वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रभाकर ऊर्ध्वरेषे
साहित्यिक दस्तावेज
(१९१८- १९८९)मार्क्सवादी विचारवंत आणि पत्रकार
प्रभाकर ऊर्ध्वरेषे
मार्क्सवादी विचारवंत, पत्रकार, संपादक, समीक्षक, रशियन व चीनी साहित्याचे अनुवादक अशी प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांची ओळख आहे.
ऊर्ध्वरेषे यांचा जन्म ९ जानेवारी १९१८ साली इंदूर येथे झाला. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. इंदूर येथेच त्यांचे प्राथमिक, माध्यमिक ते म्याट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे इंदूरच्याच होळकर महाविद्यालयात वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी इंटरसायन्सला प्रवेश घेतला पण सायन्सच्या विषयांत विशेषत: गणितात त्यांना रस वाटेना. मग त्यांनी वडिलांच्या इच्छेच्या विरोधात जात कला शाखेला प्रवेश घेतला. १९३९ साली त्यांनी बी. ए. तर १९४२ साली एम. ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनातच त्यांच्यावर साम्यवादी विचारांचा प्रभाव पडला. दरम्यानच्या काळात वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांची घरची परिस्थिती हलाखीची बनल्याने नोकरीच्या शोधात ते ब्रम्हदेशात रंगून येथे जाऊन पोहोचले. तिथे एका जाहिरात कंपनीत ते कॉपीरायटर म्हणून काम करू लागले. त्याच काळात रंगूनवर बॉम्बहल्ला झाला. आणि तिथे प्रचंड घबराट पसरली. रस्ते बंद झाले. अनेकांनी रंगूनमधून स्थलांतर केले. मग ऊर्ध्वरेषेही पुन्हा शेकडो मैलांचा पायी प्रवास करत भारतात परतले. आणि त्यांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले.
ऊर्ध्वरेषे यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. विध्यार्थी दशेतच 'किर्लोस्कर', 'प्रतिभा' इत्यादी पुरोगामी विचारांची नियतकालिके त्यांच्या वाचनात आली. त्यांचा मोठाच प्रभाव पडून ते धर्म आणि क्रांती या विषयाचे चिंतन करू लागले. त्यातूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. १९४२ साली 'किर्लोस्कर'च्या ऑगस्टच्या अंकात त्यांचा 'आम्ही हिंदू आहोत का?' हा पहिला लेख प्रसिद्ध झाला. त्या काळात दुसरे महायुद्ध सुरु होते. त्याचे पडसाद भारतातही उमटत होते. ऊर्ध्वरेषे यांनी त्या काळात युद्धाच्या पार्श्वभूमीवरील कथा तसेच पुरोगामी विचारंचा पुरस्कार करणारे लेख 'सत्यकथा, 'किर्लोस्कर', 'मनोहर' आदि नियतकालिकांतून लिहिले. त्यादरम्यानच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वेध घेणारे, चर्चा करणारे 'चौफेर' हे सदर त्यांनी 'मनोहर'मधून लिहिले. १९४० ते १९५० हे सगळं दशकच कम्युनिस्ट पार्टी आणि देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या दृष्टीने महत्वाचे आणि खळबळजनक घटनांनी भरलेले होते. कम्युनिस्ट विचारांनी भारावून जाऊन ते इंदूरहून मुंबईत आले आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कामात त्यांनी स्वत:ला झोखून दिले. १९४४ ते १९५१ या काळात कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केले. पक्षाच्या 'लोकयुग', 'मशाल', 'नवे जग' या पत्रांच्या/मासिकांच्या संपादनाची धुराही त्यंनी सांभाळली. या काळात त्यांच्या पत्नी उषाताई याही कम्युनिस्ट पक्षाच्या कामात सामील झाल्या होत्या. कम्युनिस्ट पक्षात १० वर्षे काम केल्यानंतर त्यांचा काहीसा भ्रमनिरास झाला. पार्टीतील अंतर्गत गटबाजी-संघर्ष यांचे त्यांना जवळून दर्शन झाले. आणि अतिशय उद्विग्न अवस्थेतच त्यांनी पार्टीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पक्षाला आणि मुंबईलाही रामराम ठोकत १९५१ साली त्यांनी विदर्भात जाऊन शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. वाशीम, खामगाव आणि पुसद येथील महाविद्यालयांत त्यांनी इंग्रजीचे निष्णात प्राध्यापक तसेच प्राचार्य म्हणून दीर्घकाळ काम पहिले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. प्राध्यापक म्हणून काम करत असतानाच १९६८ ते १९७१ या काळात ते विदर्भ साहित्य संघाच्या कामातही सहभागी झाले होते. संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून तसेच विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या 'युगवाणी' या नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुढे ते नागपूर विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि निवृत्तीपर्यंत ते तिथेच अध्यापन करत होते. या काळात त्यांनी लिहिलेला 'हिब्रू भाषेचे पुनरुज्जीवन' हा लेख विशेष गाजला होता.
या काळात त्यांनी पुष्कळ स्फुटलेखन केले पण त्यातील बरेचसे असंग्रहित आहे. फक्त 'किर्लोस्कर'मधील स्फुट-लेखांचा संग्रह 'दिशा' (१९६१) या नावाने प्रसिद्ध झाला आहे. काही चीनी आणि रशियन पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. माओ त्से तुंग या लेखकाच्या पुस्तकाचा अनुवाद त्यांनी 'वाड्मय आणि कलेचे प्रश्न' (१९५१) या नावाने, स्टालिनच्या पुस्तकाचा अनुवाद 'लेनिनवादाचे प्रश्न' (१९४७) या नावाने, अलेक्झान्द्र पुश्किन या लेखकाच्या पुस्तकाचा 'दुब्रोवस्की' (१९५७) या नावाने, म्याक्झीन गार्कीची 'मदर' या जगप्रसिद्ध साहित्यकृतीचा अनुवाद 'आई' (१९५८) या नावाने तर इवान तुर्गेनिव या लेखकाच्या पुस्तकाचा अनुवाद 'मुमु' या नावाने त्यांनी केला आहे. याशिवाय, रशियन लोककथा : भाग १ ते ५ (१९५५-५९), युक्रेनियन लोककथा (१९५८) हे अनुवादही त्यांच्या नावावर जमा आहेत. ऐन उमेदीच्या काळात 'कम्युनिस्ट पार्टी'त १० वर्षे काम केल्यानंतर आलेल्या अनुभवांचे मार्मिक विश्लेषण करणारे 'हरवलेले दिवस' (मौज प्रकाशन) हे त्यांचे आत्मकथनही प्रसिद्ध आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे 'हे रुदार्थाने म्हणतात तसे माझे आत्मचरित्र नाही.' 'एका माजी कम्युनिस्टाचे आत्मनिवेदन' या उपशीर्षकाद्वारे त्यांनी त्याची मर्यादा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कहाणी अनुभूतीशी इमान राखत वैचारिक पातळीवर विदारक सत्याला हात घालून धिटाईने पाठपुरावा करणारी आणि म्हणूनच नि:संशय मोलाची ठरते. ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे. या आत्मनिवेदनाला साहित्य अकादमी सन्मान मिळाला.
१९७८ साली नागपूर विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. काही काळ त्यांनी किर्लोस्कर मंडळींच्या समवेत काम केले. १० जुलै १९८९ रोजी पुण्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधानंतर गोविंदराव तळवलकर यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये 'हरवलेल्या दिवसांची कहाणी' हा अग्रलेख लिहून त्यांच्या आत्मनिवेदनाचे महत्वच अधोरेखित केले होते.
प्रभाकर उर्ध्वरेषे
(९ जानेवारी १९१८- १० जुलै १९८९)
लेखन - महेंद्र मुंजाळ

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा