वैशिष्ट्यीकृत पोस्ट

माहेर

🌺🌺माहेर🌺🌺

बाई माहेर माहेर
आहे सुखाचा आहेर
दुःखाची झळ नाही
आहे आनंदी बहार

आई बापाची माया
आहे दुधावरील साय
माया खरी अपरंपार
करीन दुजा हा काय

माहेर मायेची सावली
दाट धरी ही माऊली
उन्हाची झळ नाही
सुख पावलो पावली

साजरा बाई बंधुराया
करी बहिणीची माया
त्याच्या मायेची सर
दुजा कुणाही येईना

बहिण सखीच वाटते
सुख दुःखात धावते
गाई मोकळ्या मनाने
मार्ग सुखाचा दावते

साजरी वहिनी बाई
मागे पुढे माझ्या करी
भरवी घास आनंदाने
वाटे आयुष्याची दोरी

ऐसा माहेरचा महिमा
गावा तेवढा हा कमीच
मन भरेना आपले बाई
गोडवे गावे हे कितीक

पांचाळ आर. सी.

टिप्पण्या