वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गणित अध्यापन उपक्रम

माझी शाळा माझा उपक्रम 🏡


🌹 संख्यापट्टी तयार करून अध्यापनात संख्यापट्टीचा वापर केला.🌹 इयत्ता- १ली
इयत्ता-2री
इयत्ता-3री🌸
🌺उद्देश-संख्याज्ञान ,पाढे तयार करणे.🌺
🌸साहित्य-कार्ड बोर्ड पेपर(पुठ्ठा)चिकटपट्टी ,ड्राईंग सीट,चिंचोके(मणी)मार्कर पेन्स.🌸
🐾कृती- 15 c.m. रूंदिच्या कार्डबोर्ड व ड्राईंग सिटच्या पट्ट्या कापूनआपले 1ते100 पर्यंत अंक मावतील या हिशोबाने1ते25अंक गट एकेका पट्टीवर केला.याप्रमाणे पट्टीचे चार भाग पडले. मार्कर पेनने 100पर्यंत अंक वरच्या बाजूस लिहले व अंकाखालील बाजूस रिकामा चौकोन तयार केला. चार पट्ट्या चिकटपट्टीने थोडे अंतर ठेवून जोडून घेतल्या.ज्यामूळे पट्टीची घडी पडते.वापरताना सोपी जाते. 🐾
 🌷अध्यापनात वापर🌷
संख्यापट्टीच्या मदतीने 1ली वर्गासाठी 100पर्यंत संख्याज्ञान तसेच पुढची ,मधली,मागची संख्या ज्ञात होते. 2 रीव 3 री वर्गांसाठी टप्पा व पाढा  ज्या संख्येचा टप्पा अथवा पाढा बनवायचा आहे, त्याखाली चिंचोका ठेवून पूढे तो त्याच क्रमपद्धतीने  चिंचोक्याची संख्या वाढत घेतली तर टप्पा व पाढा तयार होतो ही कृती मुलांना समजली. Folding पट्टी असल्यामूळे वापर योग्य पद्धतीने सोयीस्कर करता येतो.🐾
 🌷श्रीमती-सेलूकर शालिनी🌷
🏡जि.प.प्रा.शाळा दत्तनगर घोटी ता. किनवट,जि.नांदेड🏡

टिप्पण्या