वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माय.....
तीन दगडांच्या चुलीत ती
स्वतःला जाळत असे
काठवटीतल्या पिठात ती
स्वतःलाच मळत असे
विझून राख झाली तरी
आतून थोडी गरम असे
म्हणून तर माझी भाकर
पापुड्याखाली नरम असे
झोपडीचा आधार होऊन
रात्रंदिवस खपत असे
उतरंडीतल्या गाडग्यांना
ती जीवापाड जपत असे
माझ्या कपड्यांच्या ठिगळात
ती स्वतःला टाचत असे
मला डोळे भरुन पाहताना
कायनू काय वाचत असे
अंधारात तोंड लपवून
एकटीच ती कण्हत असे
माझ्या मुळांना पाणी घालून
मातीला माय म्हणत असे
कळीकाळाच्या डावांना ती
सदानकदा फसत असे
लंगड्या देवाला टिळा लावून
गालात कसनुशी हसत असे
छपराची पवळ लिंपून ती
पांढरं पोतेरं फिरवत असे
परवर जरा उखणला की
जीव तोडून सारवत असे
आयुष्याची परवड ती
माझ्यापासून लपवत असे
अंधार पडण्याआधीच मला
का बरं झोपवत असे....?
डॉ.शिवाजी काळे.
तीन दगडांच्या चुलीत ती
स्वतःला जाळत असे
काठवटीतल्या पिठात ती
स्वतःलाच मळत असे
विझून राख झाली तरी
आतून थोडी गरम असे
म्हणून तर माझी भाकर
पापुड्याखाली नरम असे
झोपडीचा आधार होऊन
रात्रंदिवस खपत असे
उतरंडीतल्या गाडग्यांना
ती जीवापाड जपत असे
माझ्या कपड्यांच्या ठिगळात
ती स्वतःला टाचत असे
मला डोळे भरुन पाहताना
कायनू काय वाचत असे
अंधारात तोंड लपवून
एकटीच ती कण्हत असे
माझ्या मुळांना पाणी घालून
मातीला माय म्हणत असे
कळीकाळाच्या डावांना ती
सदानकदा फसत असे
लंगड्या देवाला टिळा लावून
गालात कसनुशी हसत असे
छपराची पवळ लिंपून ती
पांढरं पोतेरं फिरवत असे
परवर जरा उखणला की
जीव तोडून सारवत असे
आयुष्याची परवड ती
माझ्यापासून लपवत असे
अंधार पडण्याआधीच मला
का बरं झोपवत असे....?
डॉ.शिवाजी काळे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा