वैशिष्ट्यीकृत पोस्ट

मी सैनिक

💥 मी सैनिक ! 💥



राञंदिन आम्हा
युद्धाचा प्रसंग ;
जोवरी जीवमान
चाले हे संगर.

इंच इंच भूसाठी
ठेचू दुष्मनाला ;
विसावू न देऊ
नापाक पावलांना.

तुळशीपञ सोडले
आम्ही घरादारांवर ;
हिंदमाय जपू
अर्पुनि ही काया.

पूर्वजन्मीची पुण्याई
जन्म मिळाला इथे ;
सार्थकी नाव लावेन
अभिमाने जगी मिरवेन.

परंपरा पराक्रमाची
चालवु निरंतर ;
न पडेल काही
शब्दात या अंतर.




   ✍🏻महादेव नागणे


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

टिप्पण्या