वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ग.दि. माडगूळकर
माडगूळकर गजानन दिगंबर : (१ ऑक्टोबर १९१९–१४ डिसेंबर १९७७). विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक. जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी (१९४२) आणि पहिला पाळणा (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संगृहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत (तीन चित्रकथा, १९६३). युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता–जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२) आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).
ग.दि. माडगूळकर
जन्म नाव गजानन दिगंबर माडगूळकर
टोपणनाव गदिमा
जन्म ऑक्टोबर १, १९१९
शेटफळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू डिसेंबर १४, १९७७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र साहित्य, चित्रपट
भाषा मराठी
साहित्य प्रकार गीतरचना, कथा, कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती गीतरामायण
टीपा ग. दि. माडगूळकर संकेतस्थळ
माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.
त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत. चित्रपटतंत्राची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यांतून लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत पुढचं पाऊल (पटकथा, संवाद, गीते १९५०), बाळा जो जो रे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२), पेडगावचे शहाणे (१९५२), ऊन पाऊस (१९५४), मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), जगाच्या पाठीवर (१९६०), संथ वाहते कृष्णामाई (१९६७) ह्यांचा समावेश होतो. (कथा, पटकथा, संवाद, गीते त्यांपैकी सर्व वा काही).
तुफान और दिया (१९५६), दो आँखे बारह हाथ (१९५७), गूँज उठी शहनाई (१९५९) हे त्यांनी लिहिलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपट.
माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३) ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत.
त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन (१९६९) त्यांचा सन्मान केला. १९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते; तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते. गदिमा प्रतिष्ठानही काढण्यात आले आहे. पुणे येथे ते निधन पावले.
पुस्तकेसंपादन करा
ग.दि. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :-
गीतयात्री गदिमा : लेखक - मधू पोतदार
__________________________________
Gajanan Digambar Madgulkar
Page issues
Gajānan Digambar Mādgulkar (1 October 1919 – 14 December 1977) was a Marāthi poet, lyricist, writer and actor from India. He is popularly known in his home state of Maharashtra by just his initials as Ga Di Ma (गदिमा). He was awarded Sangeet Natak Akademi Award in 1951[1] and Padma Shri in 1969.[2] He has written 157 screen play and over 2000 songs in his career.[3] He was called Ādhunik Valmiki (the modern Valmiki) of current era due to his composition of Geet Rāmāyan (lit. Ramayana in Songs)as the most notable work.
G. D. Mādgulkar
Gadima.gif
Ga Di Mādgulkar
Born
1 October 1919
Shetphale in Atpadi taluka in Sangli district , Mahārāshtra, India
His village is Madgule in Atpadi
Died 14 December 1977 (aged 58)
Pen name गदिमा (GaDiMā)
Occupation Poet, lyricist, playwright, script writer, dialog writer, actor, and orator
Nationality India
Genre Marāthi
Literary movement Marāthi
Notable works गीतरामायण (Geet Rāmāyan)
Website
gadima.com
CareerEdit
Madgulkar wrote poetry, short stories, novels, autobiographies and scripts, dialogues and lyrics for Marathi as well as Hindi movies. His poems have been adapted to a wide range of musical forms such as Sugam-Sangeet (light music), Bhāwa-Geet (emotional songs), Bhakti-Geet (devotional songs), and Lāwani (a genre of folk songs in Maharashtra). Madgulkar entered the world of movies in 1938 at Kolhāpur. He contributed to 157 Marathi and 23 Hindi movies.[citation needed] He was also an artist. He loved to draw nature drawing.
He had knowledge of 10 languages including Marathi, Hindi, English, Urdu, Bengali, Gujarati, Punjabi, Kannada, Tamil and Telugu.
He was the elder brother of Marathi writer of poetry and novels Vyankatesh Madgulkar. His home is in Dapoli near Ratnagiri. Tourist visit this house as it has been well maintained by his sons.
WorksEdit
Following are some of the list of Collections of poems.
Sugandhi Veena
Jogiya
Char sangitika
Geet Ramayan
Kavykatha
Chaitraban
Geetgopal
Geetsaubhadra
Vaishakhi
Pooriya
Ajun Gagima
Naach re mora
Following are some of the list of collection of short stories-
Laplele ogh
Bandhavarchya babhali
Krushnachi karangali
Bolka shankh
Veg ani itar katha
Thorli pati
Tupacha nandadeep
Chandani udbatti
Bhatache phool
Sone ani mati
Teen chitrakatha
Kalavantanche anand paryatan
Teel ani tandul
Following are autobiographies-
Vatevarlya savlya
Mantarlele diwas
Following are some of the list of novels-
De tali ga ghe tali
Mini
Shashank manjiri
Naach re mora
Tulsi ramayan
Shabdranjan
Aakashachi phale
Ubhe dhage aadve dhage
Following are some of the list of plays-
Aakashachi phale
Parachakra
Following are the monthly magazines -
Akshar
Dharti
Geet RamayanEdit
Main article: Geet Ramayan
Geet Rāmāyan (lit. Ramayana in Songs) is considered his most notable work. A lyrical version of the Valmiki Ramayana in Marathi,[4] it consists of 56 songs chronologically describing events from Ramayana. Sudhir Phadke composed the music for Geet Ramayan. Though it is based on sage Valmiki's epic Ramayana, Madgulkar chose a different narrative format and was praised for the lyrics, and was called Ādhunik Valmiki (the modern Valmiki).
ScreenwritingEdit
जीवनज्योती Jeewan Jyoti 1953: Screenplay and Dialogs
तूफान और दीया Toofān Aur Deeyā 1956: Story
दो आंखे बारह हाथ Do Ānkhen Bārah Hāth 1957: Story, Screenplay, and Dialogs
This movie, which was directed by V. Shantaram, won recognition at an Berlin International Film Festival.[5]
Popular SongsEdit
The following is a short list of some of the popular Marathi songs which "गदिमा" wrote:
इंद्रायणीकाठी देवाची आळंदी (Indrāyani Kāthi Dewāchi Ālandi)
उद्धवा, अजब तुझे सरकार (Uddhawā, Ajab Tujhze Sarkār)
तुझ्या उसाला लागल कोल्हा (Tujhyā Usaālā Lāgel Kolhā)
या चिमण्यानो, परत फिरा रे (Yā Chimanyāno, Parat Phirā Re)
हे काम ने तडीला, हाजी मलंग बाबा (He Kām Ne Tadilā, Hāji Malang Bābā)
विठ्ठला,तू वेडा कुंभार (Viththalā, Tu Wedā Kumbhār)
ActingEdit
Year Movie Language Director Co-Actors
1942 पहिला पाळणा (Pahilā Pālnā) Marathi Vishrām Bedekar Shanta Hublikar, Indu Natu, Baburao Pendharkar, Balabhai, Kusum Deshpande, Dinkar Kamanna, Vishnupant Aundhkar
1947 लोकशाहीर रामजोशी (Lokshāhir Rāmjoshi) (Marathi)/ MatwālāShayar Rāmjoshi (Hindi) Marathi/Hindi Bāburāo Painter (Marathi Version) Jayaram Shiledar, Hansa Wadkar, Shakuntala, Parashuram, Sudha Apte, Samant, Gundopant Walawalkar, Jayaram Desai, Kanase, Sawalaram, Vaidya, Abhyankar
1948 बनवासी (Banawāsi) Hindi Kumār Chandrasekhar
1948 अदालत (Adālat) Hindi Vasant Joglekar
1950 पुढचं पाऊल (Pudhche Pāool) Marathi Rājā Parānjpe P.L. Deshpande, Hansa Wadkar, Kusum Deshpande, Vivek, Mohammed Hussain, D. S. Ambapkar, Bal Chitale, Raja Paranjpe, Shakuntala Jadhav, Suman, Ravindra, Baby Neela
1952 लाखाची गोष्ट (Lākhāchi Goshta) Marathi Rājā Parānjpe Chitra, Rekha, Raja Gosavi, Indira Chitnis, Ravindra, Sharad Talwalkar, Raja Paranjpe, Madan Mohan
1952 पेडगावचे शहाणे (Pedagāwache Shahāne) Marathi Rājā Parānjpe Raja Paranjpe, Chittaranjan Kolhatkar, Dhumal, Master Dwarkanath, Vasant Shinde, Nalini Nagpurkar, Nayana, Prasad Sawkar, Sadashiv Thakar, Ganpatrao Kelkar, Daldaseth
1952 जीत (Jeet Kiskee) Hindi Vasant Joglekar
1953 अंमलदार (Ammaladār) Marathi K. Nārāyan Kāle P. L. Deshpande, K. Narayan Kale, Sheila Naik, Leela Ogale, Vinay Kale (Music Composer: G. D. Madgulkar)
1960 जगाच्या पाठीवर (Jagāchyā Pāthiwar) Marathi Rājā Parānjpe Ramesh Deo, Seema Deo, Dhumal, Raja Paranjpe, Mai Bhide, Vinay Kale, Raja Gosavi, Sharad Talwalkar, Raj Dutt
Awards and recognitionsEdit
Sangeet Natak Akademi Award – 1951
Padma Shri – 1969
Personal lifeEdit
Madgulkar was married to Vidya (Padma Patankar,Kolhapur) and they had 3 sons (Shridhar,Anand,Sharatkumar) and 4 daughters (Varsha,Kalpalata,Deepa,Shubhada.[citation needed] The popular marathi writer, Vyankatesh Madgulkar was the younger brother of Gadima.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा