वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लिंगायत धर्म
लिंगायत हा १२व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी स्थापन केलेला एक स्वतंत्र अवैदिक धर्म आहे, लिंगायत हिंदू नाहीत, ते वीरशैव नाहीत. फक्त इष्टलिंग पूजा करतात. वेद मानत नाहीत. त्यांचा पंचसुतक आणि पुनर्जन्म या कल्पनावर विश्वास नाही. त्यांच्यांत जातिभेद नाहीत. (लिंगायतांमधील काही जातींची नावे या लेखाच्या शेवटी दिली आहेत.!!!)
लिंगायत धर्म हा भारतातील तिसरा मोठा धर्म आहे. या धर्माचे अधिकतम लोक कर्नाटक राज्यात आहेत. महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडूत या धर्माचे बरेच लोक आहेत. हा एकेश्वरवादी धर्म आहे. लिंगायत धर्म: समता, बंधुभाव, नैतिक, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक! अनंतकाळचे जीवन शांतीचा मार्ग.! लिंगायत हा एक धर्म असून ती जात नव्हे. जन्मामुळे मानवांना उच्च नीच असा विभाग करते ती जात. जनमल्यापासून सर्व समान आहोत अशी घोषणा करून कोणतीही जात, वर्ग, वर्णभेद न मानता जातीरहित धर्माचा आसक्ती असणात्या सर्वाना दीक्षा संस्कार मिळविता येतो असे सांगणारा तो धर्म. या धार्मिक संस्कारामुळे व्यक्तिने मिळविलेली योग्यता, पात्रता, यामुळे तो श्रेष्ट अगर कनिष्ट मानला जातो असे सांगतो तो धर्म. लिंगायत धर्मात जन्मामुळे कोणीही उच्च, नीच असे न मानता ’विटाळाविण पिंडास न च आश्रय’ असे सांगून असा बोध दिला आहे.
गोत्रनाम पुसता गप्प का बसता?
शिर खाजवित भूमी का गिरवता?
गोत्र मादार चेन्नय्या, गोत्र डोहार कक्कय्या,
ऐसे सांगा ना हो, कूडलसंगय्या
लिंगायत धर्मगुरु गुरु बसव:
एक विशिष्ट असा सिद्धां, साधना आणि धर्मगुरु एकादशसृत्र असलेला एका गुरूला मूळ पुरूष म्हाणून स्वीकारलेला तो सुधारणा धर्म होय. एका गुरूपासून प्रारंभ न होता नैसर्गिकरित्या वाढत असलेला नैसर्गिक धर्म, नैसर्गिक धर्मात प्रत्येक सिंद्धत असतात. त्यात मरीआई म्हाळ्साईच्या पूजैपासून ते ’अहं ब्रम्हास्मि सारख्या सुक्ष्म सिध्दंतापर्यत त्यात वाव आहे. सुधरणा धर्मात याला वाव मिळत नाही-त्यात एक प्रकाराचा सिद्धांत, एक प्रकारचे दर्शन आहे. असा सुधारणात्मक धर्म दिलेला महापुरूष म्हणजेच विश्वगुरू बसवेश्वर होत.
स्थावर लिंगपूजा सोडवून, हाताला कंक्ण बांधून
निर्धाराचे मंगळसूत्र कंटी बांधून वीर हो म्हणून
कृतार्थ केला कूडल चन्नसंगमदेवा तुमचा शरण
संगम बसवण्णांच्या श्री चरणास नमो नमो म्हणत असे (च.ब.व.६५२)
महात्मा बसवेश्वरांनी परांपरागत आलेले कित्येक आचरण सोडवून, एक नव्या प्रकारचा भक्ती मार्ग आरंभिला, हा कारणे त्यांना "प्रथमाचार्य तूंच लिंगाचार्य तूंच" असे चन्नबसवण्णांनी गाईले आहे. (च.ब.व. २८)
"प्राणलिंगाचा, भ्गवेवस्त्र घालण्यचा, प्र्सादाचा पूर्वाश्रय काढून टाकण्या करताच ’महागुरू' होऊन बसवेश्वरांनी अवतार घेताला. (च.ब.व. २७)
म्हाणून विश्वधर्माचे लक्षण असलेल्या लिंगायत धर्माची घटना (Constitution) जगदगुरु बसवेशांनी निर्माण केली. बसवदेव हाच लिंगायत धर्माचा आदिगुरू म्हणून द्दढ श्रद्धा ठेवलेलेच लिंगायत होय.
लिंगायत धर्मगुरु गुरु बसवसंपादन करा
विश्वगुरू बसवेश्वरांनी लिंगायत धर्माचे मुख्य सत्य जे इष्टलिंग चिन्ह त्याला मूर्त स्वरूप दिले.
विश्वगुरू बसवण्णांनी वचन साहित्याचे धार्मीक संविधान दिले.
बिश्वगुरू बसवेशांनी सांप्रदायिक योग साधनेपासून वेगळा असलेला द्दष्टीयोगाचे प्रामुख्य असलेला लिंगांगयोग (शिवयोग) दिला.
’श्री गुरू बसव लिंगाय नम:' हा मंत्र बसवण्णाच्या नावापासून तयार झाला म्हणून ते लिंगायत धर्माचे आदिगुरू म्हणण्यास ज्वलंत साक्ष आहे.
बसवेश्वर आदिगुरू कसे?:
लिंगायत धर्म पंचाचार, षट्स्थल, अष्टावरण मानतात. हा बसवादि-शरणप्रणीIत धर्म आहे.
न जाणणात्या मानवाला जाणता शरण बनण्यास हवा असलेला दीक्षा संस्कार व पूजा स्वातंत्र्य सर्वाना समानतेने देतो म्हणून तो धर्म आहे.
धर्मगुरु: विश्वगुरु बसवण्ण (११३४-११९६)
धर्म संहिता (धर्मग्रंथ): वचन साहित्य
धर्म भाषा: कन्नड
धर्माचे देव नाव: लिंगदेव
धर्म चिन्ह: जगव्यापी, जगन्नियंताचा प्रतीक ’इष्टलिंग’
धर्म संस्कार: लिंगधारण/ इष्टलिंग दीक्षे
धर्म सिद्धांत: शून्य सिद्धांत
साधना: त्राटक योग (लिंगांगयोग)
दर्शन: षटस्थल दर्शन
समाजशास्त्र: शिवाचार-(सामाजिक समानना)
नीति शास्त्र: गणाचार (धर्म सरंक्षककर्ता) / भृत्याचार (स्वयंसेवक, करसेवक)
अर्थ शास्त्र: सदाचार (कायक- दासोह-प्रसाद)
संस्कृति: अवैदिक शरण संस्कृति
परंपरा: धर्मपित बसवेश्वरानिच आदि पुरुष हेऊन तेव्हापासून आतापर्यत अव्याहत सतत वाहत असलेली शरण परंपरा (Heritage).
धर्म क्षेत्र: गुरु बसवण्णांचे ऐक्यक्षेत्र कूडलसंगम, शरणभूमि बसवकल्याण
धर्म ध्वज: षट्कोन - इष्टलिंग सहित केशर रंगवणे बसव ध्वज
धर्माचे ध्येय: जाति, वर्ण, वर्ग रहित धर्मासोबत शरण समाज निर्माण (कल्याण राज्य निर्माण)
इष्टलिंग:
लिंगायत धर्माचे लोक गळ्यात इष्टलिंग धारण करतात. इष्टलिंग हे ज्ञानाचे, भक्तीचे आणि ब्रह्मांडाचे प्रतीक आहे.
अष्टावरण:
गुरु : लिंगायताना ज्ञान हेच गुरू आहे, अरिवे गुरू. लिंगायत धर्मातील गुरु व्यक्तिवाचक शब्द नाही.
लिंग : लिंगायत धर्मात विश्वाकार, ब्रह्मांडाचे चिन्ह असणारे इष्टलिंग हेच लिंग आहे. लिंग शब्दाचा अर्थ स्थावर लिंग नाही. इष्टलिंगासाठी लिंग हा छोटा शब्द वचनांत आणि अभंगांत वापरला आहे.
जंगम : जंगम म्हणजे लिंगायत धर्मप्रसारक, प्रचारक. जंगमत्व जातीने मिळत नाही. ते कर्मावर आधारित आहे.
पादोदक : ज्ञानाचे अर्जन करणे म्हणजे पादोदक होय. इष्टलिंगावर गुरु लिंग जंगम नावांनी घेतलेली तीन तीर्थे म्हणजे पादोदक.
प्रसाद : समर्पण, समर्पण भावाने जे प्राप्त होते ते स्वीकारणे. त्याप्रमाणे जीवन जगणे.
विभूती : शुद्ध गोमयापासून बनविलेली विभूती. विभूती आणि भस्म हे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत.
रुद्राक्ष : नैसर्गिकरीत्या वृक्षांवर उत्पन्न होणारे, आवळ्याच्या आकाराएवढे रद्राक्ष, कोणीही धारण करु शकतो, त्यासठी कोणतेही बंधन वा सुतक नाही.
मंत्र : श्री गुरु बसव लिंगाय नमः, ओम नमः शिवाय किंवा ओम लिंगदेवाय नमः हे लिंगाचे आणि धर्मगुरू बसवण्णांचे स्मरण करणारे मंत्र आहेत. कायकाकवे कैलास हा आर्थिक सिद्धान्त रूढ करणारा मंत्र बसवण्णांनी विश्वाला दिला.
षट्स्थल:
१ भक्तस्थल : श्रद्धाभक्तीस्थल. भक्ती आणि लिंग या दोन्हीचा संगम होऊन लिंगाचे स्वरूप भक्ताला प्राप्त होते.
२ महेश्वरस्थल : निष्ठाभक्तीस्थल. हे हृदय पावित्र्याचे प्रतीक आहे. इष्टलिंग, वचनसाहित्य यावर निष्ठा ठेवणे.
३ प्रसादीस्थल : एकाग्रतास्थल. समर्पणाची भावना दृढ होणे. साधकाने संपूर्ण समर्पण आणि निस्वार्थी बुद्धीने केलेली सेवा.
४ प्राणलिंगीस्थल : व्यक्ती स्वतःचा शोध घेते. स्वतः लिंगमय आहोत, अशी जाणीव होते. बाह्यगोष्टीवरून मन काढून अंतर्गत गोष्टीवर केंद्रित करणे.
५. शरणस्थल : आनंदीस्थल. या स्थळात शरण सर्व भेद विसरून जातो. आपल्या सर्व विकारांवर आणि षड्रिपूंवर विजय मिळवणे.
६ ऐक्यस्थल : समदर्शन समरसता म्हणजे ऐक्य. जिवंतपणी शरण गुरु, लिंग, जंगम यांच्याशी ऐक्य झालेले असतो त्यामुळे मी- माझे, तू- तुझे, असे भेद असत नाहीत.
पंचाचार:
१) लिंगाचार : अंगावरील लिंग हे नीतीचे आणि शिलाचे प्रतीक आहे, ते अंगावर धारण करणे.
२) सदाचार : शुद्धता, सरलता, नैतिकतेने आचरण करणे. चोरी, आत्मस्तुती, परनिंदा, राग , घृणा हे सर्व न करणे, खोटे न बोलणे, परस्त्री, परधन यांची अभिलाषा न ठेवणे म्हणजे सदाचार.
३) शिवाचार : सर्वांशी समतेने आणि समानतेने वागणे, सकल जीवांचे कल्याण चिंतणे.
४) गणाचार : स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी लढा देणे, समाजातील दृष्ट आणि अन्यायकारक प्रवृत्तींविरुद्ध उभे राहणे. अधर्मीच्या विरुद्ध संघटित होऊन लढा देणे.
५) भृत्याचार : विश्वबंधुत्वाची शिकवण, दया, क्षमा, करुणा अंगी बाणविणे म्हणजे भृत्याचार.
धर्मग्रंथ :
वचन साहित्य
शाकाहार:
सर्व लिंगायतांना शाकाहारी असणे आवश्यक आहे. मद्य, मांस, भिक्षेत मिळालेले अन्न निषिद्ध आहे.
स्मृती, इतिहास, वगैरे:
बसवकल्याण, उळवी, कर्दळीबन(श्रीशैल) येथे असणारे शरणांच्या गुहा(गवी) आज सुस्थितीत आहेत. कल्याणचा अनुभव मंटप तसेच शिरोबावी आजही पहायला मिळतो. कल्याणच्या बिज्जल राजाचा किल्ला आजही पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. बसवादी शरणांच्या जन्मस्थळे, समाधीस्थळ आणि स्मृतिस्थळांचे पुनःर्जीवन जीर्णोद्धार झाले आहे. महामने बसवकल्याण येथे १०८ फूट उंचीची वरदहस्ती बसवप्रतिमा उभी करण्यात आली आहे.
लिंगायत धर्माचे वैशिष्ट्य:
१. लिंगायत हा कायकावर उदरनिर्वाह करणारा कायकनिष्ठ धर्म आहे. २. लिंगायत हे श्रमालाच ईश्वर मानतात, घाम येऊ पर्यत कष्ट करत राहणे हीच ईश्वराची पूजा आहे , असे लिंगायत मानतात. ३. स्वेदस्नान हेच लिंगायतांचे तिर्थस्नान आहे. त्यांना तीर्थयात्रा, तीर्थाटन, तिर्थस्नान करण्यासाठी भटकण्याची गरज नाही. ४. लिंगायत घर, संसार, पत्नी,गाव, नातेवाईक सोडून दूर जंगलात जाऊन राहण्याचा, वैराग्य स्वीकारण्याचा, संन्यास ग्रहण करण्याचा निषेध करतात. लिंगायत एकांतवादी नाही, लोकांतवादी आहेत. ५. सतीपतीने एकत्र राहून एकमेकांच्या शारीरिक लैंगिक गरजा भागवून, दोघांनी एकत्र राहून कायक करायला शिकविणारा लिंगायत धर्म आहे.
लिंगायत संस्कार:
इष्टलिंग दीक्षा संस्कार
शरण आणि संत:
लिंगायत धर्म: महात्मा बसवेश्वर धर्म प्रसारक (बसवण्णा.)
अक्कमहादेवी
शिवयोगी सिद्धरामेश्वर.
अंबिगर चौडय्या
बुरुड केतय्या
मादार चेन्नय्या.
धनगर वीर गोल्लाळ
नुल्लीय चंदय्या
अल्लमप्रभु
उरलिंगदेव आणि उरिलिंग पेद्दी
डोहर कक्कय्या
किन्नरी बोमय्या
चिन्मयज्ञानी चन्नबसवण्णा
जेडर दासिमय्या
मडीवाळ माचीदेव.
शिवयोगी मन्मथ शिवलिंग स्वामी
संतकवी लक्ष्मण महाराज
लिंगायत क्षेत्र :
कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार(बीड महाराष्ट्र), बसव कल्याण (कर्नाटक), सोलापूर (महाराष्ट्र), उळवी (उत्तर कर्नाटक), एम.के., हुबळी( विजापूर कर्नाटक.), कारिमनी (बेळगाव), कक्केरी (बेळगाव), गुड्डापूर जत (सांगली महाराष्ट्र), आळते डोगर (हातकणंगले, कोल्हापूर), गदग (कर्नाटक), बसवन बागेवाडी -इंगळेश्वर (कर्नाटक)
लिंगायत स्वतंत्र धर्म असल्याचे निकष आणि लिंगायत धर्माला अल्पसंख्याक धर्ममान्यता मिळाल्यावर होणारे फायदे:
लिंगायत एक स्वतंत्र आणि अवैदिक धर्म आहे.
१) लिंगायत हा परिपूर्ण स्वतंत्र धर्म आहे. २) लिंगायत हा द्रविडीयन वंश आहे. ३) लिंगायत जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन या प्रमाणे स्वतंत्र धर्म आहे. ४) लिंगायत ही एक वैशिष्टयपूर्ण इष्टलिंग संस्कृती आणि समाज व्यवस्था आहे. ५) लिंगायत ही इष्टलिंगधारी शरीरालाच मंदिर बनविणारी एक धर्म प्रकिया आहे. ६) लिंगायत हे लिंगांगसमरस्याचे षडस्थल तत्वविज्ञान आहे. ७) लिंगायत हा जीव शिव यांच्यामध्ये एकात्मता साधणारा शिवसंस्कार व शिवयोग आहे. ८) लिंगायत हे अष्टवरणाला भक्तिमार्ग पंचाचराला कर्ममार्ग आणि षडस्थलाला ज्ञानमार्ग मानणारे आचारशास्त्र आहे. ९) लिंगायत हे आचारशास्त्र हिंदुपेक्षा स्वतंत्र, पूर्णतः वेगळे , भिन्न आहे. १०) लिंगायत हा महाशरणांच्या आणि महाशरणीच्या वचनांद्वारे विश्वचैतन्याच्या निर्धाराचा एक बसवयोग आहे. ११) लिंगायत हे कायकाकवे कैलास या स्वयंपूर्णतेचा संदेश देणारे एक अर्थशास्त्र आहे. १२) लिंगायत हे सदाचाराला स्वर्ग मानणारे एक नीतिशास्त्र आहे. १३) लिंगायत ही दासोह स्वरूपातील एक सामाजिक सहकारनीती आहे. १४) लिंगायत ही दयेलाच धर्म मानणारी एक मानवतावादी शिकवण आहे. १५) लिंगायत हे स्वतंत्र , समता, बंधुता, सामाजिक न्याय व गौरव जोपासणारे एक न्यायशास्त्र आहे. १६) लिंगायत हे स्त्री गौरवाचे व स्रीजगताच्या उद्धाराचे एक वैशिष्टयपूर्ण सूत्र आहे. १७) लिंगायत वेदाला नव्हे तर, अनुभवाला प्रमाण मानणारा एक सिद्धांत आहे. १८) लिंगायत एक विवेकवादी व वास्तववादी जीवनविषयक दृष्टिकोन आहे. २०) लिंगायत हा संपूर्ण शाकाहारी सात्विक आणि समृद्ध जीवनपद्धती आहे. २१) लिंगायत हा अवघ्या इष्टलिंगालाच आपले सर्वस्व मानणारा धर्म आहे. २२) लिंगायत हा बसवेश्वरप्रणित इष्टलिंगधारणा स्वरूपातील एकेश्वरवादी शिवपासक धर्म आहे. २३) लिंगायत निवृत्तीवादी नाही तर आशावादी आणि प्रवृत्तीवादी धर्म आहे. २४) लिंगायत हस्तरेषेला महत्व न देता मनगटाच्या शक्तीला महत्व देणारा धर्म आहे. २५) लिंगायत हा मरणवे महानवमी म्हणजे मृत्यूला मोठा सण मानणारा धर्म आहे. २६) लिंगायत हा एकूणच सुतकप्रथा मान्य नसणारा विज्ञानवादी धर्म आहे.
श. सुर्यकांत घुगरे यांचे पेठवडगाव येथील दहाव्या शरण संस्कृती अध्ययन शिबिराचे अध्यक्षीय समालोचन ( २८- २९ मे २०१७. पेठवडगाव कोल्हापूर) ✍: अभिषेक देशमाने.
अल्पसंख्याक धर्ममान्यतेचे फायदे:*
लिंगायत धर्म अल्पसंख्याक दर्जा मिळेल. लिंगायत धर्म अल्पसंख्याक शाळा काढण्याचा अधिकार मिळेल. तंत्र व व्यवसाय शिक्षणसाठी कमी व्याजदरात शासनाकडून कर्ज मिळेल. कलम २९ व ३० नुसार धर्म, लिपी, भाषा, संस्कृती याचे जतन केले जाईल. धार्मिक स्थळे, बसवकल्याण, कुडलसंगम, आळते, बसवन बागेवाडी या स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारचा निधी मिळेल. लिंगायत संस्कृती आणि शरणांच्या स्थळांचे रक्षण केले जाईल. लिंगायत विद्यार्थी विध्यार्थीनिंना स्वतंत्र वसतिगृह मिळतील. संस्थांना धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी दिलेले दान करमुक्त असेल. धर्मपालन आणि धर्मप्रसाराचा मूलभूत हक्क प्राप्त होईल. स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क,( शाळा, महाविद्यालय, व्यवसायशिक्षण, प्रशिक्षण, कृषी, औद्योगिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालय यांना अनुदान मिळून आशा महाविद्यालयात लिंगायत धर्मासाठी ५० % जागा राखीव राहील. बेरोजगार तरुणांना विशेष अर्थसहाय्य मिळेल. ५ वी ते ७ वि वर्गात विद्यार्थीना उपस्थित राहिल्याबद्दल २ रु प्रोत्साहन भत्ता मिळेल. अल्पसंख्याक समूहातील विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत आणि दहावीनंतर उच्चशिक्षण पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती मिळेल. आयटीआय शिक्षणसंस्थेत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना जागा राखीव ठेवण्यात येतात. अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे स्वतंत्र योजना राबविल्या जातील. प्रधानमंत्री २० कलमी योजनांद्वारे अल्पसंख्याक असलेल्यांना भरपूर सुविधा मिळतील. महाराष्ट्र शासनाची अल्पसंख्याक संचालनालयाची निर्मिती व याद्वारे अल्पसंख्याक समाजाचा विकास. लेखक: प्रा आनंद कर्णे, नांदेड.(बसवदर्शिकेतून ) संकलन : अभिषेक देशमाने.9822054291.
लिंगायतांतील पोटजाती:
लिंगायत कानोडी
लिंगायत कुंभार
लिंगायत कुल्लेकडगी
लिंगायत कोष्टी
लिंगायत गवळी
लिंगायत गुरव
लिंगायत चतुर्थ
लिंगायत जंगम
लिंगायत डोहर कक्कय्या
लिंगायत तांबोळी
लिंगायत तिराळी
लिंगायत दीक्षावंत
लिंगायत देवांग
लिंगायत धोबी
लिंगायत तेली
लिंगायत न्हावी
लिंगायत पंचम
लिंगायत परीट
लिंगायत फुलारी
लिंगायत रेड्डी
लिंगायत लिंगडेर
लिंगायत लिंगधर
लिंगायत वाणी
लिंगायत शीलवंत
लिंगायत साळी
लिंगायत सुतार
लिंगायत माळी
लिंगायत धर्माची माहिती देणारी संकेतस्थळ:
कृपया या संकेतस्थळांंना भेट द्या.
https://vachansanjivani1.wordpress.com
https://vachansanjivani.simdif.com
http://www.lingayatyuva.com
http://www.lingayatreligion.com
लिंगायत धर्मावरील पुस्तके:
कबीर और बसवेश्वर तुलनात्मक अध्ययन (हिंदी, लेखक - डॉ. शंकरराव कप्पीकेरी)
बसवबोध (बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान, मूळ कानडी, मराठी अनुवाद डॉ. इरेश सदाशिव स्वामी)
बसवेश्वर (इंग्रजी, लेखक - अनंत पै)
महात्मा बसवेश्वर आणि शिवशरण - सुभाष वैरागकर
महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्व (मराठी, लेखक - सुभाष देशपांडे)
बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति (हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे)
महात्मा बसवेश्वर : काळ, व्यक्ती, वचनसाहित्य आणि शरणकार्य (डॉ. अशोक प्रभाकर कामत)
समतेचा महामेरू (डॉ. सचितानंद बिचेवार).

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा