वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Marathi News >> लोकमत >> breakingnews
Wednesday, 21 Dec, 4.47 pm
ताज्या बातम्या
A A A
२२ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 21 - पूर्व दिशेला उगवणारा सूर्य आपल्या पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे दररोज उदयस्थान बदलत असतो; परंतु हा फरक काही दिवसांनंतर लक्षात येतो. कधी पृथ्वीचा उत्तर तर कधी दक्षिणी गोलार्ध सूर्यासमोर येतो. यामुळे दिनमानात फरक पडून पृथ्वीवरील विविध वृत्तावरील अक्षवृत्तावर हा फरक कमी जास्त असतो. आपल्या भागात २२ डिसेंबर हा दिवस सर्वात लहान असून, या दिवशी रात्र सव्वातेरा तासांची असणार आहे. या दिवशी सूर्य नेमका मकरवृत्तावर उगवणार आहे.
पृथ्वीचा अक्ष भ्रमण कक्षेशी कललेला असल्याने सूर्याचे भासमान चलन सतत सुरु असते. २१ मार्च व २२ सप्टेंबर या विषूवदिनी सूर्य नेमका पूर्वेस असतो.
म्हणूनच या दिवशी दिवस व रात्र समान असतात. २१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस, तर २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असतो. या उलटस्थिती दक्षीण गोलर्धात पहावयास मिळते. सध्या आपल्याकडे हिवाळा सुरु असून, आकाश बव्हंशी निरभ्रच असते. गुरुवार, २२ डिसेंबरची रात्र मोठी असल्याने रात्रीचे वेळी ग्रह, तारे बघण्याचा आनंद घेता येईल. सूर्यमालेतील पृथ्वीवरून मंगळ, बूध, गुरु, शुक्र व शनी हे पाच ग्रह नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात. सध्या सायंकाळी पश्चिम क्षितीजावर तेजस्वी स्वरुपा शुक्रग्रह दर्शनार्थ सज्ज आहे. २४ डिसेंबरला बुध ग्रहाचा पश्चिमास्त होऊन शनी ग्रहाचे पहाटे पूर्वेस दर्शन घेता येईल.
उत्तरायणास प्रारंभ
२२ सप्टेंबरपासून दिनमानात वाढ होत जाऊन, सूर्याचे उत्तरेकडे सरकणे सुरु होते. या स्थितीला उत्तरायणाचा प्रारंभ असे म्हटले जाते. सूर्य उत्तरेकडे अर्थात आपल्या गोलार्धाकडे येत असून, याच दिवसापासून तापमानात किंचीत वाढ होण्यास प्रारंभ होणार आहे.
पृथ्वीच्या तिरप्या अक्षामुळे दरवर्षी हा खगोलीय अनुभव येतो. २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस राहणार आहे. या दिवशी रात्र मोठी असल्याने आकाशातील ग्रह,ताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी सूवर्णसंधी आहे. - प्रभाकर दोड, खगोल अभ्यासक, निसर्ग शिक्षण कार्यसंस्था, अकोला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा