वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बालशहीद शिरीषकुमार स्मृतीदिन
By: | Last Updated: 09 Sep 2012 06:36 AM
नंदुरबार :
भारतीय स्वातंत्र्यासाठी
अनेकांनी आपल्या प्राणाची
आहुती दिलीय. मात्र अगदी
लहानपणीच शहीद झालेल्या
नंदुरबारच्या पाच
बालशहिदांचं नाव या
शहीदांमध्ये मोठ्या आदरानं
घेतलं जातं.
शिरीषकुमार
मेहता आणि त्याच्या चार
साथीदारांनी इंग्रजांच्या
गोळ्या आपल्या निधड्या
छातीवर घेत स्वातंत्र्य
लढ्याला नवी उमेद दिली.
आज
या बालशहिदांचा ७० वा
स्मृतीदिन महाराष्ट्रात
शहिद दिवस म्हणुन साजरा केला
जातो. शिरीषकुमार ज्या
आंदोलनात शहीद झाले त्या
आंदोलनातील त्यांच्या एका
साथीदाराच्या नजरेत आजही तो
सारा संग्राम जसाच्या तसा
उभा राहतो. बालशहीदांच्या
स्मृतीदिनी 'एबीपी माझा'चा.
भारताच्या
स्वातंत्र्यासाठी आहुती
देणा-यांमध्ये सर्वात लहान
शहीद म्हणून नंदुरबारच्या
बालशहीदांचा उल्लेख होतो.
बालशहीद शिरीषकुमार आणि
त्याच्या चार साथीदारांच्या
या बलिदानाला आज ७० वर्ष
पूर्ण झाली आहेत.
गांधीजींनी
९ ऑगस्ट १९४२ ला कॉग्रेसच्या
मुंबई अधिवेशनात चले जाओचा
नारा दिल्यानंतर केवळ
तरुणांमध्येच नव्हे तर
देशातील बालकांमध्ये देखील
क्रांतीची ज्योत पेटली.
नंदुरबारमधील
या केवळ ११
ते १४ वर्षाच्या बालकांनी
देखील ९ सप्टेंबर १९४२ रोजी
रस्त्यावर उतरुन इंग्रज
सत्तेविरोधात आंदोलनाचा
पवित्रा घेतला. जुलमी इंग्रज
सत्तेनं बालकांचा
हा लढा
चिरडण्यासाठी बेछुट गोळीबार
केला. त्यात अवघ्या १६
वर्षाचा शिरीषकुमार
पुष्पेंद्र मेहता, १२
वर्षाचा धनसुखलाल
गोवर्धनदास शाह, १४ वर्षाचा
लालदास बुलाखीदास, २०
वर्षाचा शशिधर निळकंठ केतकर
आणि केवळ ०८ वर्षाचा घनश्याम
गुलाबचंद शाह हे पाचही बालकं
शहीद झाली.
या सा-या
घटनाक्रमाचे साक्षीदार
असलेले आणि या आंदोलनात
सहभागी असणा-या ७५ वर्षीय
कुंजबिहारी शाह यांना आजही
सारा रणसंग्राम जशाचा तसा
आढवतो.
के.एल. शाह हे
शिरीषकुमार यांचे
वर्गमित्र. आज आंदोलकांपैकी
जिवंत असणारे के.एल.शाह है
नंदुरबारातील एकमेव आहेत.
शहीद झालेल्या पाच
बालकांपैकी केतकर, लालदास
आणि शिरीषकुमार
हे
तिन्ही शाह यांच्या
वर्गातलेच होते. त्यामुळं या
सर्वांच्या आठवणीत
सांगतांना आजही शाह भावविवश
होतात. शिरीषकुमार वर्गातील
हुशार विद्यार्थ्यापैकी एक.
एकदा ठरवलेली गोष्ट
कुठल्याही मार्गानं पुर्ण
करायचा असा त्यांचा हट्टी
स्वभाव. नंदुरबारातील
लोकमान्य विद्यालयात
शिकणारे
हे सर्व
विद्यार्थी गांधीजींच्या
विचारांनी इतके प्रभावित
झाले कि त्यांनी शांततामय
आंदोलनाचा मार्ग स्विकारला.
कुंजबिहारी शाह यांच्याकडे
आजही शिरीषकुमार यांनी
लिहीलेला एकमेव बंसीधर आणि
टकलीधर हा गांधीजींवर
आधारीत लेख शाबूत आहे.
इयत्ता
आठवीत असतांना लिहीलेला हा
लेख शिरीषकुमार मध्ये
असलेला उच्चकोटीचा
स्वातंत्र्यसैनिक स्पष्ट
करणारा ठरतो. अगदी कमी वयातच
देशाच्या स्वातंत्र्यासाठी
प्राणांची आहुती देणा-या या
बालशहीदांच्या वास्तव्य़ानं
नंदनगरी पावन झालीय.
शिरीषकुमाराच्या
बलिदानानं भारतीय
स्वातंत्र्य चळवळीला गती
मिळाली. शिरीषकुमार आणि
त्याच्या चार साथीदारांच्या
बलिदानाची आठवण म्हणून, ज्या
ठिकाणी या बालशहीदांवर
गोळीबार झाला त्या ठिकाणाला
आज स्मारकाचं स्वरुप
प्राप्त झालंय. माणिक
चौकातील हा शहिदस्तंभ आजही
या पाच बालशहिदांच्या
स्मृतींना उजाळा देतोय.
By: | Last Updated: 09 Sep 2012 06:36 AM
नंदुरबार :
भारतीय स्वातंत्र्यासाठी
अनेकांनी आपल्या प्राणाची
आहुती दिलीय. मात्र अगदी
लहानपणीच शहीद झालेल्या
नंदुरबारच्या पाच
बालशहिदांचं नाव या
शहीदांमध्ये मोठ्या आदरानं
घेतलं जातं.
शिरीषकुमार
मेहता आणि त्याच्या चार
साथीदारांनी इंग्रजांच्या
गोळ्या आपल्या निधड्या
छातीवर घेत स्वातंत्र्य
लढ्याला नवी उमेद दिली.
आज
या बालशहिदांचा ७० वा
स्मृतीदिन महाराष्ट्रात
शहिद दिवस म्हणुन साजरा केला
जातो. शिरीषकुमार ज्या
आंदोलनात शहीद झाले त्या
आंदोलनातील त्यांच्या एका
साथीदाराच्या नजरेत आजही तो
सारा संग्राम जसाच्या तसा
उभा राहतो. बालशहीदांच्या
स्मृतीदिनी 'एबीपी माझा'चा.
भारताच्या
स्वातंत्र्यासाठी आहुती
देणा-यांमध्ये सर्वात लहान
शहीद म्हणून नंदुरबारच्या
बालशहीदांचा उल्लेख होतो.
बालशहीद शिरीषकुमार आणि
त्याच्या चार साथीदारांच्या
या बलिदानाला आज ७० वर्ष
पूर्ण झाली आहेत.
गांधीजींनी
९ ऑगस्ट १९४२ ला कॉग्रेसच्या
मुंबई अधिवेशनात चले जाओचा
नारा दिल्यानंतर केवळ
तरुणांमध्येच नव्हे तर
देशातील बालकांमध्ये देखील
क्रांतीची ज्योत पेटली.
नंदुरबारमधील
या केवळ ११
ते १४ वर्षाच्या बालकांनी
देखील ९ सप्टेंबर १९४२ रोजी
रस्त्यावर उतरुन इंग्रज
सत्तेविरोधात आंदोलनाचा
पवित्रा घेतला. जुलमी इंग्रज
सत्तेनं बालकांचा
हा लढा
चिरडण्यासाठी बेछुट गोळीबार
केला. त्यात अवघ्या १६
वर्षाचा शिरीषकुमार
पुष्पेंद्र मेहता, १२
वर्षाचा धनसुखलाल
गोवर्धनदास शाह, १४ वर्षाचा
लालदास बुलाखीदास, २०
वर्षाचा शशिधर निळकंठ केतकर
आणि केवळ ०८ वर्षाचा घनश्याम
गुलाबचंद शाह हे पाचही बालकं
शहीद झाली.
या सा-या
घटनाक्रमाचे साक्षीदार
असलेले आणि या आंदोलनात
सहभागी असणा-या ७५ वर्षीय
कुंजबिहारी शाह यांना आजही
सारा रणसंग्राम जशाचा तसा
आढवतो.
के.एल. शाह हे
शिरीषकुमार यांचे
वर्गमित्र. आज आंदोलकांपैकी
जिवंत असणारे के.एल.शाह है
नंदुरबारातील एकमेव आहेत.
शहीद झालेल्या पाच
बालकांपैकी केतकर, लालदास
आणि शिरीषकुमार
हे
तिन्ही शाह यांच्या
वर्गातलेच होते. त्यामुळं या
सर्वांच्या आठवणीत
सांगतांना आजही शाह भावविवश
होतात. शिरीषकुमार वर्गातील
हुशार विद्यार्थ्यापैकी एक.
एकदा ठरवलेली गोष्ट
कुठल्याही मार्गानं पुर्ण
करायचा असा त्यांचा हट्टी
स्वभाव. नंदुरबारातील
लोकमान्य विद्यालयात
शिकणारे
हे सर्व
विद्यार्थी गांधीजींच्या
विचारांनी इतके प्रभावित
झाले कि त्यांनी शांततामय
आंदोलनाचा मार्ग स्विकारला.
कुंजबिहारी शाह यांच्याकडे
आजही शिरीषकुमार यांनी
लिहीलेला एकमेव बंसीधर आणि
टकलीधर हा गांधीजींवर
आधारीत लेख शाबूत आहे.
इयत्ता
आठवीत असतांना लिहीलेला हा
लेख शिरीषकुमार मध्ये
असलेला उच्चकोटीचा
स्वातंत्र्यसैनिक स्पष्ट
करणारा ठरतो. अगदी कमी वयातच
देशाच्या स्वातंत्र्यासाठी
प्राणांची आहुती देणा-या या
बालशहीदांच्या वास्तव्य़ानं
नंदनगरी पावन झालीय.
शिरीषकुमाराच्या
बलिदानानं भारतीय
स्वातंत्र्य चळवळीला गती
मिळाली. शिरीषकुमार आणि
त्याच्या चार साथीदारांच्या
बलिदानाची आठवण म्हणून, ज्या
ठिकाणी या बालशहीदांवर
गोळीबार झाला त्या ठिकाणाला
आज स्मारकाचं स्वरुप
प्राप्त झालंय. माणिक
चौकातील हा शहिदस्तंभ आजही
या पाच बालशहिदांच्या
स्मृतींना उजाळा देतोय.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा