वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
UPI हि भानगड आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल .मी २ दिवसापासून थोडा अभ्यास केला आणि आता त्या बददल लिहितोय .तुम्हाला आवडेल आणि कामी येईल अशी सुविधा आहे . नक्की वाचा .
आपल्यापैकी बरेच जण Paytm ,Freecharge यांसारखे M Wallet (मोदींच्या भाषेत इ-बटवा) वापरत असतील.
या M Wallet चा मेन प्रॉब्लेम आहे कि यात पैसे टाकून आपल्याला खर्च करावे लागतात .आणि समोरचा विक्रेता आपल्याकडे असलेले M Wallet च वापरत असेल याचा काय भरोसा .अशा वेळी इच्छा असूनही आपण कॅशलेस व्यवहार करू शकत नाहीत मग शेवटी हात खिशाकडे वळतो.
भारतात युनिव्हर्सल वापरात असेल आणि ज्या अँप्स मधून कोणीही पैसे स्वीकारू शकतो किंवा घेऊ शकतो असं काहीतरी पाहिजे होतं असं वाटत पण भारत सरकार ने दिलेली UPI हि अशीच सुविधा भारतात जन्माला आली.जिच्याने कोणीही कोणालाही पैसे देऊ शकतो आणि घेऊ शकतो.
१. UPI म्हणजे काय ?
UPI (यूनिफाईड पायमेन्ट इंटरफेस) म्हणजे स्मार्टफोन च्या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे पाठवण्याची सोप्पी साधी पद्धत.(भारतात असलेली सर्वात सोपी पद्धत म्हटली तरी चालेल ) .हि सुविधा भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी भारतातल्या २१ राष्ट्रीयकृत बँकांच्या सौजन्याने दिली आहे .जिचे सर्व व्यवहार NPCI (नॅशनल पायमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्यादेखरेखी खाली चालतात .
२.एम वॉल्लेट आणि UPI मध्ये काय फरक आहे ?
M wallet खाजगी कंपन्या चालवतात . UPI हि सुविधा सरकार चालवते यात अँप खाजगी किंवा बँकांचे असू शकतात पण आपल्याला त्या अँप मध्ये पैसे टाकावे लागत नाहीत जे काही होते ते थेट Bank Accout ते Bank Account .
उदा. आपण Paytm वापरत असू आणि एखादा Paytm स्वीकारणाऱ्या चहावाल्याला आपल्याला पैसे द्यायचे असतील तर आपल्याला आधी आपल्या बँक खात्यातून Paytm ला पैसे टाकावे लागतील मग त्याच्या paytm ला द्यावे लागतील . आणि वर त्याला त्याचे paytm चे पैसे बँकेत टाकायला १.५% रक्कम comission म्हणून द्यावी लागेल .
मात्र UPI मध्ये एवढं घुमावफिरावं नसतं . UPI चे सर्व व्यवहार हे मोफत असून UPI ला एकदा का आपण आपलं Credit किंवा Debit कार्ड link केलं कि आपल्या बँकेतून पैसे थेट समोरच्याच्या बँकेत पैसे टाकू शकतो .म्हणजे मध्ये कुठल्या wallet ची गरज नाही किंवा बँकेत पैसे येण्यासाठी कुठले commision देण्याची गरज नाही .
M Wallet - (ग्राहक) बँक ---Wallet ----Wallet ----बँक (विक्रेता )
UPI - (ग्राहक) बँक --------------------------------बँक (विक्रेता)
M wallet आणि UPI मधला मूळ फरक आणि महत्वाचा फरक हा आहे कि स्मार्ट फोन वर असणाऱ्या कोणत्याही बँकेच्या UPI अँप वरून कोणत्याही बँकेच्या UPI अँप वर पैसे पाठवता येतात .यात M wallet सारखे त्याच कंपनी चे अँप वापरण्याचे बंधन नसते.
३.UPI अँप कसे आणि कुठून डाउनलोड करायचे ?
UPI हि सुविधा सध्या भारतातल्या २१ बँका देतात . सोप्पे सांगायचे तर या २१ बँका एकमेकांमधले आर्थिक व्यवहार UPI च्या माध्यमातून निशुल्क करण्याची सुविधा देतात . या बँकांचे UPI अँप प्ले स्टोर वर उपलब्ध आहेत .
प्ले स्टोर वरील UPI अँप्स च्या लिंक
TJSB Sahakari Bank Ltd's
TranZapp https://play.google.com/store/apps/details?id=in.co.finacus.tjsbbankpsp
हे अँप्स UPI अँप्लिकेशन सुविधा देतात .
यात आपण कोणत्याही बँकेचे खातेधारक असलो तरी देखील कोणत्याही बँकेचे UPI अँप वापरू शकतो .आणि कोणत्याही UPI अँप ने कोणत्याही बँकेच्या खात्यावर पैसे टाकू शकतो .
४. UPI अँप कसे वापराल ?
मी जे अँप वापरतोय त्यावरून सांगतो . मी Tranzapp हे UPI अँप वापरतो.तसे UPI चे सर्वच अँप सारखे असतात फक्त बँके प्रमाणे अँप चे रंग बदलतात :D .कोणतेही upi अँप download केल्यावर पुढील प्रक्रिया कराव्या लागतात .
१.आपला बँकेशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागतो .
२. मग त्यावर OTP येतो आणि आपला मोबाईल नंबर verify होतो .
३.आपली वैयक्तिक माहिती जसेकी नाव ,ई-मेल id हे द्यावे लागते . व आपल्या अँप्लिकेशन साठी एक ४ अंकी पासवर्ड सेट करावा लागतो.
४.यानंतर आपल्याला आपला VPI म्हणजेच vertual payment ID सेट करावा लागतो . VPI म्हणजे आपल्या बँक अकाउंट चा ई-मेल id च असतो . म्हणजे जगात ई-मेल ID हा केवळ एकमेव असतो तसा VPI हा जगात एकमेव असतो .जसेकी माझा VPI आहे mukul.phadnis@tjsb यातला tjsb म्हणजे TJSB Sahakari Bank Ltd तुम्ही ज्या बँकेचे UPI वापरणार त्याचा VPI तुम्हाला मिळेल जसेकी स्टेट बँकेचा वापरल्यास mukul.phadnis@sbi . VPI बद्दल पुढे सविस्तर सांगतो .
५.यानंतर आपली UPI सेवा सुरु करण्यासाठी आपले खाते असलेली बँक निवडावी लागते.
६.तुमचा बँकेशी लिंक असलेला नंबर दिल्यामुळे तुमचे बँक खाते number दिसू लागतो .त्यावरच्या SET MPIN वर क्लिक करा .
७.या नंतर तुमच्या डेबिट कार्ड number चे शेवटचे ६ अंक आणि त्याची expiry date टाका .
८.या नंतर तुम्हाला OTP येईल . तो OTP टाका
९.व सुरक्षे साठी 4 किंवा 6 अंकी MPIN सेट करा. हा MPIN ATM च्या पिन सारखा असतो .म्हणजे UPI अँप मधून केल्या जाणाऱ्या व्यवहारांसाठी हा पिन टाकल्या शिवाय त्या खात्यातून कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही .
१०. शेवटी successfully change pin असा मेसेज येईल . आणि तुम्ही
UPI सुविधेने व्यवहार करण्यास सुरवात करू शकाल .
या नंतर तूम्हाला पुन्हा हि प्रक्रिया कधीही करण्याची गरज नाही फक्त तुमच्या अँप चा ४ अंकी पासवर्ड आणि तुमचा ४ किंवा ६ अंकी MPIN ह्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि गोपनीय ठेवाव्या लागतील .
५. UPI ने पैसे कसे द्याल ?
UPI ने पैसे देण्याच्या ३ पद्धती आहेत .१.मोबाईल नंबर २.VPI ने ३.बँक अकाउंट नंबर ने .
send money व क्लिक केल्यावर हे तीनही पर्याय दिसतील.ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल नंबर UPI वर असेल तर मोबाईल नं वर किंवा समोरच्या कडे VPI असेल तर तो टाकून किंवा थेट बँकेचा अकाउंट नंबर आणि IFSC code टाकून पैसे थेट समोरच्या व्यक्तीच्या खात्यात टाकता येतात .कमीत कमी १ रुपयापासून ते जास्तीत जास्त २ लाखापर्यंत रक्कम UPI मधून पाठवता येते .
