वैशिष्ट्यीकृत पोस्ट

वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषवाक्ये


*वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषवाक्ये* 👉 वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल 👉 जिथे जिथे दिसते पुस्तक, तिथे व्हावे नतमस्तक 👉 जिथे पुस्तकांचा साठा, समृद्धीचा नाही तोटा 👉 वाचन करता मिळते ज्ञान, उंचावते जीवनमान 👉 पुस्तकांशी करता मैत्री, ज्ञानाची मिळते खात्री 👉 वाचनाने समृद्ध होते मती, मिळते आमच्या विकासाला गती 👉 ग्रंथ हे आपले गुरु, वाचनासाठी हाती धरू 👉 वाचन करा वाचन करा, हाच खरा ज्ञानाचा झरा 👉 वाचनालयाला देऊ आकार, कलामांचे स्वप्न करू साकार 👉 एक एक वाचू पुस्तक, गर्वोन्नत होईल मस्तक 👉 वाचनसंस्कृती घरोघरी, तिथे फुले ज्ञानपंढरी 👉 वाचनाचा जपा नाद, ज्ञानाचा नको उन्माद 👉 वाचता वाचता मिळते ज्ञान, अनुभव हाच गुरु महान 👉 पुस्तके वाचून मिळते ज्ञान, ज्ञानासह समाजाचे भान संकल्पना व रचना *वसंत गोमासे, भोवरी*

वाचन प्रेरणा दिन घोषवाक्ये pdf पहा
वाचनप्रेरणा दिन

टिप्पण्या