वैशिष्ट्यीकृत पोस्ट

नवीन वर्षा तुझ्या स्वागता

कुठले पुस्तक कुठला लेखक
लिपी कोणती कुठले भाकित
हात एक अदृश्य उलटतो
पानांमागून पाने अविरत

गतसालाचे स्मरण जागता
दाटुन येते मनामध्ये भय
पान हे नवे यात तरी का
असेल काही प्रसन्न आशय

अखंड गर्जे समोर सागर
कणाकणाने खचते वाळू
तरी लाट ही नवीन उठता
सजे किनारा तिज कुरवाळू

स्वतः स्वतःला देत दिलासा
पुसते डोळे हसता हसता
उभी इथे मी पसरून बाहू
नवीन वर्षा तुझ्या स्वागता

                             शांता शेळके
(सकाळ, दिनांक १ जानेवारी १९९७)

नवीन कँलेंडर वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा!

टिप्पण्या