वैशिष्ट्यीकृत पोस्ट

कोफी अन्नान

संयुक्त राष्ट्रांचे ७वे सरचिटणीस
कार्यकाळ
१ जानेवारी १९९७ – ३१ डिसेंबर २००६
मागील बुट्रोस बुट्रोस-घाली
पुढील बान की-मून
जन्म ८ एप्रिल, १९३८ (वय: ७८)
कुमासी, गोल्ड कोस्ट (आजचा घाना)
राष्ट्रीयत्व घाना
शिक्षण मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
धर्म प्रोटेस्टंट
सही कोफी अन्नानयांची सही

कोफी अन्नान (जन्म: ८ एप्रिल १९३८) हे घाना देशामधील एक मुत्सद्दी व संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस आहेत. जानेवारी १९९७ ते डिसेंबर २००६ दरम्यान ह्या पदावर राहिलेले अन्नान हे सातवे सरचिटणीस होते. जगात शांतता राखण्यासाठी झटण्याबद्दल २००१ सालचे नोबेल शांतता पारितोषिक अन्नान व संयुक्त राष्ट्रे ह्यांना विभागून दिले गेले होते. अन्नाननी आपल्या कारकिर्दीमध्ये एड्स रोगाचा आफ्रिका खंडावरील वाढता विळखा थांबवण्यासाठी परिश्रम केले होते तसेच मानवी हक्क जपण्यावर त्यांनी प्राधान्य दिले. २००३ सालच्या अमेरिका व युनायटेड किंग्डम ह्यांनी केलेल्या इराकवरील हल्ल्याला अन्नान ह्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता.

२००३ साली भारत सरकारने अन्नानना इंदिरा गांधी पुरस्कार देऊन गौरवले. भारत सरकार व घाना सरकारांनी एकत्रितपणे आक्रा येथे घाना-इंडिया कोफी अन्नान सेंटर ऑफ एक्सलन्स इन आय.सी.टी. ह्या माहिती तंत्रज्ञानामधील उच्च शिक्षण संस्थेची स्थापना केली.

टिप्पण्या