वैशिष्ट्यीकृत पोस्ट

आई

 *🤱✳️🌹आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही अश्या आमच्या आई एक महान दैवत आहेत...!!!*🤱✳️🌹🙏

*सत्य आहे 'आई ही आपल्यासाठी एक देवच आहे' जी सतत आपल्या पाठीशी उभी असते, आपल्या साठी एक आधार बनून. तीला कशाचीच अपेक्षा नसते, आपल्याकडुन हवे असतात ते फक्त दोन प्रेमाचे शब्द. निस्वार्थपणे जी आपल्या लेकरावर प्रेम करते, त्याचे पालन पोषण करते, त्याला लहानाचं मोठं करते, त्याला काय हवं काय नको याची काळजी घेते, मग खरंच ती देवाचे स्वरूपच नाही का?, आपला सांभाळ करण्यासाठी देवाने तिला बनवलं असेल कदाचित आणि त्यासाठी तिला आपल्याजवळ पाठवलं असेल...!!!*
 
*ती जन्म घेते एक मुलगी म्हणून, त्यानंतर ती विविध प्रकारच्या भूमिका जीवनात पार पाडते, पण त्या भूमिकेमधील एक भूमिका सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे आई. नऊ महिने ती बाळाला आपल्या पोटात ठेवते, त्याचं संगोपन करते, आणि त्यानंतर प्रचंड त्रास सहन करून ती त्याला जन्म देते, म्हणजे एक नवीन जीव तयार करण्याची क्षमता तिच्या मध्ये आहे, मग ती खरंच महान नाही का?, बाळाला जन्म देताना तीला ज्या वेदना सहन कराव्या लागतात, त्या कुणीही सहन करू शकत नाही, इतकी ती महान आहे. देवाची पूजा करत असतांना देवाला गंध, धूप दीप, अगरबत्ती, फुले, नैवेद्य यासारख्या गोष्टींची आवश्यकता असते, पण आईला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही, तिला तुमचं एक हास्यच खूप आहे. तुमचा हसरा चेहरा पहला कि ती प्रसन्न होते, आनंदी होते. मग खरच ती एक महान दैवत नाही का?...!!!*

*प्रत्येक मनुष्याच्या तोंडी आई हा शब्द असतो. जेव्हा त्याला दुःख होते तेव्हा प्रथम शब्द तो 'आई 'हाच उच्चारतो, त्यामुळे तिचं महत्त्व खूप जास्त आहे, किंवा आपण असेही म्हणू शकतो की जगाची सुरूवातच तिच्यापासून आहे, आपली सुरुवात तिच्यापासून आहे, आपण तिच्यामुळेच या जगात आहोत, त्यामुळे ती खरंच एक देव स्वरूपच आहे. आई या संकल्पनेवर मी लिहिलेली एक सुंदर कविता देखील प्रस्तुत आहे...!!!*

 *एकदाच आपण थकून जाऊ पण ती काम करून कधीही थकत नाही. तिचं सतत काही ना काही सुरूच असतं. तिला घरच्या लोकांची खूप काळजी असते, खास करून तिला तिच्या बाळाची खूप जास्त काळजी असते. ती जे काही आपल्यासाठी करते त्याचे आभार आपण शब्दात मांडू शकत नाही इतकी ती महान आहे...!!!*

*बाळाला जन्म देण्याच्या आधीच तिचं जग आणि जन्म दिल्यानंतरच तिचं जग यामध्ये खूप फरक असतो. बाळाच्या जन्मानंतर तिच सगळं जग हे त्याच्या अवतीभवती फिरत असतं, तिच्या जीवनाचा उद्देश ती त्या बाळाला बनवून घेते, ती त्याच्यातच गुरफटून राहते, आणि का होईना, ते बाळ त्या आईच्या शरीराचा एक भागच असतं, त्यामुळे कदाचित असे होत असावं. आई साठी इंग्रजी भाषेतून मी लिहिलेली एक कविता प्रस्तुत करत आहे...!!!*

 *आई ही खरंच खूप महान असते म्हणूनच कदाचित देवी -देवता यांना सुद्धा आपण आई या नावाने हाक मारतो. कारण ती एक देवाचे स्वरूपच आहे. वात्सल्याचा झरा, प्रेमाचा आसरा, अशी आई एक देवाचं स्वरुपच आहे....!!!*
🙏

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹

टिप्पण्या