वैशिष्ट्यीकृत पोस्ट

छत्रपती संभाजी महाराज

 ********************************
*🚩 १४ मे 🚩*
*छत्रपती संभाजी महाराज जयंती*
********************************

जन्म - १४ मे १६५७
स्मृती - ११ मार्च १६८९

छत्रपती संभाजीराजे भोसले हेे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. सदैव प्रजेला मदत करणारे व दुःख वेचून घेणारे, प्रजेचे संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारे मराठा साम्राज्य संस्थापक शिवाजी महाराज भोसले यांचे जेष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराजांनी आपल्याकडे घेतली. १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजीराजांचा रायगड किल्यावर राज्याभिषेक झाला. अल्पवधीतच त्यांनी आपल्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर मराठा साम्राज्याच्या विस्तार केला.

मराठा साम्राज्याच्या १५ पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराज यांनी एकहाती लढा दिला. महाराजांनी गनिमी कावा करत औरंगजेबाला जेरीस आणले होते. संभाजी राजे यांनी एकूण १२० युद्धे लढली व व ही सर्व युद्धे त्यांनी जिंकली.

संभाजी राजांनी आपल्या अतुल्य शौर्य आणि लष्करी तेजाने आपले सामर्थ्य सिद्ध केले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी रामनगर येथील पहिली लढाई जिंकली.

वयाच्या १४ व्या वर्षी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांना सोळा भाषा अवगत होत्या. शिवाजी महाराज जरी नौसेनेचे जनक असले तरी संभाजी महाराजांनी पाच जहाज बांधणीचे कारखाने उभारून मोलाचे योगदान दिले.

‘मोडेन पण वाकणार नाही’ हाच बाणा घेऊन जन्माला आलेल्या संभाजी महाराजांनी पाच लाखाची फौज घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला तुटपुंज्या ७० हजारांच्या फौजेनिशी सामोरे जात स्वराज्याचे रक्षण केले.
 
*महाराजांची कामे*

* जगातील पहिला तरंगता तोफखाना निर्माण केला.
* युध्द भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात जगातील पहिले बुलेटप्रुफ जॅकेट तयार केले.
* दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले.
* रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली.

छत्रपती संभाजी महाराज फितुरांमुळे शत्रूच्या हाती लागले. ११ मार्च १६८९ रोजी स्वराज्य रक्षणासाठी, स्वधर्म रक्षणासाठी स्वराज्याच्या या तेजस्वी सूर्याने बलिदान दिले.

स्वराज्याचे संरक्षक आणि शिवरायांच्या शंभू छावा छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा.


*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

********************************

टिप्पण्या