वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*बुद्ध आशिर्वाद देत नाही, बुद्ध शाप ही देत नाही..*
*बुद्ध कोंबडे, बकरे खात नाही, बुद्ध नवसाला ही पावत नाही.. बुद्ध अगरबत्ती मेणबत्ती ही मागत नाही..*
*बुद्ध आस्तिक नाही, नास्तीक ही नाही, बुद्ध वास्तविक आहेत..*
*बुद्ध म्हणजे आचार, विचार, रित आहे, बुद्ध म्हणजे वास्तव आहे..*
*बुद्ध मार्ग दाता आहे, जगण्याची आदर्श शैली म्हणजे बुद्ध..*
*बुद्ध कोणाला पावत नाही.. कोणावर कोपतही नाही, बुद्ध कोणाला आशीर्वाद देत नाही.. कोणाला शाप देत नाही..*
*बुद्ध कोणाच्या अंगातही येत नाही... अंगात येणारे देव,भूत, प्रेत आत्मा यांचं अस्तित्व मात्र नाकारतो. ते स्वतःला देव म्हणवून घेत नाही..*
*बुद्धांना पूजा नकोय... ते कुणालाही भीती दाखवत नाही, ते जगण्याचा मार्ग दाखवतात... कारण बुध्द मुक्तीदाता नसून, मार्गदाता आहेत..*
*कुणाचाही द्वेष न करणे म्हणजे बुद्ध, खरे बोलने म्हणजे बुद्ध द्वेषाला प्रेमाने उत्तर देऊन शांतता प्रस्थापित करायला बुद्ध सांगतो..*
*बुद्ध माणसाच्या मनाला महत्त्व देतो.. मन चांगले करावे असे सांगतो.. मनात वाईट विचार येऊ नयेत सांगतो..*
*बुद्ध कर्माला महत्त्व देतो.. चांगले कर्म करा वाईट करू नका, असे सांगतो..*
*बुद्ध बुद्धीला महत्त्व देतोच, पण बुद्धीपेक्षा शील, नैतिकतेला जास्त महत्त्व देतो..*
*अत्त दिप भव: ... यांचा अर्थ.. कुणाचेही अनूकरण न करता स्वयंप्रकाशीत व्हा व माझे सुध्दा अनूकरण करु नका.. चिकित्सक व्हा.. सम्यक बुद्धिने विचार करा बुद्ध सांगतो !!*
*जगाला सर्वप्रथम शांतीचा संदेश देऊन अखिल मानवजातीला अहिंसेकडे ज्याने वळवलं त्या महामानव गौतम बुद्धाच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा !!*
🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा