वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*◼️ विपस्सना का करावी ?*
✅मी मुद्दामून हा एक point सुरवातीलाच सांगताे. कि,
आपण विपशस्यनेमुळे जात धर्माच्या पुढे जाऊन, माणुस माणसाला माणुस म्हणुन बघायला शिकताे. म्हणजे माणुस माणसासारख वागताे. माणुस म्हणुन वागताे.
✅आपण किती काया, वाचा मनाने शुद्ध आहाेत याची जाणीव हाेते. आणि अधिक स्वतःला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करताे
✅आपल शरीर काया वाचा मन अधिक जागृक रहातात.
✅आपण निसर्गाच्या आधिक जवळ जाताे, निसर्गाला जवळुन अनुभवू शकताे, प्रत्येक क्षण.
✅प्राणी जीव यांच्यावर अधिक प्रेम करायला लागताे.
✅महत्वाचे म्हणजे आपण विचलित न हाेता. पुर्वी पेक्षा अधिक स्थिर, एकाग्र हाेताे.
✅आपल्याला आपल्या ठरवलेल्या ध्येय, गाेष्टी, प्लॅन शिवाय आपल्याला काहीच दिसत नाही. पुर्ण नियंत्रण आपलं आपल्या नियाेजित कामावर करता येत.
✅आपण अधिक सकारात्मक विचार करायला लागताे.
✅आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत. आपला रागीट स्वभाव कमी हाेताे. आपल्यातील भडकपणा कमी हाेताे.
✅तुम्ही वाईट बाेलताे म्हणून, जरी ठरवला तरी तुम्ही बाेलु शकणार नाही. इतक जागरूक हाेता.
✅आपल्याला सहजा सहजी इतर काेणाचा काेणाताच त्रास हाेत नाही.
झालाच तर त्याचा तीव्र परिणाम, तुमच्या मनावर हाेणार नाहीत. आणि हाेऊ देत नाही. तुम्ही त्या वाईट गाेष्टी नियंत्रीत करू शकता.
✅आपल्या आजुबाजूचा गाेंगाट, निगेटिव्ह, त्रासदायक व्यक्ती, घटना, प्रसंग यांचा तुमच्या मनावर काहीही परिणाम हाेत नाही.
✅आपल शरीर हलकं हाेत जात की, आपल वजन आपल्यालाच जाणवत नाही इतक आपण प्रसन्न व हलके हाेताे.
✅आपल्यातील विकार कमी हाेतात. म्हणजे आपल्याला जुने शारिरीक दुखणे पुर्णपणे बरे हाेते. तसेच इतर शारीरिक व्याधी कमी हाेतात.
✅आपल्या पंचइंद्रियांवर आपण अधिक प्रमाणात नियंत्रण ठेवताे.
✅आपल्याला आपल्यातील कंपनं जाणवू लागतात. शरीराच्या बाहेरील व आतील हाेणारे बदलहीजाणवू लागतात.
✅तुमचे कान, नाक ( श्वास ), त्वचा ( स्पर्शज्ञान ) जागृत, व तीक्ष्ण हाेतात.
तुम्हाला या आधी कधीच न जाणवणाऱ्या गाेष्टी जाणवु लागतात. म्हणजे लांब पर्यंतचा पक्षांच आवाज, असेच इतर निसर्गातील आवाज ऐकू येतात, जाणवु लागतात. ( जर मनापासून विपस्यना केली तर व विपस्यनेचे नियम काटेकोरपणे पाळले तरच )
✅सतत तुम्ही एक स्वतंत्र नैसर्गिक अनुभूती मध्ये रहाता. प्रत्येक चांगले आणि वाईट घटना, प्रसंग ती आपल्याबरोबर च का घडली ? त्याला आपण किती आणि कसे जबाबदार आहाेत या प्रश्नांची उत्तरे आपणाहुन आपल्याला कळतात.
✅आपली सध्याची शारीरिक, मानसिक, काेेैंटुंबिक, आर्थिक, सामजिक परिस्थिती कशी पुर्वी पेक्षा चांगली करता येईल समजुन येत.
✅एक आपण अस हाेताे कि आपल्या काया, वाचा मनाने आपल्याकडून काेणत्याच प्रकारे त्रास हाेणार नाही अस आपण तयार हाेताे. ज्यावेळी आपण चांगला विचार, सुंदर कल्पना मनात करताे त्यावेळी आपल मन विचार ही तेवढेच शुद्ध व प्रसन्न आणि निस्वार्थ असतात. आणि आपण ज्यावेळी इतरांच्या बद्दल वाईट विचार करताे किंवा मनात विचार आणताे त्यावेळी आपल मन विचार ही मलीन झालेल असतात त्यावेळी त्या वाईट विचाराचा, मनाचा पहिला आपल्यावरच त्याचा वाईट परिणाम हाेताे.
✅आपण जर सतत स्वतः हा बद्दल आणि इतरांबद्दल आपल्या मनात वाईट विचार आणले तर, आपण आपल्या आयुष्यात आपले काहीच चांगले करू शकणार नाही. आपल कधीच चांगल हाेणार नाही.
यांमुळे आपल शरीर, विचार, मन, फुल हाेण्याऐवजी एक मळीचा ढिग हाेऊन जाईल. त्यामुळे आपल्याला काेणीही चांगल म्हणणार नाही.
✅आपण फुल का हाेऊ नये 😊🌷
✅एक साधी मजेशीर गाेष्ट सांगताे, आपल्याला फुले का आवडतात ? तर, त्याचे कारण त्याचे रूप, साैंदर्य व त्याचा सुगंध आपल्याला आकर्षित करताे व आपण त्याकडे जाताे, मग त्या त्या फुलांचा अस्वाद घेताे. म्हणून आपल्याला सर्वच फुल आवडतात. मग आपणही फुल का हाेऊ नये ?
का स्वतःला काया, वाचा, मनाने सुगंधित, सुंदर का बनवु नये ?
हाेय शक्य आहे. आपणही फुल हाेऊ शकताे. त्यासाठी आपल्याला थाेडं बदलवावं लागेल आणि निसर्गाच्या नियमांचे पालन करून आपणही फुल हाेऊ शकताे. आणि सगळेच आपल्यावर आणि आपण सगळ्यांवर प्रेम करू शकतील, असं रहायला काेणाला आवडणार नाही ? सगळ्यांनाच आवडेल. त्यासाठी आपल्याला विपस्यना करावी लागेल. विपस्यना हाच एक शुद्ध मार्ग आहे...! आपण सुगंधी फुल हाेण्यासाठी...!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा