वैशिष्ट्यीकृत पोस्ट

नवे वर्ष नवा संकल्प

नवे वर्ष , नवे संकल्प .
आजचा नवीन वर्षाचा दिवस म्हणजे अनेकांच्या दृष्टीने काहीतरी नवा संकल्प करण्याचा दिवस आहे . खरंतर वैज्ञानिक दृष्ट्या कालच्या आणि आजच्या दिवसात फार काही फरक नाही . तरीही आपल्याला असं काय वेगळं वाटतं ज्याने आपण संकल्प करण्याचा विचार करतो. नवीन वर्ष , शुभ दिवस हे केवळ निमित्त असतं. कारण आपल्याला गरज असते ती कोणत्या तरी संदर्भाची . आपण प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या संदर्भात करत असतो . हे संदर्भ कोणत्यातरी कारणाशी जोडलेले असतात.
थोडं सोपं करून सांगतो. विविध जाती पंथाच्या लोकांचे नवे वर्ष वेगवेगळ्या दिवशी सुरु होते . त्यांचे सणवार वेगवेगळ्या दिवशी येत असतात. शुभ अशुभाच्या कल्पनाही भिन्न असतात. एकास जो दिवस किंवा गोष्ट शुभ असेल ती दुसर्यास असेलच असे नाही . बरेचदा एखाद्या धर्मातील शुभ शकुन इतरांमध्ये अशुभसुद्धा मानला जातो . म्हणजेच तार्किक व वैज्ञानिक दृष्ट्या या संकल्पनांना काही आधार नसतो . आधार असतो तो आपल्या मानण्याचा , आपल्या विश्वासाचा.
म्हणूनच येणारा प्रत्येक दिवस हा शुभ व आनंदमय आहे असे मानल्यास विशिष्ठ दिवसापर्यंत वाट पाहण्याची गरजच राहणार नाही . विश्वास ठेवा तुमचे हे वर्ष नक्कीच सुखाचे व आनंदाचे जाणार आहे .
 rpshewalkar.blogspot.in

टिप्पण्या