वैशिष्ट्यीकृत पोस्ट

अनिल मोहिले

अनिल मोहिले

अनिल मोहिले (जन्म: - मृत्यू:१ फेब्रुवारी २०१२) हे ज्येष्ठ संगीतकार होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी संगीत दिले आहे आणि हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी संगीत संयोजन केले आहे
अनिल मोहिले
मृत्यू १ फेब्रुवारी इ.स. २०१२
राष्ट्रीयत्व मराठा, भारतीय
कार्यक्षेत्र संगीतकार, संगीतसंयोजक
संगीत प्रकार संगीतकार, संगीतसंयोजन
कार्यकाळ इ.स. १९६० - इ.स. २०१२

बालपणसंपादन करा

लहानपणापासून संगीताची आवड असलेल्या अनिल मोहिलेंना त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि तरंगवाद्याचं बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी मिळाली. रूपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच इ.स. १९६० च्या दशकात त्यांनी आकाशवाणीवर काम केलं. संगीतसंयोजनाची सुरुवात त्यांनी आकाशवाणीवर केली . तेथेच त्यांच्या आयुष्यातील नवे लक्ष्य मिळाले आणि ते शास्त्रीय संगीतापासून भावसंगीताकडे वळले. संगीत संयोजनासाठी शिवकुमार पुंजाणी यांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन घेतले. नोटेशन वाचून वाजवणं हा प्रकार ते त्यांच्याकडे शिकले. आकाशवाणीवर श्रीनिवास खळे यांची ओळख झाली. नोटेशन लिहिणं, चालीमधल्या जागा गीताच्या चालीला अनुरूप अशा धूनांनी भरणं यासाठी लागणारं ज्ञान त्यांना श्रीनिवास खळे यांच्याकडून मिळाले. ते स्वतः बुलबुल तरंग आणि मेंडोलिन वाजवायचे. स्वतःची नोकरी सांभाळून त्यांनी ही आवड जोपासली होती. वयाच्या सातव्या वर्षी आकाशवाणी मुंबई केंद्रावर त्यांचा ‘गंमत जंमत’ या मुलांच्या कार्यक्रमात एकल तबलावादनाचा कार्यक्रम सादर झाला होता.
कारकीर्दसंपादन करा

त्यांच्यावर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर-जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर सॅबेस्टियन, कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदनमोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता. ८६ हिंदी चित्रपटांचे त्यांनी संयोजन केले आहे. जवळपास ७० हून अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केले. मंगेशकर कुटुंबियांच्या कार्यक्रमात ते संगीत संयोजक म्हणून ते कायम मार्गदर्शन करायचे.

संगीतकार म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे तसेच अरुण पौडवाल यांच्या साथीने अनेक चित्रपटांना संगीत दिले. मराठी चित्रपट सृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.

मंगेशकर कुटुंबीयांचा उजवा हात अशी त्यांची प्रसिद्धी होती. संगीताच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रमही सन २००३ पासून मोहिले यांनी राबविला. तीन पिढ्यांच्या संगीतकारांना जोडणारा दुवा म्हणून अनिल मोहिलेंकडे पाहिले जात होते. मुंबई विद्यापीठात संगीत संयोजनाचा अभ्यासक्रमही त्यांनी सुरु केला होता. त्यातून अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले.
संगीत संयोजन केलेले हिंदी चित्रपटसंपादन करा

    कयामत से कयामत तक
    लेकीन
    शराबी
    डॉन
    थोडीसी बेवफाई
    अभि‍मान
    शर्मिली

संगीत संयोजन केलेले हिंदी चित्रपटसंपादन करा

    झपाटलेला
    दे दणादण
    धडाकेबाज
    थरथराट
    शुभमंगल सावधान या चित्रपटांचे संगीत संयोजन त्यांनी केले होते .
    अशी ही बनवाबनवी
    जिवलगा
    झपाटलेला

संगीत संयोजन केलेली काही सुप्रसिद्ध हिंदी गीतेसंपादन करा

    दिल चीज क्या है
    यारा सिलीसिली
    तेरे मेरे मिलन की ये रैना
    दिल हुमहुम करे

संगीत संयोजन केलेली काही सुप्रसिद्ध मराठी गीतेसंपादन करा

    केव्हा तरी पहाटे
    मेंदीच्या पानावर
    मालवून टाक दीप
    शुक्रतारा
    श्रावणात घन नीळा
    ये रे घना
    मी डोलकर
    असा बेभान हा वारा
    स्वप्नातल्या कळ्यांनो
    परीकथेतील राजकुमारा
    ससा तो ससा

पुरस्कारसंपादन करा

    राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते व्हायोलिनवादनाचा राष्ट्रीय पुरस्कार
    सूरमणी पुरस्कार
    मा. दीनानाथ पुरस्कार
    राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार
    स्वरयोगी किताब

अनिल मोहिले यांचे १ फेब्रुवारी २०१२ ला पहाटे तीनच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले . ते ७१ वर्षांचे होते.

टिप्पण्या