वैशिष्ट्यीकृत पोस्ट

भूगोल दिन

भूगोल दिनाचे महत्त्व

महाराष्ट्रात चौदा जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा होतो. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे माजी प्राचार्य आणि राज्यातील थोर भूगोलतज्ज्ञ सी. डी. देशपांडे. हे महाराष्ट्राचे शिक्षण संचालक व दिल्लीपर्यंत नव्हे तर परदेशातही नावाजलेले भूगोलतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना भूगोलात आवश्यक असणारी मानव-पर्यावरण सहसंबंधांबाबत सम्यक दृष्टी दिली. भूगोल विषयातील त्यांचा सर्वांगीण अभ्यास, त्यांच्या ज्ञानाची, संशोधनाची श्रेष्ठता सदैव इतरांसाठी प्रेरणादायी ठरल्याने त्यांच्या सन्मानार्थ सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या ७५ व्या जन्मदिनी असे ठरविले की, भूगोल या अतिशय महत्त्वाच्या, पण दुर्लक्षित राहीलेल्या विषयासाठी दरवर्षी १४ जानेवारी हा दिन ‘भूगोल दिन’ म्हणून साजरा करायचा व त्याप्रमाणे पुण्याचे डॉ. सुरेश गरसोळे यांनी राज्यात ‘भूगोल दिन’ साजरा करण्याची प्रथा १४ जानेवारी १९८८ पासून सुरू केली. अजूनही महाराष्ट्रात भूगोल विषयासाठी काही खास उपक्रम राबविले जातात. आज आपण २९ वा भूगोल दिन साजरा करतो पण अजून तरुणाईचा ‘भूगोल’ कच्चाच ! दिसतो. जिल्ह्यातून उगम पावणार्याप नद्या, पर्वतरांगा, भौगोलिक वैशिष्ट्ये, दिशा, उपदिशा इत्यादी साधे प्रश्न विद्यार्थ्याला विचारले तर विद्यार्थात शांतता दिसते. आज विद्यार्थिच नव्हे तर शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, पालक यात भूगोल विषया विषयी उदासिनता पाहावयास मिळत आहे. भूगोल विषयास दुरलक्ष होत असले तरी विकासाच्या प्रक्रियेत हा खुप महत्वाचा विषय आहे. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व तज्ञाना हे माहितच आहे. भूपृष्टावर कोणतेही कार्य करत असताना भौगोलिक गोष्टी यात स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, व्यवसाय, वाहतुक इत्यादीची दखल आपणास घ्यावी लागते. भूगोल हा विषय फक्त पुस्तकातुनच शिकवु नेय तो निसर्गात जाऊन शिकावा कारण निसर्ग ही भूगोलाची प्रयोग शाळा असते तिचा वापर केला पाहिजे. आज तर जाकतिक पातळीवर भूगोल विषयात खुप प्रगती केली आहे. जी.आय.एस, जी.पी.एस व आर.एस. इत्यादी विषय झालेली प्रगती व त्याची गरज भूगोला विषयाचे महत्व सांगते. आज या क्षेत्रात विद्यार्थाला मोठ्या प्रमाणात रोजगाऱ्याच्या संधी आहेत. त्याचा फायदा विद्यार्थानी घावा ही विनंती विद्यार्थाला या भूगोल दिनी करतो.

टिप्पण्या