वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा खास वैशिष्टयपूर्ण लेख मानवतेचा संदेश देणारा.. ज्याची आज आपल्या देशाला खरी गरज आहे.अनेक मासिकातून प्रसिद्ध झालेला हा लेख..
*डॉ बाबासाहेब आंबेडकर मानवतावादी तत्त्ववेत्ते..*
लेखिका : सुषमा सांगळे-वनवे
डॉ.बाबासाहेब म्हणजे समाजाला मिळालेले एक रत्नच होय.त्यांना अभिप्रेत असलेला धर्म म्हणजे मानवता.आणि त्यांचे जीवन कार्य म्हणजे सामाजिक क्रांतीचे एक महाकाव्य होय.आजही आपल्या देशात धर्माच्या नावावरून अराजकता माजते आहे.सर्व परिचित असलेला राममंदिर बाबरी मशीद तंटा अद्यापही मिटलेला नाही.आणि आता तर लोक..ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान समाजसुधारण्यासाठी केले अशांचीच वाटणी करू लागले आहेत.प्रत्येक जण आपल्या जाती धर्मानुसार नेत्याला वाटून घेत आहे.मग यावेळी असे म्हणावेसे वाटते, ते म्हणजे..'जात नाही ती जात '
डॉ.बाबासाहेबांचे धर्मांतर हे पारंपरिक अर्थाने एक धर्म सोडून अन्य धर्मात जाणे नव्हते ,तर पारंपरिक धर्मश्रद्धेला छेद देऊन नव्या धर्मश्रध्देचा संस्कार स्वीकारणे होते,पण दुर्दैवाने आम्ही धर्मांतर म्हणजे एक धर्म सोडणे व दुसरा स्वीकारणे असा त्याचा अर्थ लावला.
डॉ आंबेडकरांनी लौकिक जीवनातील अनुभव,बौद्धिक जडणघडण या आधारे स्वतःचे तत्वज्ञान साकार केले आहे. त्यांच्या तत्वज्ञानाचे सार त्यांच्याच शब्दात पुढीप्रमाणे सांगता येईल.." माझे तत्वज्ञान म्हणजे निश्चितपणे तीन शब्दात गुंफले जाण्याचा संभव आहे.ते म्हणजे स्वातंत्र्य,समता व बंधुभाव.! माझे हे तत्वज्ञान मी कोणत्या राज्यक्रांतीपासून उसने घेतले आहे असे कोणी समजू नये तर माझा गुरू बुद्ध आहे.व त्यांच्या शिकवणीतून मी ते काढले आहे."त्यांनी अनेक धर्मांचा सूक्ष्म अभ्यास केला.त्यांना वेड होते ते वाचनाचे..तासनतास ते वाचत बसायचे त्यावेळी ते भूक, तहान,वेळ आणि आजूबाजूची परिस्थिती ही हरवून जायचे.या गोष्टीचा मौलिक संदेश देण्यासाठीच तर पाठ्यपुस्तकात त्यांचे पाठ दिले गेले आहेत.पण खेदाची बाब ही आहे की या गोष्टीकडे लक्ष देण्यास आपल्याला वेळ नाही.मोबाईल मध्ये अत्यंत व्यस्त असलेली आजची पिढी स्वतःला फार सुशिक्षित समजतेय.
डॉ.आंबेडकरांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी दीक्षाभूमीवर विजयादशमीच्या मुहूर्तावर बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन केवढे दुर्लभ सीमोल्लंघन केले.खरे पाहता धर्माचा सूक्ष्म विचार कोणीच करत नाही.धर्माच्या आद्य तत्वांची पर्वा कुणालाच नाही.ग्रंथप्रामान्य,अंधश्रद्धा व अज्ञ समजुती यांनी कित्येक धर्मांना ग्रासून टाकले आहे.सत्य काय आहे हे कोणीच पाहत नाही.
डॉ.आंबेडकरांनी 'शिका व संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा संदेश दिला इथे प्रथमच निरक्षर असणाऱ्या माणसाला साक्षर होणे महत्त्वाचे आहे.माणूस साक्षर झाला म्हणजे सुशिक्षित झाला असे म्हणता येत नाही.आजही कित्येक सुशिक्षित माणसे दैववादावर भरोसा ठेवून असतात हे आपण पाहतो.इथे बाबासाहेब म्हणतात.दैववादापेक्षा बुद्धीवाद श्रेष्ठ आहे.बरं करणारा जर फक्त ईश्वर असता तर माणसाने विज्ञान तंत्रज्ञानात एवढे संशोधन का केले असते..? पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज आपण २१ व्या शतकात पदार्पण करूनही हे वास्तव स्वीकारू शकलो नाहीत.सुशिक्षितांचे पहिले लक्षण म्हणजे सत्य स्वीकारणे हे आहे.पण आपण सत्याला दैववाद जोडतो व त्यापासून चार हात दूर जातो.
आजही आपल्यावर रूढी परंपरांचा पगडा एवढा आहे की, ज्यातून आपण मुक्त झालेलो नाहीत.स्त्रियांच्या मानसिक,बौद्धिक,सामाजिक,आर्थिक अंगाने विकास होण्यास अजूनही योग्य वातावरण आम्ही निर्माण करू शकलो नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारचळवळ व्यापक अशा मानवमुक्तीच्या ध्यासावर उभी आहे.हा बहिष्कृत भारत प्रबुद्ध भारत व्हावा हे त्यांचे स्वप्न होते.
२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाला.तो दिवस म्हणजे रक्तहीन स्वरूपातील सर्वंकष क्रांतीचा आरंभ म्हटले तर वावगे ठरणार नाही.अशा या भारताचे संविधान निर्माण कार्यात स्वतःची प्रज्ञा,प्रतिभा,अन परिश्रमाचे महत्वपूर्ण योगदान देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही निर्विवाद पणे घटनेचे शिल्पकार मानतो.पण हे करण्यास त्यांना केवढा संघर्ष करावा लागला असेल या कल्पनेच्या पलीकडे आपण पोहचू देखील शकत नाही.बाबासाहेब ज्या ग्रंथाने प्रभावित झाले तो ग्रंथ म्हणजे ' इसेन्स ऑफ बुद्धिझम' ग्रंथाने क्रांतिकारी स्थित्यंतरे घडत जातात याचाच प्रत्यय म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर.बुद्धाच्या विचारपरंपरेने अधोरेखित केलेल्या चांगल्या गोष्टी म्हणजे प्रज्ञा-शील-करुणा या होत.या चांगल्या गोष्टींचा प्रत्यय व्यक्तीच्या आचार,विचार आणि वर्तनशैलीतून मिळतो.मानवी वर्तनाचे आदर्श बुद्धाने सांगितलेल्या पंचशिलाचे केवळ ग्रहण,स्मरण नाही तर प्रत्यक्ष अनुसरणातून प्रकटतात. त्या सर्व चांगल्या गोष्टीची जपणूक हेच आमचे व्यक्तिगत व सामाजिक स्तरावरील जीवनध्येय असणे म्हणजे हीच खरी राष्ट्रभक्ती व हाच खरा मानवतावाद ठरणार आहे.आणि तेंव्हाच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खरी वंदना पोहचणार आहे..!!
लेखिका : सुषमा सांगळे - वनवे
साहित्यिका,शाळा वागदरी- जिल्हा उस्मानाबाद
मो.नं.9420312651

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा