माझी खूप काळजी घ्यावी लागणार होती जी तिने लिलया पार पाडली, कशी ते मात्र मला मी आई झाल्यावर कळले. 

"तू कुणाची" असा प्रश्न विचारताच माझं चटदिषी उत्तर येई , 'मी बाबांची'. नकळत आईच्या मनावर एक ओरखडा . पण हसतमुखाने लटक्या रागात तिची एखादी चापट, एवढीच प्रतिक्रीया. आज कळतं की नकळत किती आघात करत असतो आपण आईच्या मनावर.

तेव्हां आई ही माझी प्रतिस्पर्धी, स्त्री म्हणून बाबांच्या प्रेमाची वाटेकरी, बाल बुद्धीला एवढंच कळत असे. आमच्यात fine tuning होऊ लागलं आणि मी आईची कधी झाले कळलंच नाही.

लहानपणी प्रत्येकाला वाटत असतं की आपली आई एक परी आहे आणि तिच्याकडे जादुची छडी आहे. मला पण असंच वाटे, खासकरुंन दिवाळीत कारण रात्री झोपताना सामसुम दिसणार्या स्वयंपाकघरात सकाळी उठले की स्वादिष्ट फराळाचा घमघमाट असे, तेव्हां कळायचंच नाही ही झोपते कधी, ऊठते कधी आणि सगळं करते कधी. फक्त खायचं तेवढं कळत असे. दिवाळीची आणखी एक आठवण म्हणजे तिची वसुबार्सेची रांगोळी. पाटावर अत्यंत सराईतपणे ती गाय आणि वासरू काढत असे ते ही रांगोळीने. मी दिवसभर त्या रांगोळीची वाट बघत बसे. आज त्याच थरथरत्या हातांना रांगोळीची दोन बोटं ओढणं किती जड जातं हे बघून गलबलून येतं.

पण "मी बाबांची" म्हंंणणारी मी , वाढले मात्र आईच्या शिस्तीत. नुसतं बाबांच्या रागे भरण्याने ताप काढणारी (आणि नंतर त्यांच्याशी कट्टी घेणारी) मी आणि हवालदील बाबा, हे चित्र बघताच त्या माऊलीला लगेच समजले, इकडे शिस्त लावण्याचे काम तिलाच करावे लागणार आणि ते पण मोठ्या खुबिने!
मग काय सुरु झाला आमचा क्लास. तिच्या ह्या क्लास मधे 'To Do ' ची लिस्ट कमी , 'Not to Do' ची 
लिस्टच मोठी होती.,असं वागायचं नाही, असं बोलायचं नाही. मी कधी रागाने तिला म्हणे, "काय गं सारखी नकार देत असतेस? " तर शांतपणे मला समजावी, " कारण तुला नकार पचवता आला पाहिजे आणि नकार देता पण आला पाहिजे". त्या वयात तिचं बोलणं किती कळलं कुणास ठाऊक, पण पुढच्या आयुष्यात नक्कीच उपयोग झाला. 

शालेय जीवनातून कॉलेजमध्ये पाऊल ठेवले आणि तिच्या नजरेला आणिकच धार आली. बुरसटलेल्या विचारांची नाही ती, पण मैत्री कुणाशी असावी आणि कशी असावी ह्याचे मात्र नियम होते. तिच्यात आता एक मुलीची आई जरा जास्तच डोकावू लागली. आता शिस्तिची जागा माझ्या बद्दल वाटणार्या काळजीने घेतली. आणि त्या काळजीपोटी माझ्यावर वेळेत घरी येण्याचं बंधन घातलं गेलं. कधी चुकून उशीर झाला तर तिचा काळजीने चेहरा काळवंडलेला असे, मग मलाच अपराधी वाटे. इतक्या वर्षांनी आज ही तिच अवस्था असते तिची.

तिच्या कडून शिकले तडजोड कधी, कुठे आणि किती करायची, तेही आत्मसन्मान सांभाळून. तिच्या प्रत्येक कृतीत माझ्यासाठी शिकवण असे. कणिक भिजवताना परात स्वच्छ दिसली पाहिजे, उष्टी खरकटी भांडी इतकी स्वच्छ पहिजेत की कामवालीला आज स्वयंपाक काय होता ते कळता कामा नये. करंजी करताना एक मोदक ,आणि मोदक करताना एक करंजी करायचीच असते, का विचारलं की म्हणे बहिणीला भाऊ आणि भावला बहिण ही पहिजेच. ह्या आणि अशा अनेक गोष्टी शिकले ज्या मला पुढे कामी आल्या. बाकी बर्याच गोष्टी तर तिला बघून बघूनच शिकले. असेच तर घडत असतात संस्कार. 

तर ही माझी आई, माझं लग्न ठरल्यावर मात्र थोडी चिडचिडी झाली. कदाचित धास्तावली. कदाचित मला पुढे जड जाऊ नये म्हणून मुद्दाम मायेचे पाश सैल करु बघत होती. कदाचित स्वतःलाच जड जाऊ नये म्हणून?
सासरी मी पटकन रुळावी म्हणून? असेल कदचित !!

मुलगी म्हणून अती स्तुती कधीच केली नाही. एखादा पदार्थ मी केला की छान झालाय असं म्हणायची की मी समजून जायचे अजुन सुधारणा करण्यास वाव आहे. "तुला माझं कौतुकच नाही " हे माझं पेटंट वाक्यं आणि "मुळूमुळू रडायचं नाही, येत नाही म्हणायचं नाही, करुन बघ, शिकून घे" ही तिची पेटंट वाक्यं. पुढे मला मुलं झाल्यावर ह्या वाक्यांत आणिक भर पडली . "सारखं ओरडू नाही गं मुलांना! किती बोलतेस ! अशाने कोडगी होतील ती! " 
बघा, आहे का आता? 
आईची आजी झाल्यावर नियम आणि शिस्त दोन्ही शिथिल होतात, किंबहूना पूर्णच बदलतात. नातवंडांना सगळं माफ!

तर अशी मी तिच्या तालमीत घडत गेले, नुसतीच घडले नाही तर सक्षम झाले मानसिक दृष्ट्या.

आज लिहिता लिहिता तिची अनेक रुपं माझ्या डोळ्यासमोर सर सर सरकली. रात्री जागून माझ्यासाठी परकरपोलकं शिवणारी तेही हाताने, माझ्यासाठी मेहनत घेणारी , मला सगळं आलच पाहिजे असा अट्टाहास करणारी, आपली मुलगी आयुष्याच्या कुठल्याही शर्यतीत मागे पडू नये म्हणून धडपडणारी.
मला आराम मिळावा म्हणून माझ्या तान्हुल्यांना सांभाळणारी, आणखी किती रुपात दिसली ती मला काय आणि किती लिहू? 

खरं तर लिहूच काय?
'आई' हाच एक अखंड ग्रंथ असतो, ज्याची कितीही वाचलं तरी पानं संपतच नाहीत, असं वाटतं अजुन कितीतरी वाचयचे बाकी आहे.

*हा प्रवास फक्त माझा आणि आईचा नसून सगळ्या माय-लेकींचा प्रवास आहे. काळानुरूप त्यात मैत्रीची भर पडली आणि तो आणिकच सुंदर, सुखकर आणि समृद्ध झाला. आपला हा प्रवास असाच चालू राहोत....सर्व मायलेकींसाठी.*
-------------------------
*मनोहिताय ....*

नमस्कार !!
काही दिवसांपूर्वीची गोष्ट! आमच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींचं गेट टुगेदर होत. बोलता बोलता Physical Fitness आणि आहाराचा विषय निघाला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सगळेच खूपच aware आहेत याबाबत ! “मी रोज योगा करते”, '‘मी सूर्यनमस्कर घालतो” तर काही जण म्हणाले “मी तर  Gym Join केले आहे” वगैरे. आहाराबाबतही तेच, व्यवस्थित चौरस आहार,  कुणाचं Keto Diet तर काही जणांच Intermittent Fasting! शिवाय  Vitamins, Calcium या supplements सुद्धा! हे सगळं उत्तमच पण मी सहज म्हटलं,  आपण Physical Fitness साठी एवढे जागरूक आहोत पण ‘मनाचे’ काय? मनाच्या fitness साठी आपण काही करतो का? यावर मग जवळ जवळ शांतताच पसरली.
मित्रमैत्रिणींनो, *_Mental Fitness म्हणजेच मनाची तंदुरुस्ती ही एक अत्यावश्यक पण दुर्लक्षित गोष्ट आहे._* खर तर ‘मन’ हे सर्व इंद्रियांचा राजा आहे. उदा. आपण कानाने ऐकतो पण आपलं मन तिथे नसेल तर शब्द आत सुद्धा शिरत नाहीत ! इतर सर्वच इंद्रियांच्या बाबतीत हे सत्य आहे. हे जर मन निकोप नसेल तर अनेक रोगांना अमंत्रणच मिळते! Acidity, Ulcer पासून त्वचारोग, हृदयरोग अगदी Cancer सुद्धा.
 
भगवतगीतेत श्रीकृष्णाने म्हटलं आहे....
*इंद्रियाणां मन:च अस्मि*
*भूतानाम अस्मि चेतना*!
अर्थ: प्राणीमात्रांत चेतना ‘मी’ आहे आणि सर्व इंद्रियातील ‘मन’ मी आहे! इतक महत्वाच हे मन. हे निरोगी, निकोप आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायलाच हवेत.

सात दिवसांचे आपण सात mind exercises किंवा mental health challanges ठरवून. 
चला तर मग बघूया तंदुरुस्त मनासाठीची challanges

*दिवस-१ ला  - _LOVE -  YOURSELF_*
 
आज स्वतःवर प्रेमाची बरसात करा ! आज स्वतःला सांगा की तुम्ही किती युनिक आहात. स्वतःमधले सगळे सुंदर गुण, कला, चांगुलपणा हे सगळं सांगा स्वतःला. तुमच्या हृदयात असलेलं प्रेम जागृत करा. स्वतःकडे आरशात बघून एक सुंदर स्माईल द्या अगदी प्रेमाने भरलेलं!
 
*दिवस- २ रा - _ACCEPTANCE_*
 
आज कशाकशाविषयी तक्रार करायची नाही! याचीही सुरवात स्वतःपासूनच.  स्वतःच वजन, रंग, रूप, आरोग्य  कसलीही तक्रार नाही. घरच्या लोकांनी काही मनाविरुद्ध गोष्ट  केली तरी Accept  करायची. तक्रार नाही. कामाच्या ठिकाणी काही आवडल नाही तरी तक्रार नाही. दिवसभरच्या घटना जशा घडतील तशा स्वीकारायच्या, तक्रार नाही . 
And those who avoid complaining invite happiness……….
 
*दिवस -३ रा  - _GRATITUDE_*

आजचा दिवस कृतज्ञतेचा. आपल्या  आयुष्यातल्या  कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. विश्वास असेल तर देवाचे आभार मानायला हरकत नाही ! आपल्या प्रियजनांनाही सांगायला विसरू नका. अशा  दहा गोष्टीची यादी  करा, ज्याच्याबद्दल आपण ग्रेटफुल आहोत. आज मन gratitude  ने भरून जाऊदे आणि मग बघाच काय होत ते! A grateful heart is a magnet of miracles!
 
*दिवस -४ था - _OFF LINE DAY_*

आजचा दिवस WHATSAPP, FACEBOOK,  INSTAGRAM सगळ्यापासून लांब राहायचा दिवस. मनावर ताबा आणणे, मन ताब्यात ठेवण्याच पाहिल पाऊल! OFF LINE  राहिल्यामुळे  मिळणारा वेळ विशेषकरून आपल्या फॅमिली मेंबर्स बरोबर घालवा. कित्येक दिवसाच्या राहिलेल्या गप्पा मारून घ्या ! आपल्या प्रियजनांबरोबर  प्रेमानं, मजेत वेळ घालवा. 
 
*दिवस - ५ वा -   _RESPECT_*

आपल्यापेक्षा लहान, आपले subordinates  आणि बाकीच्या सगळ्यांशी आज अत्यंत आदरानं वागायचं. उगीच   ढोंग नाही, मनापासूनचा! काही वेळा आपण मानसिक रुग्णांविषयी अनादराने बोलतो तो वेडा, खुळा इ.  किंवा दिव्यांगाबद्दल पांगळा,  बहिरा, आंधळा  असे अनुद्गार काढतो. स्वतःपेक्षा  वेगळया असलेल्या लोकांविषयी आदरानेच बोलण्याकडे आज लक्ष द्या.
 
*दिवस - ६ वा- _DECLUTTER_*

आपल्या साठवणूकीच्या हव्यासापोटी अशा अनेक गोष्टी आपल्याकडे पडून असतात,  महिनोमहिने, कधीकधी अनेक वर्ष वापरात नाही अशा तीन गोष्टी शोधा आणि योग्य व्यक्तीला दान देऊन टाका.  घराबरोबर मनही declutter करायला हवं ! आपल्या मनात डोकावून बघा अशी कुठली गोष्ट आहे का? जी निव्वळ कचरा आहे? एखाद्याबद्दल राग? कशाचीतरी jealousy? अशी एक गोष्ट शोधा आणि मनातून उचलून फेकून द्या. मनाला सांगा, माझ्या प्रिय सुंदर मना ही घाण मी तुझ्या सुंदर घरातून काढून टाकत आहे. आणि कल्पना करा की ती घाण तुम्ही जाळून टाकत आहात.
 
*दिवस - ७ वा- _SILENCE / MEDITATION_*

आज कमीतकमी  पंधरा मिनिटे शांत बसा . कानात ear Plugs घाला. स्वतःच्या श्वासाचं निरिक्षण करा. बाहेरचा आवाज बंद झाला की आतल्या आवाजाकडे लक्ष द्या. विचार आले तर त्यांच्या मागे लागू नका. त्यांना बघून सोडून द्या. रस्त्याने चालताना अनेक माणसे येतात/जातात आपण सगळ्यांकडे लक्ष न देता आपल्या ध्येयाकडे  चालतो तसेच करावे. आपण आपली स्वतःची company enjoy करावी.
This will really rejuvinate your mind !
 हा सप्ताह आपण अनेक वेळा  करू शकतो किंवा एखादा जास्त आवडलेला दिवस जास्त वेळा पालन  करू शकतो. असे करता करता ही आपली जीवनशैली बनून जाईल आणि आपल्या मनाच रूपांतर एका सुंदर, सुद्रुढ, स्थिर आणि  आनंदान भरलेल्या मनात होऊन जाईल!
-----------------
*समाधानाचा मूळ स्रोत काय आहे?*

एक इतिहास संशोधक एकदा एका मंदिराच्या परिसरात पाहणी करत होता. त्याला तिथे एक म्हातारा मूर्तिकार दिसला जो एक लहान मूर्तीवर कोरीवकाम करत होता. संशोधकाने ते पाहिले आणि तो पुढे जायला निघाला. पुढे जाता जाता त्याच्या लक्षात आले की मूर्तिकार ज्या मूर्तीवर काम करत होता अगदी तशीच तंतोतंत दिसणारी दुसरी मूर्ती तिथेच बाजूला ठेवलेली होती. तो थबकला!! त्याला शंका आली. तो त्या मूर्तिकारपाशी जाऊन उभा राहिला.
संशोधक म्हणाला, "तुम्ही खूप तंतोतंत दिसणाऱ्या दोन मुर्त्या बनवल्या आहेत!!"
मूर्तिकार त्याच्याकडे न पाहता आपले काम करता करता म्हणाला, "हो!!"..
संशोधक, "तुम्ही दोन मुर्त्या का बनवल्या??"
मूर्तिकार आपल्या कामात व्यस्तच होता. तो म्हणाला, "पहिल्या मूर्तीमध्ये एक त्रुटी आहे.."
संशोधकाने दोन्ही मूर्तीचे खूप सूक्ष्म निरीक्षण केले परंतु त्याला कोणतीही त्रुटी किंवा साधासा फरक जाणवला नाही. तो म्हणाला, "मला तर त्रुटी दिसत नाहीये!!"

मूर्तिकार थोडासा थांबला आणि म्हणाला, "त्या मूर्तीच्या नाकाला खरचटले आहे, एक scratch आहे त्यावर!!"
संशोधकाने आता नीट मूर्तीच्या नाकाला पाहिले तर तिथे त्याला थोडं खरचटलेलं दिसले. त्याने परत प्रतिप्रश्न केला, "ह्या मूर्तीला मंदिरात ठेवणार आहात का तुम्ही?", त्यावर म्हातारा म्हणाला, "नाही, मंदिराच्या बाहेर एक मोठा स्तंभ आहे त्याच्यावर ठेवणार आहोत!!". आता तो खूप बुचकळ्यात पडला, विचार करू लागला की जी मूर्ती १२ फुट उंच स्तंभावर ठेवली जाणार आहे, तिचे किंचित नाक खरचटले तरी ह्यांनी दुसरी मूर्ती बनवली!!
त्याने न राहून परत प्रश्न केला, "ज्या मूर्तीला कोणीच पाहणार नाही त्या मूर्तीला थोडे खरचटले म्हणून तुम्ही दुसरी मूर्ती का बनवली? ही मूर्ती अशी पण १२ फुट उंच स्तंभावर राहील!! हिच्या नाकावर एक एकदम लहान scratch आहे हे कोणालाच माहित नाही पडणार!!! तरी???"
आता मात्र म्हातारा मूर्तिकार उठला आणि त्या संशोधकाच्या डोळ्यात डोळे घालून बोलला, "दुसऱ्यांना माहित राहणार नाही पण मला तर माहित राहील ना!!"
दुसऱ्यांना दाखविण्यासाठी नव्हे तर स्वतःला आतून चांगले वाटायला हवे म्हणून आपण काम करत राहिले पाहिजे.

जेव्हा आपण काही चुकीचे करतो तेव्हा ते करण्याअगोदर आजूबाजूला नक्की पाहतो परंतु "आपल्या आतल्या बाजूला" पाहायचे आपण विसरतो. ते हृदय, ते मन आपल्याला पाहत असते. आजूबाजूच्या वाईट वाटो किंवा नको पण आपल्याला आतून माहित असते आपण चुकीचे करतोय.

आयुष्यात समाधानी राहायचा मूळ स्त्रोत हाच आहे, "स्वतःशीच प्रामाणिक" व्हा. आपल्याला आतून वाटते काहीतरी एक, आपण बाहेर दाखवतो काहीतरी दुसरेच — हा लपाछपीचा खेळ एक दिवशी मोठ वादळाचे रूप घेतो. "Some people create their own storms, then get upset when it rains!"
आयुष्यात कोणतेही काम असो त्याला स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहून आपले हंड्रेड परसेंट त्याला द्यायचे. दुसऱ्यांना चांगले वाटले पाहीजे, त्यांना माझे काम भावले पाहिजे, त्यांनी मला लाईक करायला हवे, माझी वाहवाह करायला हवी म्हणून मी हे काम उत्कृष्टरित्या पार पाडेल असे करू नका. जर ह्याच मानसिकतेसोबत जगलात तर आयुष्यात कधीच समाधानी नाही होणार.
आयुष्यात खरे समाधान "पूर्ण प्रामाणिकपणे" काम करून त्यात "उत्कृष्टता (Excellence)" मिळवण्यात असते. हे आपण स्वतःसाठी करतो — दुसऱ्यांनी पाहायला हवे म्हणून नाही. समाधान तुम्हाला आतून येणाऱ्या भावनांनी मिळेल, त्याला बाहेरच्या जगात शोधू नका. कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी!! समाधान, आनंद आपण बाहेर शोधतो — जो बाहेर नाहीच त्याला शोधून काय उपयोग!!

Don't climb a mountain with an intention that the world should see you, climb the mountain with the intention to see the world. (जगाने तुम्हाला पाहायला हवे म्हणून पर्वताच्या शिखरावर जाऊ नका. पर्वताच्या शिखारवर ह्यासाठी जा कारण की तुम्हाला जग पाहायचे आहे!!)

दुसऱ्यांना ध्यानात ठेवून कर्म केलीत तर आपण "चांगले वाटतो थोड्या लोकांना!!" परंतु आपले काही थोड्या लोकांना "चांगले वाटणे" बाकीच्यांना "चांगले वाटत" नाही. आणि इथून सुरु होतो संघर्ष! ह्या दुनियेशी आणि अधिक महत्वाचा तो म्हणजे "स्वतःशीच!!"
-------------------------------
★गुरुदक्षिणा★

      मुग्धा गाडीतून उतरली.शाळेची इमारत बघून ऊर भरून आला. खूप बदल झाला होता.पंचवीस वर्षानंतर ती आज शाळेत येत होती.बाहेर शाळेपाशी नवीन दुकान झाली होती.ओळखू न येण्याइतका बदल.रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून,आज काही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार होणार होता,त्यासाठी खास ती सगळी कामं बाजूला सारून मुंबईहून आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नावाचे छोटेसे गाव,जिथे तिचं शालेय शिक्षण झालं होतं.ती शाळेच्या आवारात आली.ती आल्याची माहिती शाळेतील शिपायाने मुख्याध्यापकांना दिली.मुख्याध्यापक,शाळेतले शिक्षक,सगळेच तिच्या स्वागताला बाहेर आले.

   "मुग्धाताई, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात यासाठी आपले मनःपूर्वक आभार."मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत केले.

  "अहो,आभार कसले मानता. ज्यांनी मला घडवलं,जिथे मी घडले त्या वास्तूत परत येण्याचं भाग्य मला मिळालं,अजून काय हवं.खर तर मीच तुमची ऋणी आहे.तुम्ही मला बोलावून माझा सन्मान केला.
मी एक विनंती करू का?" मुग्धाने विचारलं.

  "अहो,आज्ञा करा ताई.तुमच्यासारखी उच्चशिक्षित व्यक्ती आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे,हा आमचा अभिमान आहे."

  "मला माझ्या वर्गात थोडा वेळ बसायचं आहे,तुमची हरकत नसेल तर." मुग्धा भावुक होऊन म्हणाली.

    "जरूर ताई,अजून काही निमंत्रित यायचे आहेत.कार्यक्रमाला अवकाश आहे.पांडुरंग तुम्हाला वर्गात घेऊन जाईल.अरे पांडुरंग,ताईंना जरा शाळा बघायची आहे."

  "जी सर,ताई मी वर्गाची चावी घेऊन येतो."पांडुरंग पळतच ऑफिसच्या दिशेने गेला.

    पांडुरंगने वर्गाचं दार उघडलं, "निवांत बसा ताई.कार्यक्रमाची वेळ झाली की तुमास्नी बोलवायला येतो."

   मुग्धाने हळुवार सगळ्या वर्गातून नजर फिरवली.आणि ती बसायची त्या दुसऱ्या बेंचवर येऊन बसली.तिने डेस्क वरून हळूच हात फिरवला.तिचे वाळलेले अश्रू तिथे दिसतात का,उगाच बघू लागली.

-----------------------------------------------

प्रगती पुस्तक क्लासटिचरने दिलं आणि मुग्धाला रडू आलं.ह्या चाचणीतही गणितात ती नापास झाली होती.आता घरी गेल्यावर आईचा कांगावा,बाबांची बोलणी ह्या सगळ्याला तोंड द्यावं लागणार होतं.गणित हा विषय तिचा शत्रू झाला होता. सातव्या वर्गापर्यंत कशीबशी पास व्हायची पण आता आठवीत तिला तो विषय खूप जड जात होता.शाळा सुटल्याची बेल वाजली आणि एकेक करून मुलं बाहेर जायला लागली.मुग्धा जागेवरच बसून होती.प्रीती तिच्याजवळ आली, " मुग्धा,शाळा सुटलीय. चल न घरी."

    "तु पुढे हो,मी येईन नंतर."मुग्धा तिच्याकडे बघायचं टाळत म्हणाली.

     प्रीती गेली आणि मुग्धा डेस्कवर खाली मान घालून रडायला लागली.तिला घरी जावसच वाटेना.शाळा बंद करायची वेळ आली तसा शिपाई वर्गाला कुलूप लावायला आला.त्याला मुग्धा खाली मान घालून बसलेली दिसली. 
  "ताई,काय झालं ग,बरं नाही वाटत का?"त्याने विचारलं.

   "नाही काका,मी ठीक आहे." असं म्हणत मुग्धाने दप्तर उचललं आणि वर्गाच्या बाहेर आली.घरचा रस्ता रोजच्यापेक्षा आज खूप लवकर संपला असं तिला वाटलं.

   घरी आल्यावर प्रगती पुस्तकावर सही घ्यायची म्हणून तिने वडिलांना दाखवलं.ते बघितल्यावर त्यांची नेहमीप्रमाणेच मुग्धावर आगपाखड सुरू झाली.
  "मंदबुद्धीची मुलगी आहेस तू.गणित विषयात नापास?आत्तापर्यंत काठावर का होईना पास तरी होत होतीस.आता खरी महत्वाची वर्षे आणि तू हे दिवे लावलेस.तुझ्याकडून काय अपेक्षा करणार?" त्यांनी रागारागाने ते प्रगती पुस्तक भिरकावून दिलं.

   आईने पण तिच्यावर भरपूर तोंडसुख घेतलं.
   "अग, काय हे?अभ्यास करतेस का काय करतेस.तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागतं.तुझ्याकडे माझं लक्ष नाही,मुलगी आईसारखी निर्बुद्ध आहे,ही वाक्य मला ऐकावी लागतात.जरा तरी लाज बाळग ग.पुढच्या परिक्षेत हे असेच गुण उधळले तर तुझं शिक्षण बंद."

      रडून थकलेली मुग्धा सुजलेल्या डोळ्यांनी आईकडे बघत होती.एका क्षणी तिला वाटलं,खरंच मी परत नापास झाले तर बरंच आहे.मला पुढे शिकायचंच नाही.त्या रात्री न जेवताच ती झोपली.

  दुसऱ्या दिवशी प्रगती पुस्तकावर आईची सही घेतली आणि शाळेत निघाली.वर्गात कोण काय शिकवतय,ह्याकडे आज लक्षच नव्हतं.कालच आठवून सारखे डोळे भरून येत होते.संस्कृतचा पिरेड सुरू झाला.मुग्धाच्या आवडीचा विषय.ती जरा खुलली.संस्कृतचे शिक्षक; देशमाने सर वर्गात आले.
त्यांनी एक पेपर काढला आणि म्हणाले,"मुग्धा साने ह्या विद्यार्थिनीचा हा पेपर आहे.पूर्ण गुण मिळवले आहेत.पेपर कसा सोडवावा ह्याचं उत्तम उदाहरण.तुम्ही सर्वांनी हा पेपर एकदा बघावा."

   सरांचं ते बोलणं ऐकून मुग्धा एकदम संकोचली.तिला अशा कौतुकाची सवयच नव्हती.खरंच की,ह्या गणिताच्या नादात मला संस्कृतमधे पैकीच्या पैकी गुण आहेत हे मी विसरलेच. पण आईबाबांना पण हे दिसलं नाही ह्याचं तिला वाईट वाटलं.

  "मुग्धा,शाळा सुटल्यावर टीचर्स रुममधे ये, जरा तुझ्याशी बोलायचं आहे."देशमाने सर म्हणाले.

   "सर,आत येऊ का?" मुग्धा टीचर्स रुमच्या बाहेर उभी होती.

  "हो ये. तुझं प्रगती पुस्तक दाखव जरा."सरांनी सांगितलं.

    मुग्धाला आता भीती वाटायला लागली.सरांनी गणिताचे मार्क्स बघितले तर त्यांचं माझ्याबद्दल मत वाईट होईल.तिने खोटंच सांगितलं,"सर,मी आज आणलं नाही.घरी विसरले."

    "मुग्धा,मला माहितीय तु गणितात नापास झाली आहेस.माझं तुमच्या क्लास टिचरशी बोलणं झालंय."

   ते ऐकून मुग्धा परत रडायला लागली.

   "मुग्धा,रडणं थांबव.रडणं हा कमकुवतपणा आहे.मला सांग,तुला संस्कृत आवडतं न?"

    "हो सर,खूप आवडतं "मुग्धा मुसमुसतच बोलली.

   "संस्कृत ह्या विषयात तुला खूप शिकायचं असेल,पुढे यायचं असेल तर अजून तीन वर्षे तुला गणितावर लक्ष द्यावं लागेल.दहावीपर्यंत गणित हा विषय कंपलसरी असतो, तुला माहितीय.दहावीनंतर  तु आर्टस् घेऊ शकते.तुला हेच सांगायला मी बोलावलं आहे की तुझा आत्मविश्वास ढळू देऊ नकोस.असतो एखादा विषय कच्चा पण म्हणून तु बुद्धिमान नाहीस असं नाही.माझ्या विषयाची तु एक हुशार विद्यार्थिनी आहेस. मला तुला खूप शिकलेली,संस्कृतची अभ्यासक म्हणून बघायचं आहे.तेव्हा गणिताकडे थोडं लक्ष दे.संस्कृतवर लक्ष द्यायला मी आहेच.कळलं?"

   "हो सर,थँक्स,मी जाते."
मुग्धा टीचर्स रूमच्या बाहेर आली आणि तिला एकदम ओझं उतरल्यासारखच वाटलं.इतक्या सुंदर शब्दात सरांनी समजावलं.तिचा न्यूनगंड कमी झाला.हेच आईबाबा का करू शकले नाहीत?तिने ठरवलं,सरांच्या शब्दाला मान द्यायचा.

   मुग्धा नियमित गणिताचा अभ्यास करू लागली.आठवी,नववीत गणितात,खूप नाही तरी निदान पन्नास टक्के गुण तिला मिळाले.संस्कृतचा तर प्रश्नच नव्हता.त्यात पैकीच्या पैकी गुण ठरलेले होते.दहावी आली आणि मुग्धाने गणिताची शिकवणीच लावली.मनापासून अभ्यास करून एकूण नव्वद टक्के गुण मिळवून पास झाली.आणि संस्कृत ह्या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून शाळेची शान वाढवली.शाळेने तिला बक्षीस देऊन तिचे कौतुक केले.
आईवडिलांनाही प्रथमच मुलीचे कौतुक वाटले.

    वडिलांची मुंबईला बदली झाली म्हणून मुग्धाला भद्रावती सोडावं लागणार होतं.निघायच्या आधी ती देशमाने सरांच्या घरी गेली.

   "मुग्धा,तु माझी विद्यार्थिनी आहेस ह्याचा मला अभिमान वाटतो."सर म्हणाले.

   मुग्धाला काय वाटलं कुणास ठाऊक,ती एकदम सरांच्या पाया पडून रडायला लागली.सरांनी तिला उठवलं.
  "सर,मी पूर्णपणे खचले होते.तुमच्या शब्दांनी मला बळ दिलं."

   "मुग्धा,मला वचन दे,ह्यापुढे तु स्वतःला कमी लेखून रडणार नाहीस.अशा वेळेस मला आठव आणि डोळ्यातलं पाणी परतून लाव.खूप शीक,मोठी हो.तुझा आदर्श सर्वांपुढे ठेव."सरांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं.

   "हो सर,मी नक्की प्रयत्न करेन.तुमचा आशीर्वाद, तुमचे मोलाचे शब्द मला आयुष्यभर प्रेरणा देतील."तिने वाकून सरांच्या पायावर डोकं ठेवलं.

    मुंबईत एका चांगल्या कॉलेजमधे मुग्धाने ऍडमिशन घेऊन आर्टस् घेतलं.शिक्षणाचा एकेक पल्ला गाठत,संस्कृत मधे एम ए,पी एच डी केलं.सगळ्या परीक्षांमधे मुग्धा सर्वात अधिक गुण मिळवून यशस्वी झाली.विद्यापीठात नोकरी लागून थोड्याच दिवसात ती संस्कृतची हेड ऑफ द डिपार्टमेंट झाली.देशमाने सरांशी ती संपर्क ठेऊन होती.कुठलीही अडचण आली की त्यांना फोन करायची.तिच्या बुद्धीची जाणीव त्यांनी तिला करून दिली होती.

   काळ पुढे सरकत होता.मुग्धाची चाळीशी उलटली होती.आयुष्य व्यस्त झालं होतं.आणि अचानक एक दिवस शाळेतून फोन आला,माजी विद्यार्थ्यांचा सत्कारासाठी मुग्धाला आमंत्रण आलं.तिने लगेच जायचं ठरवलं.तिला वृद्ध झालेल्या,थकलेल्या सरांना भेटायचं होतं. त्यांचा थरथरता हात डोक्यावर घेण्यासाठी ती आसुसली होती.

-----------------------------------------------

   पांडुरंग बोलवायला आला तशी मुग्धा आठवणीतून जागी झाली.ती बाहेर आली.निमंत्रित सगळे आले होते.तिची नजर देशमाने सरांना शोधू लागली.आणि तिने सरांना ओळखलं.तिला अगदी भरून आलं.ती झपाट्याने त्यांच्या दिशेने येऊ लागली.त्यांच्या जवळ जाणार इतक्यात मुख्याध्यापक म्हणाले, "मुग्धाताई,देशमाने सरांची वृद्धत्वामुळे दृष्टी अधू झालीय.ते तुम्हाला ओळखणार नाहीत."

  "मी बघते प्रयत्न करून."मुग्धा सरांजवळ आली,त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि उभी राहून त्यांचे हात हातात घेतले.

    "मुग्धा" सरांनी हाक मारली आणि मुग्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.ती काही न बोलता सरांजवळ उभी होती.

   "मुग्धा,डोळे पूस.मला वचन दिलं होतंस न, रडणार नाहीस म्हणून."सर म्हणाले.

   "हो सर, पण हे अश्रू तुमच्यासाठी आहेत. ते तसेच वाहू द्या.माझी गुरुदक्षिणा समजा हवं तर" मुग्धा रडतच म्हणाली.

   "तुझं यश,तुझी कीर्ती ऐकली तेव्हाच मला माझी गुरुदक्षिणा मिळाली बाळा.तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."

   मुग्धाने सरांना हात धरून स्टेजवर आणलं. मुख्याध्यापकांना ती विनंती करणार होती की सत्कार तिचा नाही तर तिच्या श्रद्धास्थानाचा करावा,ज्यांच्यामुळे ती आज इथवर पोहोचली होती........

©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे
-----------------------
*खूपच छान आणि वास्तव कथा.*

मृत्युशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, "बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जातांना मला तुम्हा मुलांना एव्हढंच सांगायचं आहे की मी आज पर्यंत जसं सरळमार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगाल तर मला जी मनःशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल." 

त्याची मुलगी सारा म्हणाली, "बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातांना तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रितं झालेलं आहे. आमच्यासाठी तुम्ही कांहीच पैसा शिल्लक ठेवला नाहीत. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट, सरकारी पैसा चोरणारे चोर, अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती मागे ठेवली आहे. आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग निवऊं द्या." 
थोड्याच वेळात स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा देह निष्प्राण होऊन पडला. 
तीन वर्षांनंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यासाठी मुलाखत द्यायला गेली..
मुलाखतीदरम्यान तिला मुलाखतकाराने विचारलं, "तुझं आडनांव काय म्हणालीस? स्मिथ ना? कुठली बरं ही स्मिथ.....?
यावर सारा म्हणाली, "मी सारा स्मिथ. माझे वडील टॉम स्मिथ. ते आता हयात नाहीत."
मुलाखत घेणाऱ्या पॅनेलच्या अध्यक्षाने जरा अविश्वासाच्या सुरातच विचारलं, "ओहो, तू टॉम स्मिथची  मुलगी आहेस? "
पॅनेलमधील इतर सदस्यांकडे एकवार नजर टाकून तो म्हणाला, "हा स्मिथ नांवाचा मनुष्य तोच आहे बरं कां ज्याने ' Institute of Administrators ' या संस्थेमध्ये माझ्या सभासदत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती आणि आज त्याच्याच शिफारशींमुळे मी आज या पदापर्यंत पोहोचू शकलो.त्याने हे माझ्यासाठी अगदी निरपेक्षपणे, कसलाही मोबदला न घेता केलं. मला तर त्यांचा पत्ताही माहित नव्हता. त्यांची माझ्याशी कसलीही ओळख नव्हती, पण तरीही हे त्यांनी केवळ माझ्या हितासाठी केलं..." 
इतकं बोलून तो साराकडे वळून म्हणाला, "मला तुला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाहीये. तुला ही नॊकरी मिळालीच आहे असं समज. उद्या येऊन तुझं नियुक्ती पत्र या कार्यालयातून घेऊन जा..."
सारा स्मिथ कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीत नियुक्त झाली.. तिच्या दिमतीला ड्रायव्हर सहित दोन कार्स, कार्यालयाला लागूनच असलेला एक डुप्लेक्स बंगला आणि दरमहा एक लाख पौंडांचा पगार आणि याशिवाय इतर भत्ते आणि खर्च इत्यादी मिळू लागलं. 
नोकरीत दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेतून आपल्या देशात परतले आणि त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली. त्यांच्या जागी नवी नियुक्ती करणं आवश्यक होतं. या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मनुष्याची आवश्यकता होती. आणि या जागेसाठी कंपनीच्या सल्लागारांनी पुन्हा एकदा सारा स्मिथच्याच नांवाला पसंती दिली.    
एका मुलाखतकाराला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिला जेव्हा नोकरीतील तिच्या यशाचं गुपित विचारल्या गेलं तेव्हा अश्रू भरल्या नेत्रांनी ती उत्तरली, "माझ्या वडिलांनीच माझ्या यशाचा मार्ग मला आखून दिला होता. ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की सांपत्तिक दृष्ट्या जरी ते गरीब होते तरी सचोटी, शिस्त  आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप खूप श्रीमंत होते.
"आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणींनी रडण्याइतक्या आपण लहान नसूनही आपल्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींमुळे पाणी कां येते?" या, मुलाखतकाराच्या प्रश्नावर
 त्या उत्तरल्या, "माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना ते आयुष्यभर सचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते. आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागतेय. ते मला त्यांच्या थडग्यातून ऊठून निश्चितच माफ करतील अशी मला आशा आहे. मी आज या पदावर पोहोचले ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळे. यात माझं श्रेय काडीचंही नाही."
मग शेवटी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. 
 "मग आपण आपल्या वडिलांनी जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे त्याच मार्गाचं अनुसरण कराल कां?"
यावर त्या म्हणाल्या,"मी आता माझ्या वडिलांना खूप मानते. त्यांचं एक भव्य तैलचित्र मी माझ्या दीवाणखान्यात प्रवेशदारासमोरच लावून ठेवलंय. माझ्यापाशी आज जे कांही आहे त्याचं श्रेय भगवंताच्या खालोखाल मी माझ्या वडिलांनाच देते."
आपणही टाँम स्मिथसारखेच आहोत कां..? 
किर्तीरूपाने शिल्लक राहता येऊ शकते. किर्ती पसरायला आणि किर्तीरूपाने जीवंत होण्यासाठी वेळ लागतो जरूर, पण त्या रूपाने माणूस अमर होऊन जातो..
सचोटी, शिस्त, स्वतःवर ताबा ठेवणं आणि परमेश्वर आपल्याकडे पाहतोय याची सदोदित जाणिव हे गुणच माणसाचं खरं धन आहे, बँक खात्यातील अमाप पैसा नव्हे..
आपल्या मुलाबाळांसाठी हा वारसा ठेवावा..
आपणही या परिवर्तनाचे अग्रदूत बनू या आणि ही सत्यकथा आपल्या माणसांत अधिकाधिक शेअर करू या.🙏
--------------------------
मराठी बोधकथा pdf स्वरूपात download करा व कोठेही, कधीही वाचा त्यासाठी बोधकथा या नावावर click करा.

टिप्पण्या