वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जगावे की मरावे असा प्रश्न विचारताना शेक्सपिअरच्या हेम्लेटलाही अंचबित करेल असा अप्पासाहेब बेलवलकर ज्यांनी मराठी रंगभूमीवर जिवंत केला, त्या नानासाहेब फाटकांचा २४ जून १८९९ साली कोल्हापूर येथे जन्म झाला
गोपाळ गोविंद फाटक हे त्यांचे मूळ नाव. मात्र या नावापेक्षा त्यांचे नानासाहेब फाटक हेच नाव लोकांच्या तोंडी जास्त झाले. मराठी रंगभूमीवरील त्यांचे नटसम्राट हे नाटक एवढे गाजले की त्यापुढे त्यांच्यामागे कायमच नटसम्राट ही उपाधीच लावली गेली.
रुबाबदार व्यक्तिमत्व, ऐटबाज चाल, धगधगते पुरुषी सौंदर्य आणि मनाचा ठाव घेणारी तीक्ष्ण नजर यांच्या जोडीला सप्तकातून भिरभिरणारा आवाज लाभलेल्या नानासाहेबांनी पद्यातील संगीताच्या तोडीसतोड गद्यातले संगीत उभे केले.
रक्षाबंधन या नाटकातून त्यांनी नाट्यक्षेत्रात प्रेवश केला. रक्षाबंधनमधली त्यांची गिरीधराची भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर त्यांना प्रमुख नायक आणि खलनायक म्हणून अनेक भूमिका मिळाल्या. नानासाहेब फाटक हे वास्तविक रंगमंचावरचे कलाकार. पण `थोरातांची कमळा' चित्रपटातील त्यांचा शिवाजी न भूतो न भविष्यति ठरला.पुण्यप्रभाव, 'श्री', सोन्याचा कळस, राक्षसी महत्वकांक्षा या नाटकांतील देखील नानासाहेबांच्या भूमिका विशेष ठरल्या
श्री या नाटकामध्ये त्यांनी कुसुमाकराची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका कमालीची लोकप्रिय ठरली. सोन्याचा कळस या नाटकात त्यांनी केलेली बाबा शिवगणची भूमिकाही नाट्यप्रेमींना आवडली होती. राक्षसी महत्वकांक्षा त्यांनी केलेली विक्रांतची भूमिका अजरामर ठरली होती. आपल्या या अप्रतिम भूमिकांमुळेच त्यांच्याकाळात नानासाहेब नाट्यसृष्टीचे अनशिषिक्त नटसम्राट झाले होते.
'बेबंदशाही ' तला संभाजी मधुसूधन कोल्हटकर यांनी नानासाहेब फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली साकारला. त्यांनी सादर केलेला एकच प्यालामधला सुधाकर लोकप्रिय ठरला. शेक्सपिअरच्या हॅम्लेट नाटकातील त्यांनी सादर केलेली हॅम्लेटची भूमिका नाट्यप्रेमी विसरुच शकत नाही. त्यांनी पुण्यप्रभावमध्ये साकारलेला वृंदावनही सर्वांच्या लक्षात राहिला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा