वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गुढीपाडवा माहिती

 .                     *गुढीपाडवा*


*गुढीपाडवा सुरु होतांनाचा इतिहास..*


*शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले....*


*इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली होती. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.*


*याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती.*


*त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावत असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली.*


*(ईसवी सन ७८) यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले. याच विजयाचे प्रतिक म्हणून गुढ्या उभारल्या जाऊन हा दिवस साजरा करण्याची पद्धत पडली.*


*हिंदू परंपरेनुसार चैत्र महिना हा नव्या वर्षाचा प्रारंभ मानला जातो. या महिन्याची पहिली तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा ही वर्षप्रतिपदा मानली जाते. ‘प्रतिपदा’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषेत ‘पाडवा’ हा शब्द रुढ झाला.*


*वसंतऋतूचे आगमन आणि नव्या  वर्षाचा प्रारंभ म्हणून ‘चैत्री पाडवा’ साजरा होतो. याच दिवशी सातकर्णी विजयी झाला आणि त्याच्या विजयानिमित्त गुढ्या, तोरणे उभारण्याची परंपरा रुजल्याने या सणाला ‘गुढी पाडवा’ असे संबोधले जात असावे

*शिवकाळात फक्त होळी आणि विजयादशमी हे दोनच मुख्य सण साजरे करण्यात येत असल्याचे दिसते. विजयादशमी पण जेव्हा स्वराज्याला थोडी स्थिरता आली तेव्हाच साजरी करायला लागले होते.*


*गुढी उभारतानांचा इतिहास.*

*सातवाहन हे कुंभार कुळाचे म्हणून एक गाडगे काठीला अडकवून ते उभा करून विजय साजरा केला. मग आता आपणच ठरवा इतिहास कसा अभ्यासायचा तो.*


*काळानुसार झालेला बदल.*

*पुर्वी गुढीवर तांब्या किंवा कलश नव्हे तर "गडू" (गडवा) नावाचे जाड पितळाचे पात्र ठेवले जात असे. त्याची जागा स्टेनलेस स्टीलच्या पात्रांनी घेतलेली आहे.*


*त्याकाळी व्यक्तिगत आनंदाच्या प्रसंगीही लोक आपल्या घरावर ती वार्ता घोषित करण्यासाठी गुढी उभारत असत. वस्त्र, आणि डहाळ्या काठीच्या टोकावर लावल्यावर आधार आणि शोभा वाढवणे एवढाच हेतू त्यामागे आहे.*


*कडुलिंबच का?*


*सगळ्यात जास्त औषधी वनस्पती म्हणून कडुलिंब घराजवळ त्याकाळी वाढवले जात असत. तसेच कडुलिंब हा असा कधीही खाल्ला जात नसे. म्हणून त्या सणाला त्याचे महत्त्व वाढले गेले व प्रसाद म्हणून खाल्ला गेला. साखरेच्या गाठीचा शोध अलीकडला आहे, त्याकाळी असे काहीही नव्हते.*


*चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा या दिवसाचे महत्व काय आहे?*


*१) प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक ह्याच दिवशी झाला होता.*

*२ ) युगाब्ध संवत्सर / शके चा प्रथम दिवस- ५११७ वर्ष अगोदर ह्याच दिवशी युधिष्ठिरा चा राज्याभिषेक झाला होता.*

*३ ) विक्रम संवत्सर / शके चा प्रथम दिवस- २०७२ वर्ष अगोदर ह्याच दिवशी विक्रमराजाने राज्य स्थापन केले होते.*

*४) शालिवाहन शके चा प्रथम दिवस- १९३७ वर्ष अगोदर ह्याच दिवशी शालिवाहन राजाने दक्षिण भारतात राज्य स्थापन केले होते.*

*५) नवरात्र स्थापना- शक्ती व भक्ती चे नऊ दिवस. म्हणजेच नवरात्र स्थापनेचा पहिला दिवस. रामनवमीच्या अगोदर नऊ दिवस हा उत्सव मानला जातो.*


*फक्त दक्षिण भारतात गुढी उभारण्याचे कारण,*

*गुढी उभारणे म्हणजेच आनंद साजरा करण्याचे प्रतिक. शालिवाहनाने परकीय हुनांना युद्धात हरवून दक्षिण भारतात श्रेष्ठ असे राज्य स्थापन केले.*

*शालिवाहनांची राजधानी ही भारतातील उत्तर काशी म्हणून व महाराष्ट्रातील पैठण म्हणून ओळखले जाणारे शहर होते. महाराष्ट्रात शालिवाहन शकेच्या नावाने नव वर्ष साजरे करतात, तर उत्तर भारतात विक्रम संवत्सर / शके नुसार नव वर्ष साजरे केले जाते.*

*महाराष्ट्र व दक्षिण भारतात शालिवाहन शकाचा प्रथम दिवस होता तो गुढी उभारून साजरा केला जात असे, परंतु नंतरच्या काळात उत्तर भारतात परकियांच्या व जिहादी प्रवृत्तीच्या होणाऱ्या आक्रमणा मुळे गुढी उभारणे बंद झाले.*


*महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापनेनंतर परत धार्मिक कार्ये वाढीस गेली, यालाच काही बिनडोक प्रवृतीचे लोक शंभूराजे बलिदान हे ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन साजरा करायला रयतेला सांगितलं व सर्व रयतेने हे स्वीकारले, हे मोठ्या खुबीने सांगतात.*


*सर्व थोर संतानी गुढीपाडव्याचा केलेला उल्लेख..*


*टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीचा ||*

*पंढरीची हाट कैवल्याची पेठ | मिळाले संतुष्ठ वारकरी ||*

*पताकांचे भार मिळाले अपार | गर्जे भीमातीर जयजयकारे ||*

*खटनट यावे शुद्ध होऊनि जावे | दवंडी पिटी भावे चोखामेळा ||*


*चोखोबा गुढी चा उल्लेख करताहेत, संभाजी महाराजांच्या जन्माआधी..*


*अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी ।*

*सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।।*


*ज्ञानेश्वरी माऊली ११ व्या शतकात गुढी उभारा बोलत आहेत,*


*अभंग ४६*

*आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥*

*पुढे पाठविले गोविंदे गोपाळा । देऊनि चपळा हाती गुढी ॥२॥*


*तुकोबाराय पण गुढी चा उल्लेख देतात,*


*आता ह्या सर्वांना या तिन्हीपेक्षा जास्त अक्कल असली पाहिजे.*


*शंभूराजे, तुमचे धर्म व हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ झालेले बलिदान हे मुर्ख व्यर्थ न घालो एवढीच शिंव-शंभूराजे आपणा प्रती प्रार्थना, ह्या सर्वांना आपण सद्बुद्धी द्यावी एवढीच वंदना.*


*गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा.*


*१. तिथी- युगादी तिथी, चैत्र शुद्ध प्रतिपदा.*

*२. वर्षारंभ : चैत्र शुद्ध प्रतिपदाच का ?*

*याचा प्रथम उद्गाता ‘वेद’ आहे वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल दुमत नाही. ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ असे वेदात म्हटले आहे वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. वर्षारंभाचा प्रारंभदिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे.*


*आच सर्वजण साजरा करत असलेल्या १ जानेवारीला वर्षारंभ का?*


*याला शास्त्रीय आधार नाही. याऊलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात, गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.*


*अ. गुढीपाडवा : नैसर्गिक महत्त्व.*


*वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस.*

*ज्योतिष शास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंतऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत म्हटले आहे या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धकक्ष असते.*


*शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.*


*आ. गुढीपाडवा : ऐतिहासिक महत्त्व.*


*१ प्रभू श्रीरामांनी बालीचा वध या दिवशी केला. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.*

*२. शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.*


*ही गुढीपाडवा हा वर्षारंभ साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणे आहेत..*


*संर्दभ पहा,*


*इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचीत लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये "तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते, तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया, गुढी उभविली, उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेऊनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो.*


*संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५- १२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी ।ऐसी एक्य वाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात.*


*संत नामदेवजी नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०). संत जनाबाई (निर्वाणइ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनात, गुढीचे उल्लेख येतात.*


*संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात,*


*"टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥"*


*१६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुढी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची,निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रुपके वापरताना आढळतात.*


*अजून एक वैशीष्ट्य या गुढीचे दिसून येते,*


*वारी असो अथवा रणांगण असो जाणाऱ्या समूहा पैकी चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे.*


*४५२९ गाथेत संत तुकाराम त्यांच्या अभंगात म्हणतात "पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥"*


*टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीचा ||*

*पंढरीची हाट कैवल्याची पेठ | मिळाले संतुष्ठ वारकरी ||*

*पताकांचे भार मिळाले अपार | गर्जे भीमातीर जयजयकारे ||*


*खटनट यावे शुद्ध होऊनि जावे | दवंडी पिटी भावे चोखामेळा ||*


*चोखोबा गुढीचा उल्लेख करताहेत, संभाजी महाराजांच्या जन्मा आधी...*

*अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।।*


*ज्ञानेश्वरी, माउली ११ व्या शतकात गुढी उभारा बोलत आहेत,*


*अभंग ४६*

*आस निरसली गोविंदाचे भेटी ।संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥ पुढे पाठविले गोविंदे गोपाळा । देउनि चपळा हाती गुढी ॥२॥*

❄❄❄❄❄🏵️❄❄

     गुढी पाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा !!

                शुभ सकाळ

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा