वैशिष्ट्यीकृत पोस्ट

हुतात्म्यांच्या बलिदानाचा.., चला ठेवू या मान

हसत गुंफले गळ्याभोवती फुलासारखे फास
या मातेच्या प्रेमासाठी,  क्षणात सोडले श्वास

किती साहिले, किती पाहिले, गोरे अत्याचारी
जालियन त्या बागेमध्ये घुसली छातीत गोळी

घर आमचे असून सुद्धा,  गुलाम होतो आम्ही
स्वातंत्र्याच्या होमासाठी भडकत होता अग्नी

व्यापाराचे सोंग घेवून एक एक फिरंगी आला
या मातीचे रंग पाहून आमचाच मालक झाला

पाहून धर्म वेगवेगळे भाषा येथे भिन्नच होत्या
फूट पाडूनी लूटायला वाटाही त्या नीटच होत्या

अहिंसेचा मार्गाने त्या, छातीत घुसल्या गोळ्या
स्वातंत्र्य या युध्दामध्ये रक्तात नाहल्या झोळ्या

प्रणाम माझा आहे त्यांना,  जे तिरंग्याची शान
हुतात्म्यांच्या बलिदानाचा.., चला ठेवू या मान

       ------ राम गायकवाड ------
               23.03.2018

Shared with https://goo.gl/9IgP7

टिप्पण्या