वैशिष्ट्यीकृत पोस्ट

जयंत साळगांवकर

जयंत साळगांवकर

जयंत शिवराम साळगांवकर (१ फेब्रुवारी, इ.स. १९२९; मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र - २० ऑगस्ट, इ.स. २०१३) हे मराठी ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार व उद्योजक होते. हे कालनिर्णय'' या सुमारे नऊ भाषांतून निघणार्‍या आणि केवळ मराठी भाषेतच ४८ लाख प्रतींचा खप असलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) संस्थापक-संपादक होते. ही दिनदर्शिका आणि पंचांग इ.स. १९७३ पासून प्रकाशित होत आहे.
जयंत शिवराम साळगांवकर
225px
जयंत शिवराम साळगांवकर
जन्म जयंत साळगांवकर
फेब्रुवारी १, इ.स. १९२९
मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू २० ऑगस्ट, इ.स. २०१३ [१]
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यूचे कारण अन्न विषबाधा आणि वृद्धत्त्व
निवासस्थान मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
नागरिकत्व भारतीय Flag of India.svg
शिक्षण मॅट्रिक, संस्कृतचे पारंपरिक शिक्षण, ज्योतिषशास्त्राचे शिक्षण
पेशा ज्योतिषगणन, साहित्य
धर्म हिंदू
वडील शिवराम साळगांवकर

शिक्षण आणि बालपणसंपादन करा

शिक्षण : मॉट्रिकपर्यंत संस्कृतचे पारंपरिक शिक्षण.
कुटुंबसंपादन करा

जयंत साळगावकर यांच्या पत्‍नी जयश्री साळगावकर पाककलेत निपुण असून त्या लोकसत्तामध्ये लाडूच लाडू नावाचे सदर लिहीत. हे सदर अतिशय लोकप्रिय झाले होते. या सदरातील लेखांचे संकलन करून लाडूच लाडू या नावाचे पुस्तक लंडनहून प्रकाशित झाले आहे.
कारकीर्दसंपादन करा
सार्वजनिक क्षेत्रसंपादन करा

    श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबई ह्या संस्थेचे माजी ट्रस्टी.
    आयुर्विद्यावर्धिनी ह्या आयुर्वेदिक संशोधन करणाऱ्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष.
    मुंबई मराठी साहित्य संघ ह्या संस्थेचे अध्यक्ष.
    श्रीगणेश महानिधी ह्या पत्रकारिता, सैनिकी शिक्षण आणि रंगभूमी ह्या क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष.
    श्रीगणेश विद्यानिधी (पुणे) ह्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष.
    महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष.
    इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष.
    दादर-माटुंगा कल्चरल सेंटर संस्थेचे विश्वस्त.
    महाराष्ट्र व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष.
    १९८३ अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष.
    मुंबई येथे झालेल्या ७४ व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष.
    सातारा जिह्यातील विटा येथे झालेल्य विसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष .
    श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी यांनी बांधलेल्या श्रीज्ञानेश्वर मंदिराचे सन्माननीय उद्घाटक.
    कोल्हापूर येथे २९-३० एप्रिल इ.स. १९९१ रोजी झालेल्या आठव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.
    मुंबईत झालेल्या अखिल महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे स्वागताध्यक्ष.
    श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या विद्यमाने आणि गुरुकुल प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने सातारा येथे झालेल्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
    मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य
    आणखी कितीतरी ट्रस्टवर आणि सेवाभावी सार्वजनिक संस्थांमध्ये पदाधिकारी.

प्रकाशित साहित्यसंपादन करा
नाव साहित्यप्रकार प्रकाशक / प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.) टिप्पणी
सुंदरमठ कादंबरी समर्थ रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी
देवा तूचि गणेशु श्रीगणेश ह्या दैवताचा इतिहास, स्वरूप, प्रसार याबद्दल
धर्म-शास्त्रीय निर्णय ग्रंथाचे संपादन व लेखन
देवाचिये द्वारी लेखसंग्रह धार्मिक, पारमार्थिक अशा स्वरूपाचे लिखाण संतवाङमयाच्या आधाराने इ.स. १९९५ मध्ये दै. लोकसत्तात प्रकाशित झालेल्या ३०९ लेखांचा संग्रह
सुंदर ते ध्यान (देवाचिये द्वारी भाग-२) लेखसंग्रह इ.स. १९९६ मध्ये दैनिक लोकसत्तात ‘देवाचिये द्वारी’ ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३११ लेखांचा संग्रह
अमृताची खाणी (देवाचिये द्वारी भाग-३) लेखसंग्रह इ.स. १९९७ मध्ये दैनिक लोकसत्तात ‘देवाचिये द्वारी’ ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह
आनंदाचा कंद (देवाचिये द्वारी भाग-४) लेखसंग्रह इ.स. १९९८ मध्ये दैनिक लोकसत्तात ‘देवाचिये द्वारी’ ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह
ज्ञानाचा उद्गार (देवाचिये द्वारी भाग- ५) लेखसंग्रह इ.स. १९९९ मध्ये दैनिक लोकसत्तात ‘देवाचिये द्वारी’ ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह
दूर्वाक्षरांची जुडी लेखसंग्रह ‘देवाचिये द्वारी’ इ.स. १९९५-१९९९ मधील श्रीगणेशावरील लेखांचे संकलन
गणाधीश जो ईश लेखसंग्रह श्रीगणेशावरील लेख व मुलाखती. वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह
रस्त्यावरचे दिवे लेखसंग्रह आयुष्यात घडलेल्या, अनुभवाला आलेल्या, तसेच कोणाकडून तरी समजलेल्या प्रत्यक्ष घटनांवर आधारित साप्ताहिक ‘रविवारचा सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह
सगुण-निर्गुण दोन्ही समान लेखसंग्रह दैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘सगुण-निर्गुण’या सदरातून इ.स. २००३-२००६ह्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या ११६ लेखांचा (संदर्भ टीपांसह) संग्रह
भाव तोचि भगवंत लेखसंग्रह दैनिक सकाळ (वृत्तपत्र)मध्ये ‘देवाचिये द्वारी’ ह्या सदरात इ.स. २००५-२००६ ह्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १०८ लेखांचा संग्रह

    दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या (ऑनलाइन आवृत्ती) ‘प्रातःस्मरण’ ह्या सदरात जानेवारी, इ.स. २००९ पासून प्रत्येक मंगळवारी लेख प्रसिद्घ होत असत.

पुरस्कार व गौरवसंपादन करा

    ज्योतिर्भास्कर(संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी परीक्षा घेऊन दिलेली पदवी).
    ज्योतिषालंकार (मुंबईच्या ज्योतिर्विद्यालयातर्फे दिलेली सन्मानदर्शक पदवी).
    ज्योतिमार्तंड (पुण्याच्या ज्योतिष संमेलनात दिलेली सन्मानदर्शक पदवी).
    महाराष्ट्र ज्योतिष विद्यापीठाने दिलेली विद्यावाचस्पती (डी.लिट्) ही बहुमानाची पदवी.
    नाशिकच्या पुण्यश्लोक सद्गुरूच्या शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे ‘वैदिक पुरस्कार’ देऊन गौरव.
    मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट सदर लेखनाबद्दल ‘भ्रमंती पुरस्कार’.
    कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’.
    छत्रपती शिवाजीमहाराज स्मारक समिती, मुंबई तर्फे‘जीवनगौरव पुरस्कार’.
    महाराष्ट्र कला निकेतन तर्फे सांस्कृतिक कार्यासाठी ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार.
    कृष्णमूर्ती ज्योतिष संशोधन मंडळ, मुंबई तर्फे ज्योतिष शास्त्राच्या विशेष सेवेप्रीत्यर्थ ‘ज्योतिक कौस्तुभ’पुरस्कार.
    श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड, सातारा यांच्यातर्फे ‘समर्थ संत सेवा पुरस्कार’
    रा.स्व.संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत), पुणे यांच्या वतीने धर्मसंस्कृती क्षेत्रातील “परम पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार २०१०’.

संकल्पसंपादन करा
रुद्राक्ष माळा वाटण्याचा संकल्पसंपादन करा

राष्ट्र आणि धर्म यांची उन्नती व्हावी, देशाची सर्व बाजूनी प्रगती व्हावी ह्यासाठी सर्वांच्या उपासनेला एकजुटीने आणि एकविचाराने बळ प्राप्त व्हावे, हिंदू संस्कृती समृद्ध व सशक्त व्हावी अशा हेतूने पंचप्रणवयुक्त गायत्री चा जप जातीसाठी बंधने येवू न देता सर्वांनी करावा, याकरिता विनामूल्य रुद्राक्ष माळा वाटप सुरु आहे. वीस हजाराहून अधिक माळांचे वाटप करण्यात आले आहे
निरुपणसंपादन करा

काही वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या अल्फा टी.व्ही (मराठी)वर दिनांक २२ ऑगस्ट २००१ पासून ‘देवाचिये द्वारी’ ह्या संगीतमय कार्यक्रमात अभंग, गौळणी, पदे अशा संत रचनांवर आधारित असे प्रवचन, त्याचप्रमाणे धर्म आणि चालीरीती विषयक शंकांचाही परामर्श घेतला गेल्यामुळे हा कार्यक्रम लोकप्रिय झाला होता.
मृत्यूसंपादन करा

ऑगस्ट, इ.स. २०१३मध्ये वृद्धापकालीन अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात साळगांवकरांना उपचारार्थ हलवण्यात आले. २० ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी भाप्रवेनुसार पहाटे ०५१५च्या सुमारास त्यांचे रुग्णालयातच निधन झाले [१].
जयंत साळगांवकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार.
कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकूल वातावरणात पुत्र जयराज साळगावकर यांनी जयंतरावांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साळगांवकरांना श्रद्धांजली वाहिली.
मंगळवारी पहाटे हिंदुजा रूग्णालयात त्यांचे निधन झाले. काल सकाळपासूनच माटुंग्यातल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या असंख्य चाहत्यांची रीघ लागली होती. संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. वाटेतही अनेकजणांना त्यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचं काल मंगळवारी पहाटे हिंदुजा रुग्णालयात निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. जयंत साळगावकर हे सर्वाधिक खपाच्या `कालनिर्णय` या कॅलेंडरचे संस्थापक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये १ फेब्रुवारी १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला. जयंत शिवराम साळगावकर हे त्यांचं पूर्ण नाव. साळगावकरांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. मॅट्रिकपर्यंत संस्कृतचं परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून कालनिर्णय ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका प्रसिद्ध केली.
सोमवारी साळगावकर यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते चिंतेत होते. साळगावकर हे महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार होते. तसंच मराठी व्यापारी मित्रमंडळाचे सर्वेसर्वा म्हणूनही त्यांची ओळख होती.

टिप्पण्या