वैशिष्ट्यीकृत पोस्ट

शिवराय म्हणजे..................

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०१५

आमचे "दैवत" श्री छत्रपती शिवराय !




रायगडाची मेघडंबरी म्हणजे शिवराय...
भगवा झुलतो अंबरी म्हणजे शिवराय...

तानाजींच्या मनातला विश्वास म्हणजे शिवराय....
मदारींच्या त्यागातला ठराव म्हणजे शिवराय.....

जिवाजींच्या दांडपट्ट्याचा वार म्हणजे शिवराय....
शिवा काशीदांची आत्माहुती म्हणजे शिवराय....

बाजीप्रभूंच्या तलवारीतली आग म्हणजे शिवराय....
रयतेसाठी झालेली जीवाची तगमग म्हणजे शिवराय....

वतनदारीला घातलेला पायबंद म्हणजे शिवराय....
रांझ्याच्या पाटलाचा "चौरंगा" करण्याचा आदेश म्हणजे शिवराय....

३२ मनाच्या सिंहासनाचे धारक म्हणजे शिवराय....
जिजाऊ साहेबांच्या जीवनाचे सार्थक म्हणजे शिवराय...

एकच आवाज!! एकच पर्याय !!
जय जिजाऊ !! जय शिवराय !!   संग्रह शेवाळकर आर. पी.

टिप्पण्या