६.VPI-म्हणजे अकाउंट नंबर च छोटं नाव .?
VPI हि एक गमतीशीर गोष्ट आहे . ज्यांना सारखा सारखा बँक अकाउंट नंबर सांगायचं कंटाळा येतो त्यांच्या साठी VPI हि एक सहज सोपी आणि गोष्ट आहे mukulphadnis@gmail.com हा जसा माझा ई-मेल आयडी याचा जगात कोणीही पुनर्वापर करू शकत नाही तसाच व्हर्चुअल पायमेन्ट आयडी असतो . हा एकदा ज्याचा झाला कि पुन्हा कोणाला तो घेता येत नाही .म्हणजे mukul.phadnis@tjsb नावाने आता कोणालाही VPI मिळणार नाही त्यासाठी gmail ला करतो तास जुगाड म्हणजे mukul.phadnis143@tjsb @sbi @axis असं करावं लागेल . म्हणजे माझी ओळख हि माझीच राहील. हा VPI आपल्या बँक खात्याशी जोडला जातो म्हणजे जेव्हा कोणीही mukul.phadnis@tjsb या VPI वर पायमेन्ट करेल ते थेट माझ्या बँक खात्यात येईल . इतकं सोप्पं आहे . म्हणजे ना ifsc code सांगायची गरज ना बँक अकाउंट नंबर सांगायची गरज . यामुळे खाते क्रमांकाचा अवैध वापर होणे बंद होते हा देखील एक फायदा असतो .
७.मुख्य प्रश्न . UPI किती सुरक्षित ?
मी आत्ताच एक आर्टिकल The Hindu ला वाचलं त्यात हा प्रश्न होता .तर त्याचं उत्तर होतं
the security is ful-proof as the transaction will happen in a highly encrypted format. Already NPCI’s IMPS network handles more than Rs.8,000 crore worth of transactions a day, which will exponentially increase with the use of mobile phones..
म्हणजेच NPCI (नॅशनल पायमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ) हि या आधी देखील दिवसाला ८ हजार कोटी online व्यवहार नियंत्रित करत होती अशी व्यवस्था किती सुरक्षित असते हे आपणच समजून घ्यावे .
तसेच आता आधार कार्ड देखील UPI मार्फत जोडली जाऊन फक्त आधार कार्ड (नंबर) वरून बँक व्यवहार शक्य आहे.
मला वाटत कि तुम्हाला हि माहिती पुरेशी असेल मी सध्या हाच प्रयत्न करतोय कि देशात सुरु असलेल्या ह्या कॅशलेस अभियानाला हात भर कसा लावता येईल जेव्हापासून UPI हे तीन अक्षर ऐकायला आलेत सर्वांना कुतूहल होतं .आणि तुमचं निरसन झालं असेल असं समजतो . M wallet पेक्षा किती तरी जास्त सोयीची आणि सोप्पी प्रक्रिया UPI देतं जगात प्रत्येक देशाची एक payment सिस्टिम आहे . अमेरिकेकडे अँड्रॉइड आणि apple pay आहेत . चीन कडे त्यांची पायमेन्ट सिस्टिम आहे .आपल्या तंत्रज्ञानाच हे श्रेय आहे कि आपण आपली स्वदेशी आणि सुरक्षित अशी एक पायमेन्ट सिस्टिम बनवली आहे.भारतात एक युनिव्हर्सल पायमेन्ट सिस्टिम आली आहे .आणि हि शाश्वत आहे हे महत्वाचं .ऐकण्यात तर असही आलाय कि यामुळे M wallet बंद व्हायची वेळ येईल पुढच्या काही वर्षात . मुख्य म्हणजे हि सुविधा सोपी आणि सरळ आहे . तुम्हीही तुमच्या डेबिट कार्ड च्या साहाय्याने UPI पायमेन्ट method सुरु करून देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यास मदत करा एवढेच आवाहन :)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा