वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ना पालखीत दिसतो ना किर्तनात
विठ्ठल मला निरंतर *विद्यालयात* दिसतो...
जाऊ तरी कशाला वारीत पंढरीच्या
ज्ञाना तुका विठोबा जर *बालकात* दिसतो...
घेऊन लेखणीची हातात टाळ वीणा
तो सावळा *फळ्यावर* अन् *पुस्तकात* दिसतो...
हितगूज *पाखरांचे* वाटे अभंगवाणी
हा रोज संतमेळा मज *प्रांगणात* दिसतो..
खांद्यावरी पताका मी घेतली तिरंगी
आभास विठ्ठलाचा मज *माणसात* दिसतो..
# पांडुरंग हरी.. वासुदेव हरी..🚩
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा