वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*आम्ही कुणब्याची पोरं*...
आम्ही कुणब्याची पोरं
गाडा जगाचा ओढतो,
दिला शब्द पाळताना
दुःख बांधाला गाडतो.......
सरकारी आडतासं
सावकारी मुरडानं,
भेगाळल्या भुईतून
हिर्व बर्कतीचं गाणं,
पेंढी, पाचुंदा, मदान
ढीग खळ्यात वाढतो
दिला शब्द पाळताना
दुःख बांधाला गाडतो.....
तळहाताच्या घठ्ठ्याची
खोप उदासून जाते,
फुटे देहाला पाझर
त्याची चंद्रभागा होते,
दातळाच्या संगतीनं
वाफा, वरंभा वढतो
दिला शब्द पाळताना
दुःख बांधाला गाडतो......
काळ्या मातीत रुजल्या
काळजाच्या संवेदना,
नाडा, सोंदूर मोटंचा
थारोळ्यात गातो कणा,
ओला सांगावा पाटाचा
दंडा- दंडात धाडतो
दिला शब्द पाळताना
दुःख बांधाला गाडतो.......
*हनुमंत चांदगुडे*
*सुपे, बारामती*
9130 552 551
आम्ही कुणब्याची पोरं
गाडा जगाचा ओढतो,
दिला शब्द पाळताना
दुःख बांधाला गाडतो.......
सरकारी आडतासं
सावकारी मुरडानं,
भेगाळल्या भुईतून
हिर्व बर्कतीचं गाणं,
पेंढी, पाचुंदा, मदान
ढीग खळ्यात वाढतो
दिला शब्द पाळताना
दुःख बांधाला गाडतो.....
तळहाताच्या घठ्ठ्याची
खोप उदासून जाते,
फुटे देहाला पाझर
त्याची चंद्रभागा होते,
दातळाच्या संगतीनं
वाफा, वरंभा वढतो
दिला शब्द पाळताना
दुःख बांधाला गाडतो......
काळ्या मातीत रुजल्या
काळजाच्या संवेदना,
नाडा, सोंदूर मोटंचा
थारोळ्यात गातो कणा,
ओला सांगावा पाटाचा
दंडा- दंडात धाडतो
दिला शब्द पाळताना
दुःख बांधाला गाडतो.......
*हनुमंत चांदगुडे*
*सुपे, बारामती*
9130 552 551
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा